Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorized2024 मध्‍ये पुण्‍यातील वार्षिक कार्यालयीन व्‍यवहारांमध्‍ये ऐतिहासिक वाढीचीनोंद; शहरामध्‍ये निवासी विक्री देखील...

2024 मध्‍ये पुण्‍यातील वार्षिक कार्यालयीन व्‍यवहारांमध्‍ये ऐतिहासिक वाढीचीनोंद; शहरामध्‍ये निवासी विक्री देखील आतापर्यंतची सर्वोच्‍च: नाइट फ्रँक इंडिया

पुणे, जानेवारी 7, 2025: नाइट फ्रँक इंडियाने आपला नवीन अहवाल इंडिया रिअल इस्‍टेट: कार्यालय व निवासी (जुलै-डिसेंबर 2024) मधून निदर्शनास आणले की, पुण्‍यातील कार्यालयीन बाजारपेठेने 2024 मध्‍ये उल्‍लेखनीय वाढ दाखवली, जेथे 8 दशलक्ष चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर देण्‍याची नोंद झाली, ज्‍यामध्‍ये वार्षिक 19 टक्‍क्‍यांची वाढ करत कार्यालयीन व्‍यवहारांसाठी आातपर्यंतच्‍या सर्वोत्तम वर्षाची नोंद झाली. प्रबळ पहिली सहामाही, तसेच दुसऱ्या सहामाहीत काही रिकॅलिब्रेशन्‍स असतानाही मागणीला मिळालेली स्थिर गती यांना या प्रभावी कामगिरीचे श्रेय जाते. 2024 च्‍या दुसऱ्या सहामाहीदरम्‍यान जागा भाडेतत्त्वावर देण्‍याच्‍या अॅक्टिव्हिटी 3.6 दशलक्ष चौरस फूटांवर राहिल्‍या. 2024 दरम्‍यान कार्यालयीन भाड्यांमध्‍ये वार्षिक 5 टक्‍क्‍यांची वाढ झाली.

2024 मध्‍ये पुण्‍यात 5.7 दशलक्ष चौरस फूट नवीन कार्यालयीन जागेची भर दिसण्‍यात आली, ज्‍यामध्‍ये वार्षिक 58 टक्‍क्‍यांची लक्षणीय वाढ झाली. यापैकी 3.3 दशलक्ष चौरस फूट जागा 2024 च्‍या दुसऱ्या सहामाहीत सादर करण्‍यात आली, ज्‍यामधून विकासकांमधील वाढता आत्‍मविश्‍वास दिसून येतो. 2024 मध्‍ये झालेल्‍या एकूण व्‍यवहारांपैकी शहरातील कार्यालयीन जागा व्‍यवहारांमधून एकूण प्रमाणामध्‍ये फ्लेक्‍स व्‍यवहारांचा 35 टक्‍के हिस्‍सा होता.

पुण्‍यातील निवासी बाजारपेठेने देखील 2024 मध्‍ये 52,346 युनिट्सच्‍या विक्रीची सर्वोच्‍च नोंद केली, ज्‍यामध्‍ये वार्षिक 6 टक्‍क्‍यांची वाढ झाली. तसेच, पुण्‍यातील निवासी युनिट्सच्‍या भारित सरासरी किमतीत वार्षिक 6 टक्‍क्‍यांची वाढ झाली, जी प्रति चौरस फूट 4,778 रूपयांपर्यंत पोहोचली. शहरातील 5 दशलक्ष रूपये ते 10 दशलक्ष रूपये तिकिट आकार श्रेणीत सर्वोच्‍च विक्री दिसण्‍यात आली, जेथे 2024 मध्‍ये शहरातील एकूण विक्रीमध्‍ये 45 टक्‍क्‍यांचे योगदान दिले आणि 23,798 युनिट्सची विक्री झाली.

