Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedदगडूशेठ' गणपती मंदिरात 'श्रीराम पंचायतन यागा' सह रामनामाचा जयघोष*  *श्रीमंत दगडूशेठ...

दगडूशेठ’ गणपती मंदिरात ‘श्रीराम पंचायतन यागा’ सह रामनामाचा जयघोष*  *श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम*

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचा प्रारंभ श्रीराम पंचायतन याग आणि श्रीराम जप याने झाला. गणपती बाप्पा मोरया…सह रामनामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला.

 

श्रीराम पंचायन यज्ञाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. राजोपचार पूजा व गणेश वंदना , गणेश याग , श्रीराम भद्र मंडल, गणेश भद्र मंडल स्थापना, गणेश दुर्वा अर्चन, नवग्रह हवन करण्यात आले. तसेच पहाटे ६ वाजता श्रीराम जप देखील देखील मंदिरात पार पडला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

माणिक चव्हाण म्हणाले, शनिवारी, दि. २० जानेवारी रोजी मंदिरात सायंकाळी ५ वाजता सामुहिक श्रीराम रक्षा स्तोत्र पठण ५० महिला करणार आहेत. पठणात सहभागी होणा-या महिला श्रीराम मंदिर अयोध्या तीर्थ क्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरिजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरु असलेल्या गीता परिवार पुणे या संस्थेतील आहेत. यावेळी श्रीराम पंचायतन याग मध्ये आर्ष रामायण (वाल्मिकी रामायण) मधील बाल कांड हवन , श्रीराम सहस्त्रनामावली हवन , श्री सिता सहस्त्र नामावली हवन व तुलसी अर्चन होईल.

 

रविवारी, दिनांक २१ जानेवारी रोजी रामायणातील सुप्रसिद्ध सुंदर कांड हवन, श्रीमद हनुमद सहस्त्र नामावली हवन, भीमरूपी स्तोत्र पठण होणार आहेत. तर, दिनांक २२ जानेवारी रोजी श्रीराम लक्ष तुलसी अर्चन व पूणार्हुती होईल. याशिवाय सोमवारी सकाळी ११ वाजता श्री सालासर हनुमान चालीसा मंडल, पुणे तर्फे संगीतमय हनुमान चालीसा पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध भजनांच्या चालीवर आधारित ११ संगीतमय हनुमान चालीसा पाठाचा कार्यक्रम होणार आहे. मंडलाचे प्रशांत मुंदडा,सचिन जाजू, धिरज मुंदडा, प्रशांत राठी, निलेश जाजू, निलेश सारडा यांनी संयोजन केले आहे.

 

दुपारी १२.३० वाजता श्रीं ची महाआरती होणार असून मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात येईल. मंदिराबाहेर आणि उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे सकाळपासून प्रसाद वाटप देखील होणार आहे. तरी भक्तांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments