पुणे : श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्थेच्या वतीने साई उत्सवाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण १०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी संस्थेच्या वतीने १० शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि रक्तदाते सदाशिव कुंदेन यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुषार कैलास झेंडे, कुमार लांडे, ओंकार लांडगे, केतन कुदळे, सनी झेंडे, साई धंगेकर, संजय पवळे, वैभव नवसे, उमेश झेंडे, कैलास जाधव, विजय मोरे, योगेश झेंडे, संदीप गवळी, विजय साळवे, दिनेश गालफाडे, अमोल शिंदे, राहुल ढमाले, संकोष वाघमारे, तसेच शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदाशिव कुंदेन म्हणाले, धार्मिक उत्सव साजरा करताना त्याला सामाजिकतेची जोड देणेही आवश्यक आहे. युवा कार्यकर्ते साई उत्सव साजरा करताना त्यांनी रक्तदान केले. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देखील केली, हे कौतुकास्पद आहे.