कार्यालयीन बाजारपेठ अपडेट: जानेवारी – डिसेंबर 2024

पुणे कार्यालयीन बाजारपेठ सारांश

Parameter

2024

2024 Change (YoY)

Completions in mn sq ft

5.7

58%

Transactions in mn sq ft

8.0

19%

Average transacted rent in

INR/sq ft/month

77

5%

टिप: 1 चौरस मीटर (चौ. मी.) = 10.764 चौरस फूट (चौ. फूट), स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च

पुण्‍यातील व्‍यावसायिक कार्यालयीन बाजारपेठेने 2005 पासून जागा भाडेतत्त्वावर देण्‍याच्‍या अॅक्टिव्हिटीमध्‍ये सर्वोच्‍च वाढीची नोंद केली, जेथे 2024 मध्‍ये जवळपास 8 दशलक्ष चौरस फूट कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर देण्‍यात आली, ज्‍यामध्‍ये 2023 मधील 6.7 दशलक्ष चौरस फूट जागेच्‍या तुलनेत वार्षिक 19 टक्‍क्‍यांची वाढ झाली. मागणीमधील या वाढीचे श्रेय प्रामुख्‍याने फ्लेक्‍स क्षेत्राला जाते, ज्‍यानंतर भारतात कार्यरत व्‍यवसायांचा क्रमांक आहे. पुण्यातील फ्लेक्‍स स्‍पेस व्‍यवहारांमधील वाढीचे श्रेय वाढत्‍या स्‍टार्टअप इकोसिस्टम आणि हायब्रिड वर्क मॉडेल्‍सच्‍या वाढत्‍या अवलंबनाला जाते. तसेच, भारतात कार्यरत असलेले व्‍यवसाय समकालीन कार्यालयीन जागांसाठी मागणीला गती देत आहेत, जेथे त्‍यांनी शहरातील त्‍यांची कार्यसंचालने वाढवणे सुरू ठेवले आहे.

पुणे बाजारपेठेत फ्लेक्‍स कार्यालयीन जागा सर्वाधिक प्रमाणात भाडेतत्त्वावर देण्‍याचे दिसण्‍यात आले, जेथे 35 टक्‍के जागा व्‍यापून घेत 2.8 दशलक्ष चौरस फूट जागांचे व्‍यवहार करण्‍यात आले आणि 2023 मधील 1.3 दशलक्ष चौरस फूट जागांच्‍या व्‍यवहारांच्‍या तुलनेत वार्षिक 112 टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली. यानंतर भारतात कार्यरत असलेल्‍या व्‍यवसायांनी व्‍यवहार करण्‍यात आलेल्‍या जागांमध्‍ये 31 टक्‍के जागा व्‍यापून घेत 2.5 दशलक्ष चौरस फूट जागांचे व्‍यवहार केले, जेथे गेल्‍या वर्षीच्‍या 1.8 दशलक्ष चौरस फूट जागांच्‍या तुलनेत 41 टक्‍क्‍यांची वाढ झाली. पुण्‍यातील विशेषत: एसबीडी पूर्व व खराडी येथील जीसीसी सेटअप्‍समध्‍ये सतत वाढ दिसण्‍यात आली, ज्‍याचे श्रेय त्‍यांचे कुशल टॅलेंट समूह आणि खर्चासंदर्भात बचतींना जाते. 2024 मध्‍ये, जीसीसींचे एकूण व्‍यवहारांमध्‍ये 19 टक्‍के प्रमाण होते.

End-User Licensee/Buyer

Flex

India-Facing Business

GCC

Third Party IT

Total

Area transacted in mn sq ft

2.8

2.5

1.5

1.2

8

स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च

कार्यालयीन भाडेसंदर्भात, पुण्‍यातील कार्यालयीन बाजारपेठेत 2024 मध्‍ये पुरेशी वाढ दिसण्‍यात आली, जिने वार्षिक 5 टक्‍के वाढीसह महामारीपूर्वीच्‍या पातळ्यांना मागे टाकले. 2023 मध्‍ये प्रतिमहिना प्रतिचौरस फूट 73.5 रूपयांवरून 2024 मध्‍ये भाड्यांमध्‍ये प्रतिमहिना प्रतिचौरस फूट 77 रूपयांपर्यंत वाढ झाली. या वाढीव ट्रेण्‍डमधून विशेषत: प्रमुख ठिकाणांमधील ऑक्‍यूपायरची शाश्‍वत मागणी दिसून येते.

नाइट फ्रँक इंडियाचे ऑक्‍यूपायर सर्विसेस्, कॅपिटल मार्केट्सचे राष्‍ट्रीय संचालक व पुण्‍यातील ब्रांच हेड पी. विलास म्‍हणाले, ”पुण्‍यातील कार्यालयीन बाजारपेठ सर्वसमावेशक ऑक्‍यूपायर गरजांची पूर्तता करत प्रगत होत आहे. स्थिर वर्कप्‍लेसेस्, हायब्रिड मॉडेल्‍स व शाश्‍वततेवरील वाढत्‍या फोकससह शहर भावी आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी उत्तमरित्‍या सज्‍ज आहे. पायाभूत सुविधांमध्‍ये सुधारणा, तसेच बीएफएसआय व आयटी/आयटीईएस अशा क्षेत्रांकडून शाश्‍वत मागणी 2025 मध्‍ये अधिक वाढीला चालना देण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे भारतातील सर्वात गतीशील व स्थिर कार्यालयीन बाजारपेठ म्‍हणून पुणेचे स्‍थान अधिक दृढ होईल.”

निवासी बाजारपेठ अपडेट: जानेवारी – डिसेंबर 2024

2024 मध्‍ये, पुण्‍यातील रिअल इस्‍टेट बाजारपेठेने सतत वाढ दाखवली, जेथे 2010 पासून सर्वोच्‍च निवासी विक्रीची नोंद केली. वर्षातील दुसऱ्या सहामाहीत मोठे योगदान दिसण्‍यात आले, जेथे पहिल्‍या सहामाहीमधील 24,525 युनिट्सच्‍या तुलनेत 27,821 युनिट्सची विक्री झाली. आयटी व्‍यावसायिकांकडून प्रबळ मागणीला, सुरू असलेले पायाभूत सुविधा विकास आणि ग्राहकांचे बदलते प्राधान्‍यक्रम यांना या वाढीचे श्रेय जाते. पुणे डायनॅमिक रिअल इस्‍टेट हब म्‍हणून कायम असून किफायतशीरपणा व प्रीमियम पर्यायांचे एकत्रिकरण देत आहे.

पुण्‍यातील निवासी बाजारपेठेत नवीन प्रकल्‍प सादरीकरणामध्‍ये मोठी वाढ दिसण्‍यात आली, जे 2024 मध्‍ये एकूण 59,548 युनिट्सच्‍या सादरीकरणासह आतापर्यंतचे सर्वोच्‍च ठरले. यामध्‍ये वार्षिक 40 टक्‍क्‍यांची वाढ झाली, जी भारतातील आठ प्रमुख शहरांमध्‍ये सर्वोच्‍च आहे. 2024 च्‍या दुसऱ्या सहामाहीत देखील 31,501 युनिट्स सादर करण्‍यात आले, जेथे वर्षाच्‍या दुसऱ्या सहामाहीतील सादरीकरणांमध्‍ये 2023 च्‍या दुसऱ्या सहामाहीमधील 21,203 युनिट्सच्‍या तुलनेत वार्षिक 49 टक्‍क्‍यांची वाढ झाली.

पुणे निवासी बाजारपेठ सारांश

Parameter

2024

2024 Change% (YoY)

Launches (housing units)

59,548

40%

Sales (housing units)

52,346

6%

Average price in INR/sq ft

4,778

6%

टिप: 1 चौरस मीटर (चौ. मी.) = 10.764 चौरस फूट (चौ. फूट), स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च

2024 मध्‍ये, पुण्‍यातील 100 दशलक्ष रूपये ते 200 दशलक्ष रूपये (10 कोटी रूपये ते 20 कोटी रूपये) आकार असलेल्‍या गृहनिर्माण विभागामध्‍ये सर्वोच्‍च वार्षिक वाढ दिसण्‍यात आली, जेथे 2023 मधील 8 युनिट्सच्‍या तुलनेत 122 टक्‍क्‍यांची वाढ होत 18 युनिट्सची विक्री झाली. 20 दशलक्ष रूपये ते 50 दशलक्ष रूपये (2 कोटी रूपये ते 5 कोटी रूपये) तिकिट आकारामधील गृहनिर्माण विभागात वार्षिक 68 टक्‍के वाढीसह दुसरी सर्वोच्‍च वाढ दिसण्‍यात आली, जेथे 2023 मधील 1,289 युनिट्सच्‍या तुलनेत 2024 मध्‍ये 2,166 युनिट्सची विक्री झाली. मध्‍यम-श्रेणीच्‍या विभागाने (5 दशलक्ष रूपये ते 10 दशलक्ष रूपये) पुण्‍यातील बाजारपेठेत प्रभुत्‍व कायम राखले, जेथे 2024 मध्‍ये 23,798 युनिट्सच्‍या विक्रीसह सर्वोच्‍च विक्रीची नोंद केली.

विक्रीची तिकिट आकारानुसार विभागणी

Ticket Size Categories

<5 mn 5-10 mn 10-20mn 20-50 mn 50-100 mn 100-200 mn Total 2024 17,304 23,798 8,987 2,166 73 18 52,346 YoY % change -8% 4% 46% 68 9% 122% 6% स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च पुण्‍यातील इन्‍व्‍हेंटरी लेव्‍हल्‍स 2024 मध्‍ये 18 टक्‍क्‍यांनी वाढल्‍या, ज्‍याचे प्रमुख श्रेय पुरवठ्यामधील वाढीला जाते. या वाढीनंतर देखील क्‍वॉर्टर्स टू सेल (क्‍यूटीएस) मेट्रिक 3.7 क्‍वॉर्टर्ससह प्रबळ राहिले, ज्‍यामधून जलद अवलंबन दर आणि प्रबळ ग्राहक मागणी दिसून येते. नाइट फ्रँक इंडियाचे ऑक्‍यूपायर सर्विसेस्, कॅपिटल मार्केट्सचे राष्‍ट्रीय संचालक व पुण्‍यातील ब्रांच हेड पी. विलास म्‍हणाले, ''पुण्‍यातील निवासी बाजारपेठ अंतिम वापरकर्त्‍यांकडून प्रबळ मागणी, सुरू असलेले पायाभूत सुविधा विकास आणि जीवनशैली-केंद्रित गृहनिर्माण सोल्‍यूशन्‍सवर भर यामुळे प्रबळ मागणीला चालना देत सतत वाढ करत राहण्‍यास सज्‍ज आहे. विकासक ग्राहकांच्‍या बदलत्‍या प्राधान्‍यक्रमांनुसार पुरवठा समायोजित करत असताना पुणे शहर भारतातील रिअल इस्‍टेट क्षेत्रात मोठे हब म्‍हणून कायम आहे. मेट्रो कॉरिडर सारखे पायाभूत सुविधा प्रकल्‍प आणि विस्‍तारित रोड नेटवर्क्‍सनी शहरातील कनेक्‍टीव्‍हीटीमध्‍ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे, ज्‍यामुळे उदयोन्‍मुख निवासी क्षेत्रांप्रती ग्राहकांच्‍या रूचीमध्‍ये वाढ होत आहे. हे विकास पुण्‍यातील बाजारपेठ गतीशीलतेला अधिक चालना देत आहेत.''

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments