Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorized*१९७१ युद्ध विजय दिवस* निमित्त स.प.महाविद्यालय येथे उद्या मंगळवार १७ डिसेंबर रोजी...

*१९७१ युद्ध विजय दिवस* निमित्त स.प.महाविद्यालय येथे उद्या मंगळवार १७ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर व उत्कृष्ट छात्र सैनिक पुरस्कार वितरण कार्यक्रम

पुणे
(प्रतिनिधी)
मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद,स.प. महाविद्यालय,राष्ट्रीय छात्र सेना आणि सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १९७१ सालच्या भारत – पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी विजय दिन निमित्ताने भव्य *रक्तदान शिबिराचे* आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी साडे आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत या वेळेत स.प.महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होईल.
तसेच याच दिवशी सकाळी ११.३० वाजता अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद आणि स.प.महाविद्यालय,येथे *विजय दिवस* साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात मेजर एच डी मांजरेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट एन.सी.सी. कॅडेट पुरस्कार एन.सी.सी. कॅडेट्सना प्रदान केला जाईल.या विशेष प्रसंगी १९७२ च्या युद्धातील भाग घेतलेले ज्येष्ठ युद्धवीर यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे.
सर्व नागरिकांनी या दोन्ही कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments