Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वातील प्ले ऑफ आणि अंतिम लढत पुण्याला ...

प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वातील प्ले ऑफ आणि अंतिम लढत पुण्याला – प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वातील अंतिम लढत रविवारी २९ डिसेंबर रोजी होईल – गुरुवारी २६ डिसेंबर रोजी एलिमिनेटर्स आणि उपांत्य फेरी २७ डिसेंबर रोजी होईल – प्ले ऑफ लढतीत गुणतालिकेतील पहिले सहा संघ लढतील

पुणे २७ नोव्हेंबर २०२४ – प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) ११व्या पर्वातील प्ले ऑफ आणि अंतिम लढत पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे २६ ते २९ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. संयोजकांच्या वतीने बुधवारी ही घोषणा करण्यात आली.

लीग टप्प्यातील अव्वल दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघ २६ डिसेंबर रोजी एलिमिनेटर टप्प्यात आमनेसामने येतील. तिसऱ्या क्रमांकावर येणारा संघ एलिमिनेटर १ मध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल. चौथ्या स्थानावरील संघ पाचव्या स्थानावरील संघाशी एलिमिनेटर २ मध्ये खेळेल.

एलिमिनेटर १चा विजेता उपांत्य फेरीत गुणतालिकेतील अव्वल स्थानावर असणाऱ्या संघाशी खेळेल. एलिमिनेटर २ चा विजेता दुसऱ्या उपांत्य फेरीत गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानावरील संघाशी खेळेल. या दोन्ही उपांत्य लढती २७ डिसेंबर रोजी खेळल्या जातील. त्यानंतर ११व्या पर्वाची अंतिम लढत २९ डिसेंबर रोजी होईल.

लीगचा दुसरा टप्पा सध्या नोएडा येथे सुरु आहे. हा टप्पा १ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर ३ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान अखेरचा टप्पा पुण्यातच खेळविला जाणार आहे. त्यानंतर प्ले ऑफ लढती होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments