Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमआयटी डब्ल्यूपीयू येथे राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त आयोजित उद्यमोत्सवला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमआयटी डब्ल्यूपीयू येथे राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त आयोजित उद्यमोत्सवला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे,21 जानेवारी 2025 : राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे एआयसीटीई व केंद्रिय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलच्या सहकार्याने आयोजित उद्यमोत्सव 2025 ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एमआयटी डब्ल्यूपीयू येथील आंत्रप्रेन्युअरशिप सेल (ई-सेल) यांचा सक्रीय सहभाग असलेल्या या उपक्रमामध्ये 20 अभिनव स्टार्टअप्सना आपल्या नवसंकल्पना मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले,त्यापैकी गुंतवणूकदारांशी पुढील चर्चा करण्यासाठी 8 स्टार्टअप्सची निवड करण्यात आली.

याप्रसंगी ॲक्सेंचर एटीसीआय पुणेचे व्यवस्थापकीय संचालक भूपेश गहरोत्रा आणि एआयसीटीईचे असिस्टंट इनोव्हेशन डायरेक्टर डॉ.प्रदीप ढगे उपस्थित होते.त्यांच्या उपस्थिती आणि अंर्तदृष्टीमुळे तरूणवर्ग आपल्या परिसीमांपलीकडे विचार करण्यासाठी आणि शाश्वत अभिनवतेसाठी प्रयत्न करण्यास प्रेरित झाला.

या उपक्रमात भारतातील विविध शहरे आणि ग्रामीण भागातील विविध स्टार्टअप्सने सहभाग घेत ही वैविध्यता सर्वसमावेशक स्टार्टअप परिसंस्था निर्माण करण्याची एमआयटी डब्ल्यूपीयूची कटिबद्धता दर्शविते.

अभिनवता आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या आपल्या ध्येयाशी सुसंगत असलेला हा उपक्रम यशस्वी होण्यामध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.राहुल कराड यांसह प्र-कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे आणि प्रा.प्रकाश जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.स्टार्टअप इको सिस्टिमसाठी योगदान देणाऱ्या एमआयटी टीबीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी निनाद पाटील यांचा देखील सक्रीय सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments