पुणे,16 जानेवारी 2025 : वानवडी येथील आर्कस हॉस्पिटल तर्फे सांधे रोपण आणि टोटल हिप रिप्लेसमेंट रोबोटिक प्रक्रियांचा 800 हुन अधिक शस्त्रक्रियांचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आर्कस हॉस्पिटलमधील सांधे रोपण शल्यचिकित्सक डॉ.रोहित लुथ्रा,डॉ.जुही लुथ्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
आर्कस हॉस्पिटलमधील सांधे रोपण शल्यचिकित्सक डॉ.रोहित लुथ्रा म्हणाले की,रोबोटिक तंत्रज्ञान हे अंशत: व संपूर्ण सांधेरोपण तसेच टोटल हिप रिप्लेसमेंटच्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. सांधेरोपण प्रक्रियेसाठी हाडांची तयारी, बाधित सांध्याच्या जागी त्याचे अचूक रोपण आणि एकंदर प्रक्रियेमध्ये अचूकता आणण्यासाठी रोबोटिक प्रणालीचा वापर केला जात आहे.कमी रक्तस्त्राव,कुठल्याही स्नायूला न होणारी इजा आणि अचूकता यामुळे रूग्णालयात राहण्याची गरज ही अर्ध्यावर आली आहे.
रोबोटिक प्रणालीच्या प्रक्रियेअंतर्गत थ्रीडी सिटी स्कॅन द्वारे रुग्णाच्या शरीर रचनेचे थ्रीडी प्रारूप तयार करून शल्य चिकित्सकाला शस्त्रक्रियेचे नियोजन करता येते.रोबोटिक आर्मच्या साहाय्याने शल्यचिकित्सक अचूकपणे रोपण योग्यरित्या करू शकतात व या प्रक्रियेमध्ये सभोवतालचे स्नायू व पेशींना इजा होत नाही.रोबोट द्वारे केले जाणाऱ्या प्रक्रियेचे एकंदर नियंत्रण शल्यचिकित्सकाकडे असते.
मॅको रोबोटिक प्रणाली ही सांधेरोपण व हिप रिप्लेसमेंट प्रक्रियांसाठी जगातील सर्वांत प्रगत रोबोटिक प्रणालींमध्ये मानली जाते.
अँटिरियर ॲप्रोच (DAA) तंत्रामुळे शस्त्रक्रिया अधिक सुलभ
बायलॅटरल रोबोटिक हिप रिप्लेसमेंट विथ अँटिरियर ॲप्रोच या तंत्राद्वारे अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे आर्कस हॉस्पिटल हे भारतातील पहिल्या हॉस्पिटलपैकी एक आहे. आर्कस हॉस्पिटलमधील अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया ऑक्टोबर 2023 मध्ये केली गेली. त्यानंतर 650 हून अधिक प्रक्रिया या तंत्राने करण्यात आल्या.यात रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने व रोबोटिक प्रणाली शिवाय अशा दोन्ही प्रकारच्या प्रक्रियांचा समावेश आहे.
डॉ.रोहित लुथ्रा पुढे म्हणाले की, अँटेरियर अॅप्रोच या तंत्राला फ्रंट अॅप्रोच असे देखील म्हणतात.ही कमीत कमी चिरा असणारी प्रक्रिया असून यात नुकसान झालेल्या हाडांपर्यंत पोहचण्यासाठी स्नायू कापावे लागत नाही. पुढील बाजूने कमीत कमी चिरा करत झिज झालेली हाडे व सांधे काढून योग्य ठिकाणी रोपण केले जाते. यामध्ये स्नायूंना कुठलेही नुकसान न झाल्याने रूग्णाला शस्त्रक्रियेनंतर अल्पावधीतच आपले वजन पेलवत चालू शकता येते. रोबोटिक प्रणालीमुळे रोपण योग्य जागी बसवून अचूकता साधता येते. रूग्णाच्या खुब्याच्या रचनांनुसार हे रोपण बसविले जाते व रोपण विस्थापित होण्याची शक्यता नगण्य असते. रोबोटिक प्रक्रिया करताना अचूकता आणि सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन करता येते. रोपणाचा योग्य आकार शस्त्रक्रियेआधी सीटी स्कॅन करून ठरविला जातो. सीटी स्कॅन झाल्यानंतर खुब्याचे थ्रीडी प्रारूप तयार केले जाते. एका कुशीवर इतर प्रक्रियांप्रमाणे रूग्ण नसल्यामुळे आणि पाठीवर झोपता येत असल्याने खुब्याची लांबी अचूकतेने मोजता येते.


