Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीएच्या पर्यावरण विभागातील विद्यार्थिनी नम्रता खत्रीचा राष्ट्रीय गौरव कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे...

बीएनसीएच्या पर्यावरण विभागातील विद्यार्थिनी नम्रता खत्रीचा राष्ट्रीय गौरव कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे घेतलेल्या स्पर्धेचा पुरस्कार दिल्लीत प्रदान

पुणे, दि. १७ : वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील सर्व छोट्या-मोठ्या शहरातील गंभीर बनत चाललेल्या पर्यावरणावरील प्रश्नाची सोडवणूक करणे गरजेचे आहे. या विषयाचे महत्त्व लक्षात आल्याने महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) पर्यावरण विभागातील पदव्यूत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नम्रता नंदलाल खत्री या विद्यार्थिनीच्या शोधनिबंधाला राष्ट्रीय पातळीवर वास्तूरचनाशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील सर्वोत्तम शोध निबंध म्हणून नुकतेच गौरवण्यात आले.

 

वास्तूरचनाशास्त्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे (सीओए) आयोजित केलेल्या स्पर्धेतून देशपातळीवर निवडण्यात आलेल्या दहा सर्वोत्तम शोधनिबंधात नम्रता हिचा शोधनिबंध असून तिला एक लाख रूपयांचा पुरस्कार व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. सीओएचे अध्यक्ष प्रा. अभय पुरोहित आणि संचालक प्रा. जयश्री देशपांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. बीएनसीएच्या डॉ. सुजाता कर्वे यांनी तिला मार्गदर्शन केले.

 

‘बेळगाव शहरातील जीवनशैलीच्या पर्यावरणीय गुणवत्तेचे मुल्यांकन’ या विषयावरील हा शोधनिबंध असून या शहरातील विविध भागांमधील पर्यावरणीय गुणवत्तेचा अभ्यास तिने केला. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी नम्रताचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या बेळगाव या मध्यम आकाराच्या शहरातील पर्यावरणीय अभ्यासातून निघालेले निष्कर्ष पाहता त्याचा प्रातिनिधीक वापर देशातील अन्य मध्यम आकाराच्या शहरांमधील अशा प्रश्नांवरील उपयांसाठी पथदर्शी ठरू शकेल.

 

डॉ. सुजाता कर्वे म्हणाल्या की, नम्रताच्या अभ्यासातून बेळगावमधील चांगली, बरी आणि काळजी वाटावी अशी ठिकाणे अधोरेखित करण्यात आली. त्याचा उपयोग स्थानिक महापालिकेच्या पर्यावरण विभागाला त्यावर ठोस उपाय करण्यासाठी नक्कीच होईल, असा विश्वास वाटतो.

 

बीएनसीएतील पर्यावरण विभागप्रमूख डॉ. प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या की, उपग्रहाच्या मदतीने करण्यात येणारे ‘रिमोट सेन्सींग’ (दूरवरून केलेला अभ्यास) तसेच ‘जीआयएस’ (भौगोलिक माहिती प्रणाली) या तंत्रज्ञानांच्या वापरातून केलेल्या या अभ्यासाबरोबरच नम्रताने स्थानिक नागरिकांच्या इच्छा-आकांक्षांचाही त्यांच्याशी संवाद साधून वेध घेतला आहे. त्याचाही या शोधनिबंधात अंतर्भाव करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments