Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorized- प्रधानमंत्री आवास योजना संगणकीय सोडत

– प्रधानमंत्री आवास योजना संगणकीय सोडत

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आकुर्डी व पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील लाभार्थ्यांची सदनिकांची संगणकीय सोडत शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

 

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात (दादा ) पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप यांच्या विशेष उपस्थितीत ही संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

 

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी व पिंपरी येथे स्वस्त घरकुल योजना प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत.सदर योजनेस मा.महापालिका सभेने ठराव क्र.३९, दि.२०/०६/२०१७ अन्वये मान्यता दिलेली आहे.सदर प्रकल्पांच्या सदनिकांकरिता लाभार्थी निश्चित करणेकामी दि.२८/०६/२०२३ ते ३१/०८/२०२३ या कालावधीत नागरिकांकडून अर्ज मागविणेत आले आहेत. आकुर्डी प्रकल्पाकरिता ६६७२ अर्ज व पिंपरी प्रकल्पाकरिता ४६१५ असे एकुण ११२८७ इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत. या प्रकल्पामध्ये आकुर्डी येथे ५६८ तर पिंपरी येथे ३७० अशा एकूण ९३८ सदनिका आहेत.

 

या योजनेकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतर याप्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण आहे. या योजनेची सोडत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या Facebook पेजवर (Link – www.facebook.com/pcmcindia.gov.in ) थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. तसेच प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहाच्या बाहेरील एल.ई.डी. वॉल वर थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. या योजनेकरिता ९३८ सदनिकांची निवड यादी व प्रतिक्षा यादी क्र.१ असणार आहे. सोडतीचा सविस्तर तपशिल महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर व वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिली.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments