प्रत्येकी 1 रुपया दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरसाठी 522 ते 549 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित
· बोली / ऑफर बुधवार, 11 डिसेंबर, 2024 रोजी सुरू होईल आणि शुक्रवार, 13 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख मंगळवार, 10 डिसेंबर, 2024.
· गुंतवणूकदारांना किमान 27 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 27 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल
· RHP Link: https://www.sailife.com/wp-content/uploads/2024/12/Red-Herring-Prospectus.pdf
राष्ट्रीय, 6 डिसेंबर 2024 : साई लाइफ सायन्सेस लिमिटेड (“साई लाइफ” किंवा “द कंपनी”) या कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) येत्या 11 डिसेंबर २०२४पासून सुरू होणार आहे. कंपनीने या संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे.
या ऑफरमध्ये एकूण 950 कोटी रुपयांच्या नव्या इक्विटी शेअर्सचा (“फ्रेश इश्यू”), तसेच काही विद्यमान भागधारकांकडील (“सेलिंग शेअरहोल्डर्स”) 3,81,16,934 इक्विटी शेअर्सचा (“ऑफर फॉर सेल”) समावेश आहे. (“टोटल ऑफर साईझ”)
या आयपीओमधून मिळणाच्या निधीचा विनियोग आपल्या 720 कोटी रुपयांच्या कर्जाची संपूर्ण वा अर्ध-परतफेड करण्यासाठी आणि उर्वरीत रकमेचा विनियोग इतर कॉर्पोरेट स्वरुपाच्या खर्चासाठी करण्याचा कंपनीचा मनोदय आहे. (“ऑबजेक्ट्स ऑफ द ऑफर”)
‘ऑफर फॉर सेल’मध्ये, साई क्वेस्ट सिन प्रायव्हेट लिमिटेड (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर”) यांच्याकडील 64,54,780 इक्विटी शेअर्स, टीपीजी एशिया व्हीटू एसएफ पीटीई लि. यांच्याकडील 2,31,59,368 इक्विटी शेअर्स, एचबीएम प्रायव्हेट इक्विटी इंडिया यांच्याकडील 62,10,186 इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे, “इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर”); त्याचप्रमाणे, भारती श्रीवरी यांच्याकडील 6,50,000 इक्विटी शेअर्स, अनिता रुद्रराजू नंद्याळा यांच्याकडील 5,00,000 इक्विटी शेअर्स, राजू पेनमस्ता यांच्याकडील 5,00,000 इक्विटी शेअर्स, डॉ. डर्क वॉल्टर सरटॉर यांच्याकडील 2,50,00 इक्विटी शेअर्स, जगदीश विश्वनाथ डोरे यांच्याकडील 2,45,100 इक्विटी शेअर्स, राजगोपाल श्रीरामा टट्टा यांच्याकडील 62,500 इक्विटी शेअर्स, के पांडू रंगा राजू यांच्याकडील 80,000 इक्विटी शेअर्स समभाग आणि वेंकट नरसिंह शास्त्री यांच्याकडील 5,000 इक्विटी शेअर्स (सर्व मिळून “अदर सेलिंग शेअरहोल्डर्स”) एवढ्या शेअर्सचा समावेश आहे.
अॅंकर इन्व्हेस्टर श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिवस मंगळवार, 10 डिसेंबर 2024 हा ठरविण्यात आला आहे. इतर गुंतणूकदारांसाठी बुधवार, दि. 11 डिसेंबर 2024 ते शुक्रवार, दि. 13 डिसेंबर 2024 ही मुदत देण्यात आली आहे. (“बिड डिटेल्स”)
या आयपीओसाठी इक्विटी शेअर्सचा किंमतपट्टा 522 रुपये ते 549 रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान … शेअर्ससाठी व त्यानंतर …. शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.
हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत 5 डिसेंबर 2024 रोजी हैदराबाद येथील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, तेलंगणा (“आरओसी”) यांच्याकडे सादर केले जात आहेत.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”, ‘बीएसई’सोबत एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंज”) या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ऑफरच्या उद्दिष्टांसाठी, एनएसई हे स्टॉक एक्सचेंज नियुक्त करण्यात आले आहे. (“लिस्टिंग डिटेल्स”)
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वाश्रमीची आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड), जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मॉर्गन स्टॅनले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”) आहेत.
या प्रेस रीलिजमध्ये ज्या विशिष्ट संज्ञांची व्याख्या नमूद केली नसेल, त्यांचा अर्थ आरएचपीमध्ये विहित केल्याप्रमाणे घ्यावा.
‘सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स’मधील नियम क्र. 31मध्ये नमूद केल्याप्रमाणे, सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम, 1957च्या नियम


