Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुखापतींवर वेळेवर व योग्य उपचार आवश्यक - डॉ. प्रसन्न पाठक ...

दुखापतींवर वेळेवर व योग्य उपचार आवश्यक – डॉ. प्रसन्न पाठक इंग्लंडमधील लीड्स बेकेट विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची पीडीएमबीए बॅडमिंटन संकुलाला भेट

 

पुणे, 20 जानेवारी 2024: सध्याच्या खेळाडूंमध्ये तरुण वयातच संत्यांच्या व हाडांच्या गंभीर दुखापती होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी वेळीच दुखापतींचे स्वरूप समजवून घेऊन त्यावर योग्य व वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे, असे दुखापत प्रतिबंध आणि व्यवस्थापन या विषयावर बोलताना क्रिडा मानसतज्ञ डॉ. प्रसन्न पाठक यांनी सांगितले.

 

इंग्लंडमधील लीड्स बेकेट विद्यापीठाच्या कार्नेगी स्कूल ऑफ स्पोर्टस मधील विद्यार्थ्यांनी पुण्यातील पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या मॉडर्न बॅडमिंटन संकुलाला भेट दिली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना डॉ. पाठक दुखापतीशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पीडीएमबीएचे खजिनदार सारंग लागु, आयएसएमएस इन्स्टिट्यूटच्या संचालिका शालिनी बॅनर्जी, स्टीफन रॉबसन, जो क्लार्क आदी मान्यवर उपस्थित होते.

 

खेळाचा सराव करण्यापूर्वी किंवा सामना सुरू होण्यापूर्वी योग्य प्रकारे वॉर्मिंग अप केल्यास तसेच सराव किंवा सामना संपल्यानंतर तंत्रशुद्ध पद्धतीने कुल डाऊन केल्यास दुखापती टाळणे किंवा त्यांना प्रतिबंध करणे शक्य होईल, असे सांगुन पाठक म्हणाले की, प्रत्येक खेळासाठी योग्य मुलभूत हालचाल शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. तसेच, स्नायू अखडणे किंवा गोळे येणे टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

 

दुखापत झाल्यास राईस (आरआयसी) म्हणजेच रेस्ट, आईस, कॉम्प्रेशन आणि एलोव्हेशन म्हणजेच पूर्ण विश्रांती, बर्फाने शेक, घट्ट बांधून ठेवणे आणि दुखापत ग्रस्त अवयव उंचावर टांगून ठेवणे हा उपाय सर्वप्रथम करावा लागतो, असे सांगून डॉ पाठक म्हणाले की, बर्फाने शेक घेणे व गरम पाण्याने शेक घेणे या दोन्ही उपायांचा योग्य वापर केल्यास दुखापत लवकर बरी होण्यास मदत होते. कृत्रिम प्रोटीनचे अतिरिक्त सेवन करणेही खेळाडूंसाठी घातक ठरते.

 

पीडीएमबीएचे खजिनदार सारंग लागु यांनी पुणे हे बॅडमिंटनचे जन्मस्थान असल्याचे सांगून बॅडमिंटन हा जगातील सर्वाधिक सहभाग असलेला दुसऱ्या क्रमांकाचा खेळ असल्याचे नमूद केले. ब्रिटिश सेना दलातील अधिकाऱ्यांनी 1860च्या दशकात शोधून काढलेला हा खेळ नंतर जगभरात प्रसिद्ध झाला. 1904मध्ये भारतीय बॅडमिंटन संघटनेची 1946 मध्ये महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेची आणि 1969मध्ये पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेची स्थापना करण्यात आली.

 

भेट देणाऱ्या ब्रिटिश विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी नियमित बॅडमिंटन खेळतात असे सांगून ते म्हणाले की, या भेटीच्या निमित्ताने बॅडमिंटनचा श्रीगणेशा केल्यास ही भेट खऱ्या अर्थाने सार्थकी ठरेल.

 

आयएसएमएस इन्स्टिट्यूटच्या संचालिका शालिनी बॅनर्जी यांनी ब्रिटिश विद्याथ्र्यांचे स्वागत केले. इन्स्टिट्युटच्या समर स्कूलला भेट दिल्यामुळे ब्रिटिश विद्यार्थ्यांना भारतातील क्रिडा क्षेत्राच्या विकासाची खरी कल्पना येईल असे सांगून त्या म्हणाल्या की, आयएसएमएस इन्स्टिट्युटचे विद्यार्थी भविष्यात उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जातील आणि लीड्स बेकेट विद्यापीठाला भेट देतील तेव्हा ब्रिटिश विद्यार्थ्यांनी निर्माण केलेला संवाद त्यांना उपयुक्त ठरेल. बहुतांश ब्रिटिश विद्यार्थी क्रिडा क्षेत्रातील शिक्षण घेत असून त्यामुळे भारता सारख्या विकसनशील देशातील विदुर्थायाना व्यक्तिमत्व विकासासाठी क्रिडा क्षेत्राचा उपयोग कसा होतो हे नक्कीच सम

जले असेल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments