Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात एडब्ल्यूआरटी (ऑसम ऑर्ट) फेस्टीव्हलचे आयोजन

पुण्यात एडब्ल्यूआरटी (ऑसम ऑर्ट) फेस्टीव्हलचे आयोजन

पुणे,23 जानेवारी 2025 : नुक्कड कॅफेचा सामाजिक उपक्रम असलेल्या पालविया फाऊंडेशन तर्फे पुण्यात झोपडपट्टीतील पहिल्या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनोखा कार्यक्रम 1 आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून,गेणू भाऊ खेसे प्राथमिक विद्यालय,पीएमसी स्कूल,509 चौक,एअरपोर्ट रोड येथे आयोजित होणार आहे.

भाग्यशाली भविष्य शिक्षा फाऊंडेशन (बीबीएनजीओ) यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून नुक्कड कॅफे, कॅडेट ट्रेनिंग विंग-सीएमई, एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, स्लॅम आऊट लाऊड, नॅशनल एचआरडी नेटवर्क,कल्चरल कनेक्ट, कलमोझिक फाऊंडेशन आणि सॅटरडे आर्ट क्लास या भागीदारांचा सहयोग लाभला आहे.

या दोन दिवसीय महोत्सवात बर्मा शेल बस्ती आणि इतर आसपासच्या परिसरातील कलाकारांचे सादरीकरण होणार असून याबरोबरच वारली,चित्रकला,मास्क पेंटींग इत्यादी कला कार्यशाळा, मुळ गाणी/रॅप प्रकारातील गाणी,संगीत आणि कवितांचे सादरीकरण, शास्त्रीय नृत्य,कथाकथन,पथनाट्य,विदूषक आणि पपेट शो सादर होणार आहे. याबरोबरच 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांनी बनवलेल्या वारली व मांडला कलाकृतींचे प्रदर्शन पाहता येणार आहे.

याप्रसंगी बोलताना पालविया फाऊंडेशन आणि नुक्कड कॅफेचे संस्थापक वैभव पालिवाल म्हणाले की, कला कोणत्याही स्वरूपात असो,त्यामध्ये एक प्रकारची जादू असते. कला ही एखादी व्यक्ती,ठिकाण आणि संपूर्ण विश्वात परिवर्तन घडवून आणू शकते. मी गेल्या काही वर्षांपासून या प्रभावांचे निरीक्षण करत असून यामुळेच मला पालविया फाऊंडेशन सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. कला,साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून कल्याण,सामाजिक बांधिलकी आणि सुसंवाद निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश्य आहे. आम्ही झोपडपट्टी,वृध्दाश्रम आणि अनाथ आश्रमामधील नागरिकांसह काम करण्यास सुरूवात केली आहे.

वैभव पालीवाल पुढे म्हणाले की,आम्ही नुकतेच झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना आणि महिलांना कला आणि साहित्याची ओळख करून दिली.ज्यामध्ये त्यांना गीतलेखन,गायन,मांंडला कला आणि इतर विविध कला प्रकारांचे प्रशिक्षण देतो. तसेच योग्य उपजीविकेसाठी त्याचा उपयोग कसा करावा हे याची देखील माहिती देतो. या मुलांची प्रगती आणि विकासाचे यश साजरे करण्यासाठीच आम्ही कला महोत्सव आयोजित करण्याचे ठरविले.

बीबीएनजीओचे संस्थापक कजारी मित्रा म्हणाले की,कला आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे मुलांमध्ये संज्ञानात्मक क्षमता निर्माण होऊन त्यांना अभ्यासात मदत होऊ शकते. वस्तीमधील मुलांना विविध कलाप्रकारांची ओळख करून दिली जाते,याचा मला खूप आनंद आहे.

हा उपक्रम सर्वांसाठी खुला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments