दिल्ली, 20 जानेवारी 2025: हिंदुजा समूहाचा एक भाग असलेल्या SWITCH मोबिलिटी लिमिटेडने विशेषतः मध्यम-मार्ग लॉजिस्टिक्ससाठी डिझाइन करण्यात आलेले 7.2T श्रेणीतील क्रांतिकारी इलेक्ट्रिक लाइट कमर्शियल वाहन (eLCV) SWITCH IeV8 सादर केले आहे. टिकाऊपणा व कार्यक्षमता यांचा समतोल साधत तयार करण्यात आलेले SWITCH IeV8 भारतातील लॉजिस्टिक्स क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे.
SWITCH मोबिलिटीच्या eLCV पोर्टफोलिओमध्ये एक शक्तिशाली भर असलेले SWITCH IeV8 हे वाहन प्रगत कामगिरी, टिकाऊपणा आणि कार्गो वाहतुकीतील शाश्वतता यांच्या उत्कृष्टतेसाठी डिझाइन करण्यात आले आहे. प्रगत लिथियम बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या IeV8 या वाहनाला एकाच चार्जमध्ये 250 किमी अंतर कापता येते. 830 क्युबिक फूट कंटेनर जागेची क्षमता असलेले याचे बहुउपयोगी डिझाइन विविध लॉजिस्टिक्स गरजांसाठी उपयुक्त ठरते. ताशी 80 किमीचा सर्वोच्च वेग आणि फास्ट-चार्जिंगच्या सुविधांसह, हे आधुनिक व्यवसायांच्या गरजा पूर्ण करत जलद आणि अखंड ऑपरेशन्स सुनिश्चित करते.
सहज हाताळणीसाठी इलेक्ट्रो-हायड्रॉलिक पॉवर स्टीअरिंग (EHPS), चालक-केंद्रित एसी केबिन, झुकवता येणारे स्टीअरिंग व्हील, स्लायडिंग आणि रिक्लायनिंग सीट्स या वैशिष्ट्यांसह SWITCH IeV8 हे अतुलनीय आराम आणि एर्गोनॉमिक उत्कृष्टता यासाठी डिझाईन केले आहे.
SWITCH मोबिलिटीचे अध्यक्ष श्री. धीरज हिंदुजा म्हणाले, “SWITCH IeV8 चे अनावरण हे स्वच्छ वाहतूक उपायांबाबतच्या आमच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हे वाहन केवळ आधुनिक लॉजिस्टिक्सच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नव्हे तर हरित भविष्य घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक सुविधांनी युक्त असे डिझाइन करण्यात आले आहे. IeV8 सह SWITCH मोबिलिटी इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात नाविन्य आणि पर्यावरण-जागरूक विकासात आघाडीवर असण्याला पुष्टी देते.”
SWITCH मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश बाबू म्हणाले, “मध्यम-मार्ग लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कार्यक्षम, विश्वासार्ह आणि टिकाऊ उपायांची वाढती मागणी पूर्ण करण्याकरता SWITCH IeV8 डिझाइन करण्यात आले आहे. पेलोड क्षमता 4 टनांपर्यंत आणि 830 क्युबिक फूट पर्यंत कंटेनर सामर्थ्य यांसह IeV8 हे वाहन आधुनिक लॉजिस्टिक्स ऑपरेशन्सच्या विविध गरजांशी सुसंगत आहे. प्रगत लिथियम बॅटरी रसायनशास्त्रासह 250 किमी प्रति चार्ज अंतर आणि जलद चार्जिंग क्षमतांमुळे हे वाहन ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवून डाउनटाइम कमी करते. SWITCH मोबिलिटीच्या प्रगत ईव्ही आर्किटेक्चरवर तयार केलेले हे वाहन किमान एकूण मालकी खर्चासह उत्कृष्ट कामगिरी देते.”
उत्कृष्ट हाताळणी, टिकाऊपणा आणि चालकांना गाडी चालवण्यायोग्य सुविधा देण्यासाठी SWITCH IeV8 डिझाईन करण्यात आली आहे. सहज हाताळणीसाठी इलेक्ट्रो-हायड्रॉलिक पॉवर स्टीअरिंग, चालक-केंद्रित एसी केबिन, झुकवता येणारे स्टीअरिंग व्हील, स्लायडिंग आणि रिक्लायनिंग सीट्स या वैशिष्ट्यांसह असलेली SWITCH IeV8 लांब पल्ल्यासाठीही शांत, निवांत, थकवा नसलेला असा ड्रायव्हिंग अनुभव सुनिश्चित करते. प्रत्येक प्रवासात सुरक्षितता आणि उत्पादकता उंचावून चालकाच्या स्वास्थ्याला प्राधान्य देत ही विचारपूर्वक भर घालण्यात आली आहे.”
इतर 50 हून अधिक प्रगत वैशिष्ट्यांमध्ये कंपनीची खास टेलिमॅटिक्स सिस्टीम SWITCH iON ने समर्थित SWITCH IeV8 प्रत्यक्षातील वाहन स्थिती निरीक्षण, ITMS आणि कार्यक्षम फ्लीट व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
टिकाऊपणा आणि कार्यक्षमता या दोन्हीसाठी डिझाईन करण्यात आलेले SWITCH IeV8, हे नाविन्यपूर्ण वाहन कार्बन फूटप्रिंट कमी करताना कार्यात्मक खर्च कमी करत व्यवसाय सक्षम करतात. कार्यक्षमता, खर्च-प्रभावीपणा आणि शाश्वतता उपायांचा समतोल साधत SWITCH IeV8 सह SWITCH मोबिलिटी भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे.


