Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedमूत्रविकार तपासणी-उपचार-शस्त्रक्रिया सप्ताह”

मूत्रविकार तपासणी-उपचार-शस्त्रक्रिया सप्ताह”

ए.एस.पी. मेडिकल फाउंडेशन आणि डॉ.दिवाकर अभ्यंकर फाउंडेशन यांच्या सौजन्याने – एस हॉस्पिटल एरंडवणे, पुणे येथे दि.26 नोव्हें ते 3 डिसें 2024 या कालावधीत स.10 ते संध्या. 5 वाजेपर्यंत “मूत्रविकार तपासणी-उपचार-शस्त्रक्रिया सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. प्रोस्टेट, किडनी स्टोन, मूत्रमार्ग कॅन्सर, किडनी ट्रान्सप्लान्ट, यांसारख्या स्त्री-पुरुषांच्या सर्व प्रकारच्या मूत्रविकारांच्या रुग्णांसाठी हे “साप्ताहिक शिबीर” महत्वपूर्ण असणार आहे. यामध्ये डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला विनामुल्य असेल तसेच आवश्यक तपासण्यांवर 50% पर्यंत सवलत असेल. जागतिक दर्जाच्या अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया जसे की रोबोटिक शस्त्रक्रिया, प्रोस्टेट ग्रंथीसाठी केल्या जाणाऱ्या रीझम, युरोलिफ्ट सारख्या शस्त्रक्रियाही विशेष सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत.
तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या आरोग्य सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक असणार आहे. नावनोंदणी साठी संपर्क – 020-67029100.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments