Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedनोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये पुण्‍यात १३,३७१ मालमत्तांची नोंदणी, मुद्रांक शुल्‍कामध्‍ये ४७५ कोटी रूपये...

नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये पुण्‍यात १३,३७१ मालमत्तांची नोंदणी, मुद्रांक शुल्‍कामध्‍ये ४७५ कोटी रूपये महसूल गोळा: नाइट फ्रँक इंडिया

पुण्‍यामध्‍ये जानेवारी ते नोव्‍हेंबर २०२४ कालावधीदरम्‍यान १,७२,६७७ मालमत्तांची नोंदणी झाली, ज्‍यामध्‍ये वार्षिक २५ टक्‍क्‍यांची वाढ झाली

· याच कालावधीदरम्‍यान मालमत्ता नोंदणींमधून ६,४७९ कोटी रूपये मुद्रांक शुल्‍क गोळा करण्‍यात आले, ज्‍यामध्‍ये वार्षिक ३५ टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली

पुणे, डिसेंबर १६, २०२४: नाइट फ्रँक इंडियाने आपल्‍या नवीन अहवालामध्‍ये नमूद केले की नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये पुण्‍यात १३,३७१ मालमत्तांची नोंदणी झाली, ज्‍यामधून राज्‍याच्‍या तिजोरीत ४७५ कोटी रूपयांचा महसूल जमा झाला. नोव्‍हेंबर २०२३ च्‍या तुलनेत मालमत्ता नोंदणींमध्‍ये वार्षिक ११ टक्‍क्‍यांची घट झाली, तर मुद्रांक शुल्‍क संकलनांमध्‍ये माफक २ टक्‍क्‍यांची घट झाली. नोंदणींच्‍या तुलनेत महसूलामधील या कमी कपातीचे श्रेय उच्‍च मूल्‍य असलेल्‍या सदनिकांच्‍या व्‍यवहारांमधील वाढीला जाऊ शकते. १ कोटी रूपये व त्‍यापेक्षा अधिक किंमत असलेल्‍या मालमत्तांचे प्रमाण नोव्‍हेंबर २०२३ मधील १२ टक्‍क्‍यांवरून नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये १६ टक्‍क्‍यांपर्यत वाढले.

मासिक आधारावर मालमत्ता नोंदणींमध्‍ये ३६ टक्‍क्‍यांची घट झाली आणि महसूल संकलन ३७ टक्‍क्‍यांनी घसरले. हा कल दिवाळी व नवरात्र या उत्सव काळामुळे ऑक्टोबरमध्ये दिसून आला. नोव्‍हेंबरमध्‍ये हे संथगतीने सुरू असले तरी ऑक्‍टोबरमधील उच्‍च कामगिरीनंतर बाजारपेठेत गती मिळण्‍याची शक्‍यता आहे.

पण, दिवाळीचा महिना वगळता आर्थिक वर्ष २०२४ (एप्रिल-नोव्‍हेंबर) मधील सरासरी मासिक नोंदणींच्‍या तुलनेत सरासरी नोंदणी १३,२८८ होती. हे पाहता, नोव्‍हेंबर महिन्‍यात सातत्‍यता दिसण्‍यात आली, जेथे १३,३७१ मालमत्तांची नोंदणी झाली.

मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्‍क संकलन

Period

Registrations (Units)

Stamp duty collection (INR cr)

Nov-23

14,988

485

Nov-24

13,371

475

YoY Change

-11%

-2%

मालमत्ता नोंदणी, मालमत्तेचे मूल्‍य आणि मुद्रांक शुल्‍क संकलन

Period

(Jan-Nov)

Total registration

Stamp duty collection (INR cr)

Jan to Nov 2022

125,702

4,344

Jan to Nov 2023

137,598

4,791

Jan to Nov 2024

172,677

6,479

2024 YoY

25%

35%

मालमत्ता नोंदणी, मालमत्तेचे मूल्‍य आणि मुद्रांक शुल्‍क संकलन

Year

Month

Total Registration

Stamp Duty Collection

(INR Cr)

2023

November

14,988

485

2023

December

14,725

560

2024

January

17,786

589

2024

February

18,791

662

2024

March

22,189

822

2024

April

14,244

566

2024

May

12,280

547

2024

June

14,690

545

2024

July

13,731

521

2024

August

13,397

592

2024

September

11,056

508

2024

October

20,894

751

2024

November

13,371

475

स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्‍ट्र सरकार – नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर)

२०२४ च्‍या पहिल्‍या अकरा महिन्‍यांमध्‍ये पुण्‍याच्‍या निवासी क्षेत्रातील मालमत्ता विक्री नोंदणीमध्‍ये प्रबळ वाढ दिसण्‍यात आली, जेथे मालमत्ता विक्रीमध्‍ये जवळपास १.७५ लाख युनिट्सची नोंदणी झाली आणि गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये झपाट्याने वाढ झाली आहे. शहराने २०२३ मधील याच कालावधीच्‍या तुलनेत २५ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह १७२,६७७ मालमत्ता नोंदणींची नोंद केली. मुद्रांक शुल्‍क संकलनाने मोठ्या वाढीची नोंद करत ६,४७९ कोटी रूपयांचा टप्‍पा पार केला, ज्‍यामध्‍ये वार्षिक ३५ टक्‍क्‍यांची वाढ झाली.

पुण्‍यामध्‍ये सुरू असलेले पायाभूत सुविधा विकास, इतर प्रमुख शहरांच्‍या तुलनेत किफायतशीरपणा आणि मालकीहक्‍काचे घर असण्‍याप्रती प्रबळ ओढ यामुळे ही प्रभावी कामगिरी झाली. या सर्व घटकांनी संपूर्ण २०२४ मध्‍ये प्रबळ मागणीला गती दिली.

नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये १ कोटी रूपये व त्‍यापेक्षा उच्‍च मूल्‍य असलेल्‍या सदनिकांच्‍या मागणीत वाढ दिसण्‍यात आली

पुण्‍यातील गृहनिर्माण बाजारपेठेत १ कोटी रूपये व त्‍यापेक्षा उच्‍च मूल्‍य असलेल्‍या मालमत्तांसाठी मागणी वाढली. लक्‍झरी विभागाने नोव्‍हेंबर २०२३ मधील १२ टक्‍क्‍यांवरून नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये १६ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली. दरम्‍यान, ५० लाख रूपये ते १ कोटी रूपयांपर्यंतच्‍या सदनिका गृहखरेदीदारांमध्‍ये सर्वात लोकप्रिय राहिल्‍या.

निवासी मालमत्ता व्‍यवहारांसाठी तिकिट आकाराचे प्रमाण

Ticket size

Share in Nov 2023

Share in Nov 2024

Under INR 25 lakhs

22%

21%

INR 25 – 50 lakhs

33%

31%

INR 50 lakhs – 1 Cr

32%

32%

INR 1 Cr – 2.5 Cr

11%

14%

INR 2.5 Cr – 5 Cr

1%

2%

Over 5 Cr

<=1% <=1% स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्‍ट्र सरकार - नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर) नाइट फ्रँक इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक शिशिर बैजाल म्‍हणाले, “पुण्‍यातील निवासी बाजारपेठेमध्‍ये स्थिर नोंदणींचे प्रमाण दिसत आहे, ज्‍याचे श्रेय ग्राहकांमध्‍ये वाढती पसंती आणि बाजारपेठ स्थितींना जाते. नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये मालमत्ता नोंदणी व महसूल संकलनांत घटची नोंद झाली असली तरी पुण्‍याची आतापर्यंतची कामगिरी प्रबळ राहिली आहे, जेथे जानेवारी ते नोव्‍हेंबर २०२४ कालावधीदरम्‍यान मालमत्ता नोंदणींनी १.७२ लाख युनिट्सचा टप्‍पा पार केला, ज्‍यामध्‍ये वार्षिक २५ टक्‍क्‍यांची वाढ झाली. तसेच, मुद्रांक शुल्‍क संकलनांमध्‍ये ३५ टक्‍क्‍यांची वाढ झाली. या वाढीमधून शहरातील प्रबळ निवासी मागणी दिसून येते, ज्‍याला वाढते उत्‍पन्‍न, स्थिर वित्तपुरवठा पर्याय आणि सुरू असलेल्‍या पायाभूत सुविधांचा विकास यांचा पाठिंबा आहे. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे, पुण्‍यातील निवासी बाजारपेठेमधून प्रीमियम घरांसाठी वाढती पसंती आणि दीर्घकालीन गुंतवणूका दिसून येतात, ज्‍यामुळे पुणे शहर भारतातील गृहखरेदीदारांसाठी आघाडीचे गंतव्‍य बनले आहे.'' मोठ्या सदनिकांसाठी उच्‍च मागणी कायम ८०० चौरस फूटांहून अधिक जागा असलेल्‍या सदनिकांचे प्रमाण नोव्‍हेंबर २०२३ मधील २८ टक्‍क्‍यांवरून नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये ३२ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले, ज्‍यामधून महामारीनंतर देखील मोठ्या सदनिकांसाठी सतत मागणी होत असल्‍याचे दिसून येते. निवासी मालमत्ता व्‍यवहारांसाठी क्षेत्राचे प्रमाण Area in sq ft Share in Nov 2023 Share in Nov 2024 Under 500 28% 23% 500-800 44% 45% 800-1000 13% 14% 1000- 2000 12% 15% Over 2000 3% 3% स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्‍ट्र सरकार - नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर) नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये सेंट्रल पुण्‍यामध्‍ये एकूण निवासी व्‍यवहारांपैकी ८० टक्‍के व्यवहारांची नोंद नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये हवेली तालुका, पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांचा समावेश असलेले सेंट्रल पुणे निवासी व्‍यवहारांसाठी प्रमुख हब राहिले, ज्‍याचे बाजारपेठेत ८१ टक्‍क्‍यांचे मोठे योगदान होते. असे असताना देखील हे प्रमाण गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीच्‍या तुलनेत काहीसे कमी झाले आहे, तसेच शहरातील इतर भागांमधील नवीन पुरवठा पुण्‍यातील गृहखरेदीदारांच्‍या सतत बदलत असलेल्‍या गरजांची पूर्तता करत आहेत. मावळ, मुळशी व वेल्‍हे यांसारख्‍या भागांचा समावेश असलेल्‍या पश्चिम पुणेने निवासी व्‍यवहारांमध्‍ये १२ टक्‍क्‍यांसह दुसरे सर्वात मोठै प्रमाण सुनिश्चित केले. तसेच याच कालावधीदरम्‍यान उत्तर, दक्षिण व पूर्व पुणेचे एकत्रित निवासी व्‍यवहारांमध्‍ये प्रमाण ६ टक्‍के होते. निवासी मालमत्ता व्‍यवहारांसाठी सूक्ष्‍म बाजारपेठांचे प्रमाण Micro market Share in November 2023 Share in November 2024 North 5% 4% South 3% 1% East 1% 1% West 9% 12% Central 82% 81% स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्‍ट्र सरकार - नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर) Micro Markets Zone Taluka North Junnar, Ambegaon, Khed South Bhor, Purandhar, Baramati, Indapur East Shirur, Daund West Mawal, Mulshi, Velhe Central Haveli, Pune city (Pune Municipal corporation (PMC) & Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC))

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments