Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedधनकवडी - बालाजीनगर* :सद् गुरु शंकर महाराज पालखी सोहळा _ एक अविस्मरणीय...

धनकवडी – बालाजीनगर* :सद् गुरु शंकर महाराज पालखी सोहळा _ एक अविस्मरणीय अनुभव

🚩🚩🚩
*

श्री सद्गुरु शंकरमहाराज पालखी सोहळा पहाण्याचा सुयोग आणि सद्भाग्य आम्हा काही नांदेड सिटी रहिवासी ज्येष्ठ बांधवांना लाभलं.
श्री प्रकाशजी गोरे काका यांनी आवर्जून आमच्या नांदेड सिटीतील *“भजनामृत भजनी मंडळ”* च्या हौशी व ज्येष्ठ नागरिक सभासदांना *पुण्यातील धनकवडी- बालाजीनगर येथे आमंत्रित केलं होतं*. याच भागात *संतश्री शंकरस्वामी महाराजांचा* भव्य मठ आहे.
शनिवार दि ९ नोव्हेंबर २०२४ रोजी शंकरस्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त धनकवडी- बालाजीनगर- सातार रोड परिसरात प्रचंड मोठा सोहळा या भागातील नागरीक , व्यापारी व रहिवासी दर वर्षी साजरा करतात
गेली १०-१२ वर्षे हा भव्य नगर प्रदक्षिणा सोहळा होत असतो . आमचे भाग्य म्हणून या वर्षी हा भव्य सोहळा आम्ही पाहू शकलो !
पालखीचे, मिरवणुकीचे दर्शन आणि पालखी स्पर्श दर्शन तथा पालखीतील सद्गुरु शंकरस्वामी महाराजांच्या पवित्र पादुकांच स्पर्श दर्शन आम्हा सर्वांना घेता आलं.
श्री प्रकाश गोरे काका यांच आमंत्रण, आयोजन, नियोजन, उत्तम व्यवस्थापन , समाज संघटन अशा अनेक कौशल्य गुणांचा पुन्हा एकदा , आणि जास्त विस्तृत प्रकारे
अनुभव घेता आला. श्री गोरे काका गेल्या अनेक वर्षांपासून
धनकवडी- बालाजीनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत.
*त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त आणि आपुलकी या संपूर्ण कार्यक्रमात दिसून आली*. संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ होता. स्त्रिया, मुली, मुले, पुरुष सर्वजण उत्सफुर्त बालाजी नगरचे रस्ते , परिसर सजवत होते. ठायी ठायी मोठमोठ्या रांगोळ्या, फुलांचे सुशोभित गालिचे यांनी पालखी भ्रमणाचे रस्ते सजले होते. सारे नागरिक मंगल वेषात- स्त्रिया काठ पदराच्या साडीत, मुली सुंदर कपड्यांनध्ये सजलेल्या , पुरुष मंडळी टोप्या घालून व भाळी चंदन- कुंकाचे मंगल टिळे लेवून लगबगीने वावरत होते. कुठे गोंधळ नाही, आरडा. ओरडा नाही. प्रचंड गर्दी होती पण कुठेही कोणीही रांगोळ्या , फुलांचे गालिचे पायदळी येऊ देत नव्हते. प्रत्येक सोसायटीचे पालखी स्वागत खरोखरच कौतुक या बालाजी नगर रहिवाशांचे
, या एव्हढ्या गर्दीत , श्री गोरे काकांनी आमच्यासाठी केलेली खास व्यवस्था सांगायलाच हवी. आम्ही चार कार मधून २० मंडळी येणार होतो. आमच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आरक्षित करून ठेवली होती. गाड्या लावून आम्ही खाली उतरलो आणि सगळीकडच उत्साही समारंभाच वातावरण पाहून थक्क झालो. तिथून आम्हा सर्वांना पालखी मार्गावरील सजावटीच दर्शन घडवलं. कोप-या कोप-यावर स्वागत कक्ष उभारलेले होते, भक्ती गीते, कुठे रेकार्डवर तर कुठे प्रत्यक्ष भजनसेवा चालू होती. सुंदर फुलांची पोतीच्या पोती आरास करण्यात रिकामी होत होती. तेथील स्त्रियांनी आम्हालाही थोडी सजावट सेवा
