Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedजीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी सादर केले लिंक:...

जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी सादर केले लिंक: https://www.electronicsbazaar.com/media/investor/DRHP.pdf

जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, लॅपटॉप्स आणि डेस्कटॉप्सची भारतातील सर्वात मोठी रिफर्बीशर, जगभरातील आणि भारतातील सर्वात मोठ्या आयसीटी डिव्हायसेसच्या रिफर्बीशरपैकी एक, ३१ मार्च २०२४ रोज मूल्यानुसार, भारत, यूएसए, आफ्रिका आणि युएईमध्ये मजबूत स्थान असलेल्या या कंपनीने बाजारपेठ नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रोस्पेक्स्टस सादर केले आहे.

या आयपीओमध्ये ८२५ कोटी रुपयांपर्यंतचे, प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेले इक्विटी समभाग नव्याने जारी करण्यात आले आहेत आणि प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेले ९७,००,००० इक्विटी समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आले आहेत. विक्रीसाठीच्या प्रस्तावामध्ये शरद खंडेलवाल यांच्याकडून ३५,००० पर्यंत, विधी शरद खंडेलवाल यांच्याकडून ३५,००० पर्यंत आणि अमीएबल इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून ९६,३०,००० पर्यंत इक्विटी समभाग यांचा समावेश आहे.

“इलेक्ट्रॉनिक्स बझार” या ब्रँड नावाने कार्यरत असलेली जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड रिफर्बीशमेंटच्या संपूर्ण मूल्य शृंखलेमध्ये कार्यरत आहे, सोर्सिंगपासून रिफर्बीशमेंट ते विक्रीपर्यंत, विक्रीपश्चात सेवा आणि वॉरंटी देण्यापर्यंत सर्व सेवासुविधा ही कंपनी पुरवते. या कंपनीच्या आयसीटी डिव्हायसेसच्या रिफर्बीशमेंटच्या सर्वसमावेशक प्रक्रियेमध्ये लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स, टॅबलेट्स, सर्व्हर्स, प्रीमियम स्मार्टफोन, मोबाईल वर्कस्टेशन, ऍक्सेसरीज यांचा समावेश आहे, कामगिरी आणि दिसण्याच्या बाबतीत ही डिव्हायसेस अगदी नव्यासारखी दिसली पाहिजेत याची पुरेपूर काळजी यामध्ये घेतली जाते. नवीन लॅपटॉप्सच्या तुलनेत हे लॅपटॉप एक-तृतीयांश किमतींमध्ये मिळतात, डेस्कटॉप, टॅबलेट, सर्व्हर, प्रीमियम स्मार्टफोन, मोबाईल वर्कस्टेशन्स आणि ऍक्सेसरीज नवीन डिव्हायसेसच्या तुलनेत ३५ ते ५०% किमतींमध्ये मिळतात. ही कंपनी रिपेयर-ओव्हर-रिप्लेसमेंट दृष्टिकोनाचे पालन करते, यामध्ये कमी किमतीचा फायदा मिळतो, कार्बन फूटप्रिंट कमी करून खऱ्या अर्थाने सस्टेनेबिलिटी साध्य करता येते.

ग्राहकांना सुविधा आणि विश्वास मिळावा यासाठी रिफर्बीश केलेल्या आयसीटी डिव्हायसेसवर वॉरंटी देण्याची संकल्पना सर्वात पहिल्यांदा आणणाऱ्या काही कंपन्यांपैकी एक ही कंपनी आहे. अजूनही ही कंपनी या उद्योगक्षेत्रातील चांगल्या वॉरंटी टर्म्स देते. आर्थिक वर्ष २०२४ च्या आकडेवारीनुसार, रिफर्बीशिंग क्षमता लक्षात घेता, ही भारतातील सर्वात मोठी मायक्रोसॉफ्ट अथॉराईज्ड रिफर्बीशर आहे. २०२४ कॅलेंडर वर्षातील मार्केट कॅपिटलायजेशनच्या संदर्भात ही कंपनी भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या सॉफ्टवेयर कंपनीची आयटी ऍसेट डिस्पोजल पार्टनर देखील आहे, जी त्यांच्या वापरलेल्या आयटी ऍसेट्सना प्रोक्युअर करते. कॅलेंडर वर्ष २०२३ मधील बाजारपेठ हिस्सेदारी अनुक्रमे २४% आणि २१% असलेले, आघाडीचे ग्लोबल ब्रँड्स, लेनोवो आणि एचपी यांची ही सर्टिफाईड रिफर्बीशमेंट पार्टनर आहे.

या कंपनीकडे स्टॉक कीपिंग युनिट्सची विशाल श्रेणी आहे, ३० सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ४९९६ एसकेयू होते. त्यांनी विक्री नेटवर्क स्थापित केले असून, ३० सप्टेंबर २०२४ रोजीच्या माहितीनुसार त्यांची रिफर्बीश केलेली आयसीटी डिव्हायसेस ३५ देशांमध्ये विकली जात होती. ४४७ सप्लायर्सचे मल्टी-चॅनेल ग्लोबल प्रोक्युअरमेंट नेटवर्क, भारत आणि संपूर्ण जगभरात त्यांनी विशाल प्रोक्युअरमेंट नेटवर्क निर्माण केले आहे. ३० सप्टेंबर २०२४ च्या माहितीनुसार, त्यांच्या प्रोक्युअरमेंट नेटवर्कमध्ये कॉर्पोरेट्स, कन्सल्टिंग कंपन्या, मध्यस्थ, रिसायकलर्स, रिफर्बीशमेंट पार्टनर्स, शिक्षण संस्था, लीजिंग कंपन्या, एनबीएफसी, मोठमोठी रिटेल स्टोर्स, ओईएम ब्रँड स्टोर्स यांचा समावेश आहे. त्यांच्या काही प्रमुख प्रोक्युअरमेंट पार्टनर्समध्ये यूएसएमधील आयरन माउंटन अँड अप्टो सोल्युशन्स आयएनसी; ऑस्ट्रेलियामधील ग्रीन बॉक्स ग्रुप पीटीवाय लिमिटेड आणि रीन्यु आयटी पीटीवाय लिमिटेड; एचपी, लेनोवो, मायक्रोसॉफ्ट, टाटा कॅपिटल लिमिटेड आणि स्टेलर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार, त्यांचे ३२६५ ग्राहक आहेत.

३० सप्टेंबर, २०२४ च्या माहितीनुसार, ही कंपनी ३५ देशांमध्ये कार्यरत आहे, यामध्ये उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया, आशिया पॅसिफिक, युरोप, आफ्रिका आणि मध्य पूर्व यांचा समावेश आहे. भारत, यूएसए आणि युएईमध्ये त्यांच्या पाच रिफर्बीशिंग फॅसिलिटीज आहेत, एक फॅसिलिटी भारत, महाराष्ट्रात, नवी मुंबईमध्ये, एक फॅसिलिटी यूएसए, टेक्सस, डल्लासमध्ये आणि तीन फॅसिलिटीज शारजा, युएईमध्ये आहेत. यांची एकूण जागा ५८१२७.८२ चौरस फीट आहे. भारत, मध्य पूर्व, युरोप, आफ्रिका आणि यूएसएमध्ये पोहोच वाढवता यावी, त्याबरोबरीनेच क्षेत्रीय बाजारपेठांमध्ये सेवा सुविधा पुरवता याव्यात यासाठी त्यांच्या फॅसिलिटीज मोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होण्यात, डिलिव्हरी लवकरात लवकर देण्यात आणि संचालन कार्यक्षमता वाढवण्यात मदत मिळते.

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अड्वायजर्स लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (आधीची आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड) आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments