मुंबई, जानेवारी १७, २०२४: टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. (टीपीईएम) ही टाटा मोटर्सची उपकंपनी आणि भारतातील ईव्ही क्रांतीमधील अग्रणी कंपनीने आज त्यांची पहिली प्युअर ईव्ही Punch.ev लाँच केली. नुकतेच सादर करण्यात आलेले प्रगत प्युअर ईव्ही आर्किटेक्चर acti.ev वर आधारित पहिले उत्पादन Punch.ev अत्याधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणप्रती जागरूक व किफातयशीर ऑफरिंगच्या माध्यमातून सामान्यतेला मागे टाकते. स्मार्ट, अॅडवेन्चर व एम्पॉवर्ड या तीन विशिष्ट परसोनामध्ये उपलब्ध असलेली Punch.ev वैविध्यपूर्ण आणि बहु-प्रतिभवान इलेक्ट्रिक वेईकल आहे, जिच्यामध्ये आकर्षक, क्लासिकल एसयूव्ही डिझाइन सामावेली आहे. १०.९९ लाख रूपये या सुरूवातीच्या किमतीमध्ये Punch.ev ईव्ही विक्रीसाठी अधिकृत करण्यात आलेले सर्व टाटा मोटर्स शोरूम्स आणि देशभरातील Tata.ev स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल.
Punch.ev ही TATA.ev च्या पोर्टफोलिओमधील अग्रणी भर आहे, ज्यामधून समकालीन ग्राहकांच्या गरजा व जीवनशैलीमधील परिवर्तनात्मक बदल दिसून येतो. या वेईकलमध्ये पंच ब्रॅण्डच्या विश्वसनीयतेसह इलेक्ट्रिक वेईकल तंत्रज्ञानामाील आधुनिक सुधारणांचे संयोजन आहे, ज्यामधून शून्य उत्सर्जनासह अपवादात्मक ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.
Punch.ev च्या लाँचबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच व्यवस्थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा महणाले, ”हा क्षण भारतातील ईव्ही प्रवासामधील ऐतिहासिक टप्पा आहे, जेथे Tata.ev ने Punch.ev च्या लाँचसह देशाला शाश्वत गतीशीलतेच्या नवीन युगाकडे नेले आहे. ईव्हीचा अवलंबतेला गती देण्याप्रती आमच्या अविरत मिशनने क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले आहे, नाविन्यपूर्ण सोल्यूशन्ससह अडथळ्यांवर मात केली आहे. गेम-चेंजिंग Nexon.ev व Tiago.ev लाँच करण्यापासून प्रबळ चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करण्याप्रती आमच्या सातत्यपूर्ण कार्यापर्यंत आम्ही पैलूंना नवीन आकार दिला आहे. आता उत्तम दैनंदिन प्रवासाची खात्री देणाारी एसयूव्ही Punch.ev च्या लाँचसह आम्ही ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करणारी वैविध्यपूर्ण ईव्ही सादर करत आमच्या कटिबद्धतेला पूर्णत: नव्या उंचीवर नेत आहोत. यामध्ये भारतातील ईव्ही बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण करण्याचा आणि भारताला प्युअर ईव्हींच्या युगाकडे घेऊन जाण्याचा मनसुबा आहे.
स्थापनेपासून चार वर्षांमध्ये १०० पट वाढ पाहता ईव्ही आता महत्त्वाच्या बनल्या आहेत. ईव्हींचे लोकशाहीकरण करण्याप्रती टाटाच्या कटिबद्धतेशी बांधील राहत Punch.ev मानकांना नव्या उंचीवर नेण्यास, आजच्या व भावी गरजांची पूर्तता करणारे परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे. आपण ई-मोबिलिटीच्या नवीन युगाचे स्वागत करत असताना Punch.ev निश्चितच नाविन्यता व प्रगतीचा आधारस्तंभ ठरेल. विशेष स्टोअर्स, सहयोगात्मक चार्जिंग उपक्रम आणि अत्याधुनिक उत्पादन इकोसिस्टमसह आम्ही शाश्वतता, समुदाय व तंत्रज्ञानाला एकत्र करणाऱ्या भविष्याला आकार देण्याप्रती कटिबद्ध आहोत.”
Punch.ev बाबत सविस्तर माहिती
विविध ग्राहकांच्या वापरासंदर्भातील गरजा लक्षात घेत Punch.ev दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येते – २५ केडब्ल्यूएच, जी ३१५ किमीची एमआयडीसी रेंज देते आणि ३५ केडब्ल्यूएच पर्याय, जे ४२१ किमीची एमआयडीसी रेंज देते. या बॅटरी पॅक पर्यायांना पूरक असे दोन ई-ड्राइव्ह पर्याय आहेत, ६० केडब्ल्यू परमनण्ट मॅग्नेट सिन्क्रोनस एसी मोटर, जी ११४ एनएम टॉर्कची निर्मिती करते आणि ९० केडब्ल्यू परमनण्ट मॅग्नेट सिन्क्रोनस एसी मोटर, जी १९० एनएम टॉर्कची निर्मिती करते. यामुळे वेईकल ९.५ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते आणि इलेक्ट्रॉनिकली लिमिटेड टॉप स्पीड १४० किमी/तास आहे. Punch.ev चे बॅटरी पॅक आणि मोटर धूळ व पाण्यापासून संरक्षणासाठी आयपी६७ प्रमाणित आहे, तसेच ८ वर्षे किंवा १,६०,०० किमीची (जे अगोदर असेल ते) वॉरंटी आहे, ज्यामुळे ग्राहकांना परिपूर्ण मन:शांती मिळते.
तसेच, Punch.ev लॉंग रेंज (एलआर) ३.३ केडब्ल्यू आणि ७.२ केडब्ल्यू एसी फास्ट चार्जर पर्यायसह उपलब्ध आहे, जे घरी किंवा कामाच्या ठिकाणी बसवता येऊ शकतात. डीसी फास्ट चार्जिंग क्षमतेसह बॅटरी कोणत्याही ५० केडब्ल्यू डीसी फास्ट चार्जरच्या माध्यमातून ५६ मिनिटांमध्ये १० टक्के ते ८० टक्क्यांपर्यंत जलदपणे चार्ज करता येऊ शकते.
डिझाइनमधील तंत्रज्ञानासह अद्वितीय ईव्ही ओळख: नवीन डिजिटल दृष्टिकोनाच्या नेतृत्वासह Punch.ev इनोव्हेटिव्ह, टेक-फॉरर्व आणि अस्पायरेशनल म्हणून अग्रस्थानी आहे. आयकॉनिक लुकसह ईव्ही आधुनिकतेचा समावेश असलेली ही कार स्मार्ट लायटिंग सिस्टम्सच्या माध्यमातून डिजिटली सुधारण्यात आली आहे.
· वेईकल चार्ज होत असताना एसओसी लेव्हल्स दाखवण्यासाठी उपयुक्त स्मार्ट चार्जिंग इंडीकेटर.
· बाय-फंक्शनएल एलईडींसह आसपासचा परिसर प्रकाशित करणारा मध्यभागी स्थित लॅम्प.
· वेलकम व गुडबाय सिग्नेचर कार अनलॉक किंवा लॉक करताना शुभेच्छा देते.
केबिनमधील अनुभव:
डिजिटल फर्स्ट – केबिनमध्ये उच्चस्तरीय राइडिंग भावना देण्यासाठी एकूण डिजिटाइज्ड इंटरअॅक्टिव्ह अनुभव प्रगत करत Punch.ev मध्ये वरील २ ते ३ विभागांमधील वैशिष्ट्यांची भर करण्यात आली आहै.
· दोन स्क्रिन्सचा समावेश – हार्मन डिस्प्लेद्वारे २६ सेमी हाय-डेफिनिशन इन्फोटेन्मेंटसह २६ सेमी डिजिटल कॉकपीट
· २-स्पोक स्टीअरिंग व्हीलच्या मध्यभागी असलेले इल्यूमिनेटेड लोगो डिजिटल वातावारणामध्ये अधिक भर करते.
· फिजिटल कंट्रोल पॅनेलमध्ये फिजिकल व टच कंट्रोल्सचे सुसंगत संयोजन आहे, जे सानुकल एर्गो-अॅस्थेटिक समाधानासाठी बारकाईने डिझाइन करण्यात आले आहे.
· वायरलेस अँड्रॉईड ऑटोTM आणि अॅप्पल कारप्लेTM कार्यक्षमतांसह, तसेच गेमिंग, म्युझिक व मीडियासाठी १७ अॅप्स असलेले अॅप Arcade.ev सूट च्या गॅझेट-सारख्या अनुभवासह सोयीसुविधेमध्ये अधिक वाढ करण्यात आली आहे.
· Punch.ev विविध वॉईस असिस्टण्ट्ससह कनेक्टीव्हीटी देखील देते, ज्यामध्ये ६ भाषांमधील २०० हून अधिक कमांड्स असलेले नेटिव्ह ‘हे टाटा’ अस्टिस्टण्ट, अॅलेक्सा, अॅप्पल वापरकर्त्यांसाठी सिरी आणि अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी गुगल असिस्टण्टचा समावेश आहे.
· झेडकनेक्ट कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह कनेक्टेड कार अनुभवामध्ये अधिक वाढ करण्यात आली आहे, तसेच प्रमाणित म्हणून स्मार्टवॉच कनेक्टीव्हीटी प्रदान करण्यात आली आहे.
प्लश वैशिष्ट्य अपग्रेड – वायरलेस चार्जिंग, ऑटोमोटिव्ह हेडलॅम्प्स, रेन-सेन्सिंग वायपर्स आणि ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम अशा विशिष्ट वैशिष्ट्यांसह Punch.ev संपन्न ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ४५ वॅट टाइप-सी यूएसबी पोर्टच्या माध्यमातून फास्ट चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे, ज्यामधून वैयक्तिक गॅझेट्ससाइी सतत ऊर्जेची खात्री मिळते. आरामदायीपणा व आरोग्याला प्राधान्य देत Punch.ev मध्ये हवेशीर लेदरेट सीट्स, इलेक्ट्रिक सनरूपु, मूड लाइट्स आणि एअर प्युरिफायरसह एक्यूआय डिस्प्ले आहे. याव्यतिरक्त Punch.ev मध्ये पॅडल शिफ्टर्स आहेत, जे ४-लेव्हल मल्टी-मोड रिजनरेशन आणि ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपग्रेड क्षमता देतात.
acti.ev आर्किटेक्चर – दर्जेदार उत्पादनासाठी शक्तिशली अंडरपिन.
Punch.ev नवीन मेड-इन-इंडिया प्युअर ईव्ही आर्किटेक्चर acti.ev वर आधारित टाटा मोटर्सची पहिली उत्पादन आहे. हे आर्किटेक्चर अडवान्स्ड कनेक्टेड टेक-इंटेलिजण्ट इलेक्ट्रिक वेईकलसाठी ओळखले जाते. acti.ev आर्किटेक्चर परफॉर्मन्स, टेक्नॉलॉजी, मॉड्युलेरिटी व स्पेस एफिशिएन्सी या प्रमुख आधारस्तंभांवर आधारित आहे आणि त्यामध्ये चार लेयर्सचा समावेश आहे – पॉवरट्रेन, चेसिस, इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर व क्लाऊड आर्किटेक्चर.
acti.ev बाबत अधिक माहितीसाठी या लिंकवर (link) क्लिक करा.
अद्वितीय सुरक्षितता: सर्व परसोनामध्ये प्रमाणित म्हणून ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ISOFIX, रोल-ओव्हर मिटीगेशन, ब्रेक डिस्क वायपिंग, हायड्रॉलिक फेडिंग कम्पेन्सेशन उपलब्ध असण्यासह Punch.ev ही भारतातील रस्त्यांवर धावणारी सर्वात सुरक्षित कार आहे. ही सुरक्षित कार प्रवाशांना अतिरिक्त वैशिष्ट्ये देते जसे एसओएस कॉलिंगसह ई-कॉल व बी-कॉल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्ड आणि ३६० सराऊंड व्ह्यू कॅमेरा सिस्टमसह कारच्या हाय-एण्ड ट्रिम्समध्ये ब्लाइण्ट स्पॉट मॉनिटर.
बीयॉण्ड अॅण्ड बेटर: व्यावहारिक, पण कार्यक्षमता केंद्रित.
Punch.ev मध्ये अस्सल इलेक्ट्रिक एसयूव्हीची आवश्यक वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये १६-इंच एलआरआर टायर्स, १९० मिमी ग्राऊंड क्लीअरन्स (अनलॅडेन), ३५० मिमी वॉटर वेडिंग क्षमता आणि प्रभावी अॅप्रोच, डिपार्चर व रॅम्प-ओव्हर अँगल्स. ९०-अंशामध्ये उघडणारे दरवाजे, दु-सया रांगेमध्ये फ्लॅट फ्लोअर, ३६६ लिटर बूट स्पेस, फ्रंकमध्ये १४ लिटर अतिरिक्त स्पेस, तसेच स्मार्ट स्टोरेजसाठी ३२ केबिन कबी होल्ससह Punch.ev अधिक सोयीसुविधेची खात्री देते.
Punch.ev बाबत अधिक माहितीसाठी, कृपया सोबत जोडण्यात आलेल्या प्रॉडक्ट नोटचा संदर्भ घ्या किंवा Tata.ev’s वेबसाइटला भेट द्या.