करू दिली ,काही मंडळांनी आमचा सन्मानही केला *गोरे काका १० वर्ष त्या परिसरात निवडून येत होते विषेश म्हणजे ते धनकवडी भागाचे १९८० ते ९० साली पाणी पुरवठा समितीचे दहा वर्ष अध्यक्ष होते* त्यांचे सामाजिक कार्य आणि ३० वर्ष व्यवसाय *त्यामुळे त्यांची लोकप्रियता अनुभवयास* मिळाली
पालखीच्या प्रमुख मार्गावरच *श्री गोरे काकांचे दुकान आहे. तेथे पालखीचा थांबा दर वर्षी निश्चित असतो*. पाय-यांवर आम्हा सर्वांची थांबण्याची सोय केली होती. *येता जाता नागरीक तसेच व्यापारी मंडळी गोरे काकांना अभिवादन करीत होती. तुमच्या पाहुण्यांची व्यवस्था नीट होतेय ना* अशी आपुलकीने विचारणा करीत होती.
आता महाराजांची पालखी मिरवणूक जवळ येऊ लागली होती. *भव्य मिरवणूक! पुढे सुंदर उंच सुदृढ सुशोभित बैलांची जोडी होती. मागून प्रचंड नंदीवर बसून भगवान शंकरांची मिरवणूक येत होती. त्यांच्यापुढे शिव गणांचे भस्मनृत्य करीत येत होते … हनुमानजीही होते. मिरवणुकीमध्ये लहान मुली, तरुण मुली नऊवारी साडीत रणरागिणींच्या वेषात तलवारीचे युध्दाचे हात करून दाखवीत होत्या . तसेच लहान मुले आणि काही पुरुषही शिवबांच्या सैन्यातील योद्ध्यांच्या वेषात तलवारीचे हात करीत होते*. या सर्वांच्या मागून सद्गुरु शंकरस्वामी महाराजांच्या पालखीचे आगमन होत होते. *सारं दृश्य आम्ही भारल्यासारखे पहात होतो. पवित्र भावनांचे , पारमार्थिक आनंदाचे रोमांच अंगावर उभे रहात होते. आणि… पालखी पहिल्या थांब्यावर आमच्या अगदी समोरच येऊन थांबली* . पालखीवर सर्वांबरोबर आम्हीही फुले उधळली
*…. आणि तो क्षण आला … प्रत्यक्ष पालखीतील सद्गुरुंच्या सजलेल्या मूर्तीला आणि पादुकांना प्रत्यक्ष स्पर्श करून चरणी माथा टेकवून दर्शन घेता आलं !*
*हे सर्व पारमार्थिक सुख, हा आनंद केवळ अकल्पित आणि अवर्णनीय होता*. आम्हा सर्वांच्या डोळ्यात *आनंदाश्रू* होते.
*यानंतर पालखीचे पुढे प्रस्थान झाले. तो आनंद आम्ही मनात हृदयात आठवणीत साठवून घेतला!* यासाठी आम्ही सर्व गोरे काकांचे ऋणी आहोत.
यानंतर आमच्या *भजनामृत मंडळाचे भजन* श्री. गोरे काका व सौ आशाताई यांच्या घरी पद्मावती येथे होणार होते.
*सदैव उत्साही आणि हसतमुख सौ आशाताई, त्यांचा मुलगा प्रतीक गोरे, सूनबाई सौ चारुशिला व नातू चि अवधूत या सर्वांनी* आमचे उत्साहाने आगत स्वागत केले. चहा झाला. नंतर सुमारे १ तास आम्ही *भजनसेवा* केली.
संपूर्ण गोरे कुटंबीय भजनात रमले होते, आनंद घेत होते. *गोप अष्टमीचा शुभ दिवस होता— नैवेद्य- प्रसाद व सामुहिक आरती झाली* नंतर रुचकर व सात्विक असे प्रसाद भोजन झाले.
*प्रतीक -चारूने व्यवस्था खूप प्रेमाने, शिस्तीने व आनंदाने केलेली जाणवली. चि अवधूतही मदत करीत होता. त्यांनी आम्हा सर्वांना प्रेमाची भेटवस्तूही दिली*. गोरे कुटुंबाच्या पुनीत अशा दोन मजली वास्तूमध्ये अगदी माहेरपण घडलं असं वाटलं !
एकंदरीत अतिशय सुंदर आणि कायम आठवणीत राहील असा अनुभव घेऊन आम्ही सारे नांदेड सिटीत परत आलो.
— *सौ अर्चना अशोक कौलगुड* नांदेड सिटी, पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments