Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedबँकिंग आणि अकाउंटिंग उपायसुविधा सुलभ करण्यासाठी अॅक्सिस बँकेची Marg ERP सोबत भागीदारी

बँकिंग आणि अकाउंटिंग उपायसुविधा सुलभ करण्यासाठी अॅक्सिस बँकेची Marg ERP सोबत भागीदारी

राष्ट्रीय, 23 जानेवारी 2025: भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने समग्र व्यवसाय उपयोजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कंपनी Marg ERP सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे लघु व मध्यम उद्योग (SME) ग्राहकांना सुलभ व्यवसाय बँकिंग उपायसुविधा पुरविता येणार आहेत. या सहकार्याचा उद्देश अकाउंटिंग आणि बँकिंग सुविधा विनाअडथळा एकाच ठिकाणी आणणे आणि ग्राहकांना अकाउंटिंग व बँकिंग उपयोजनांदरम्यान बदल करण्याची गरज कमी करणे हा आहे.

या सहयोगामुळे अॅक्सिस बँकेच्या चालू खात्याच्या ग्राहकांना त्यांचे व्यवसाय खाते Marg ERP सॉफ्टवेअरशी थेट कनेक्ट करण्यास सक्षम करते. त्यामुळे NEFT, RTGS, IMPS यांसारख्या सर्व बँकिंग व्यवहारांसाठी एकत्रित प्लॅटफॉर्म तयार होतो. अॅक्सिस बँकेचे करंट अकाऊंट खातेधारक Marg ERP मध्ये लॉगिन करून आवश्यक बिल निवडू शकतात आणि त्यांच्या थेट कनेक्टेड अॅक्सिस बँक खात्यामार्फत पेमेंट प्रक्रिया करू शकतात.

या कनेक्टेड बँकिंग सोल्यूशनद्वारे व्यवसायांना त्यांच्या बँकिंग प्रक्रियांचे ऑटोमेशन करण्याची, प्रत्यक्षातील खात्यातील निधीसह निधी प्रवाहावर नियंत्रण मिळवण्याची, पेमेंट्स आणि रीकन्सिलिएशनचे व्यवस्थापन करण्याची तसेच थेट ERP प्रणालीतून विस्तृत वैशिष्ट्यांचा आनंद घेण्याची सुविधा मिळते. व्यवहार ERP सिस्टीमद्वारे स्वयंचलितपणे होत असल्यामुळे ही एकत्रित प्रणाली मॅन्युअल डेटा एंट्रीची गरज संपवते व अकाउंटिंगमध्ये होणाऱ्या चुका कमी करते. अकाउंटिंग सॉफ्टवेअरवर बँक शिल्लक व व्यवहार स्थितीचे रिअल-टाइम म्हणजेच प्रत्यक्षातील दृश्य जलद निर्णय घेण्यास सक्षम करते.

अॅक्सिस बँक-Marg ERP एकत्रिकरणाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांना पुढील गोष्टी शक्य होतात:

· ऑटो-बँक रीकन्सिलिएशनद्वारे बँक खात्यांमधील पेमेंट्स रीकन्सिलिंग काम सुलभ करणे

· Marg ERP सॉफ्टवेअरद्वारे NEFT, RTGS, IMPS आणि इन्ट्रा बँक फंड ट्रान्स्फरसारख्या विविध पेमेंट पर्यायांद्वारे रिअल-टाइम थेट पेमेंट्स सुरू करणे

· व्यवसायाच्या गरजेनुसार वरचेवर कराव्या लागणाऱ्या पेमेंट्सचे वेळापत्रक ठरवणे

· संपूर्ण एकत्रित बँकिंग पर्यायांसह पेमेंट्सची स्थिती जाणून घेणे

· बँक स्टेटमेंट बघणे, अहवाल डाउनलोड करणे आणि सुव्यवस्थित पद्धतीने मांडणे

· लेजर एंट्री ऑटोमेट करणे

भागीदारीबद्दल बोलताना अॅक्सिस बँकेच्या होलसेल बँकिंग प्रॉडक्ट्सचे प्रेसिडेंट & हेड विवेक गुप्ता म्हणाले, “Marg ERP सोबतची ही भागीदारी आमच्या SME ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चांगली सेवा देण्याच्या आणि समग्र, ग्राहककेंद्री सुविधा सादर करण्याच्या अॅक्सिस बँकेच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. Marg ERP सोबतच्या बँकिंग फंक्शन्सच्या सुरक्षित व सुलभ एकत्रिकरणामुळे आमच्या ग्राहकांसाठी त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन उच्च कार्यक्षमतेने व लवचिकतेने करणे सोपे झाले आहे. त्याचवेळी वाढीसाठी जलद व माहितीपूर्ण निर्णय घेता येतील. हा उपक्रम म्हणजे ग्राहकांच्या डिजिटल अनुभवात लक्षणीय सुधारणा करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे.”

Marg ERP चे सीएमडी आणि संस्थापक ठाकूर अनुप सिंग या सहयोगाबाबत म्हणाले, “अॅक्सिस बँकेसोबतची ही भागीदारी संपूर्ण क्षेत्रातील B2B व्यवसायांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. याचे कारण यामुळे त्यांना प्रगत डिजिटल

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments