Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगने स्‍मार्ट टीव्‍ही व स्‍मार्ट मॉनिटर्ससाठी सॅमसंग एज्‍युकेशन हब अॅपमध्‍ये एम्‍बाइबच्‍या एआय-पॉवर्ड...

सॅमसंगने स्‍मार्ट टीव्‍ही व स्‍मार्ट मॉनिटर्ससाठी सॅमसंग एज्‍युकेशन हब अॅपमध्‍ये एम्‍बाइबच्‍या एआय-पॉवर्ड लर्निंग प्‍लॅटफॉर्मला एकीकृत केले

गुरूग्राम, भारत – जानेवारी २८, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने एआय-पॉवर्ड वैयक्तिकृत अध्‍ययन निष्‍पत्ती प्‍लॅटफॉर्म एम्‍बाइबसोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत टेलिव्‍हजन एज्‍युकेशन अॅप म्‍हणून डिझाइन करण्‍यात आलेल्‍या सॅमसंग एज्‍युकेशन हब अॅपमध्‍ये या प्‍लॅटफॉर्मला एकीकृत करण्‍यात येईल. हा सहयोग विद्यार्थ्‍यांना वैयक्तिकृत अध्‍ययन अनुभव देण्‍यासाठी टेलिव्हिजन्‍सना प्रभावी शैक्षणिक साधन बनण्‍यास मदत करेल.

या सहयोगाच्‍या माध्‍यमातून सॅमसंग एज्‍युकेशन हब अॅपचा भाग म्‍हणून एम्‍बाइब व्‍यापक शैक्षणिक कव्‍हरेज देईल, सर्व प्रमुख शैक्षणिक मंडळ जसे सीबीएसई, आयसीएसई, आयबी, कॅम्ब्रिज, सर्व राज्‍य मंडळ यांना साह्य करेल आाणि आयआटी जेईई व नीट अशा प्रमुख प्रवेश परीक्षांमध्‍ये मदत करेल. विद्यार्थ्‍यांना पुरस्‍कार-प्राप्‍त, सर्वसमावेशक ३डी एक्‍स्‍प्‍लेनर व्हिडिओजच्‍या मोठ्या संग्रहामधून फायदा होईल, जे सर्वात गुंतागूंतीचे विषय सोपे करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत, ज्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना ते विषय सहजपणे समजतील आणि अध्‍ययन अधिक सर्वसमावेशक होईल.

”सॅमसंग एज्‍युकेशन हब अॅपचा घरांमधील टेलिव्हिजन्‍सच्‍या भूमिकेला विस्‍तारित करण्‍याचा, तसेच टेलिव्हिजन्‍सना मनोरंजन हब्‍समधून ऑनलाइन अध्‍ययनासाठी विनासायास प्‍लॅटफॉर्ममध्‍ये बदलण्‍याचा मनसुबा आहे. हे नाविनयपूर्ण ‘डिझाइन्‍ड-फॉर-टीव्‍ही’ एज्‍युकेशन अॅप ऑनलाइन अध्‍ययन अनुभवामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍यामुळे ते सर्वांसाठी सर्वसमावेशक व सहजसाध्‍य होईल. आमचा भविष्‍य घडवण्‍याचा दृष्टिकोन आहे, जेथे शिक्षणाला कोणत्‍याही मर्यादा नसतील आणि एका बटनाच्‍या क्लिकसह ज्ञान सहजपणे मिळेल,” असे सॅमसंग इंडियाच्‍या व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे वरिष्‍ठ संचालक विपलेश डांग म्‍हणाले.

”सॅमसंग टीव्‍हीसोबतचा आमचा सहयोग सर्वात विश्‍वसनीय व लोकप्रिय माध्‍यमाद्वारे वैयक्तिक, सर्वसमावशेक अध्‍ययन अनुभव देण्‍यामधील मोठी झेप आहे. सॅमसंगने एम्‍बाइबसोबत सहयोग केला आहे, कारण आम्‍ही दोन महत्त्वपूर्ण आव्‍हानांचे निराकरण केले आहे, ते म्‍हणजे आकर्षक इंटरअॅक्टिव्‍ह, मल्‍टी-मोडल कन्‍टेन्‍ट डिझाइन करणे आणि एआयद्वारे समर्थित वैयक्तिकृत अनुभवाच्‍या माध्‍यमातून ते वितरित करणे. सॅमसंगचे इनोव्‍हेशन आणि एम्‍बाइबचे एडटेकमधील कौशल्‍य यांच्‍यामधील समन्‍वय प्रबळ संयोजन आहे, जे शैक्षणिक सर्वोत्तमतेसाठी नवीन मापदंड स्‍थापित करते, सर्वांसाठी परिवर्तनात्‍मक अध्‍ययन अनुभव तयार करते,” असे एम्‍बाइबच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अदिती अवस्‍थी म्‍हणाल्‍या.

एम्‍बाइबची मुख्‍य ऑफरिंग म्‍हणजे त्‍यांचे वैयक्तिकृत, एआय-संचालित अनुकूल सराव, जे प्रत्‍येक विद्यार्थ्‍याच्‍या अध्‍ययन स्‍तरानुसार समायोजित होते. सॅमसंग एज्‍युकेशन हबच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना एम्‍बाइबची व्हिडिओ-आधारित अध्‍ययन संसाधने उपलब्‍ध होतील, तसेच इंग्रजी, हिंदी व १० प्रमुख प्रादेशिक भाषांमध्‍ये एआय-समर्थित अनुकूल सराव मिळेल, ज्‍याला दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्‍यांच्‍या १० वर्षांहून अधिक काळाच्‍या शैक्षणिक सहभाग डेटाचे पाठबळ आहे. ते ५४,००० सराव चाचण्‍यांमधून निवड करू शकतात आणि वैयक्तिकृत स्‍कोअर-इम्‍प्रूव्‍हमेंट वैशिष्‍ट्यांचा वापर करू शकतात, जे सुधारणेसाठी उपयुक्‍त माहिती देतील. तसेच, विद्यार्थी टीव्‍हीसोबत खरेदी केलेल्‍या एम्‍बाइब वार्षिक सबस्क्रिप्‍शनवर सॅमसंगच्‍या ५० टक्‍क्‍यांच्‍या विशेष सूटचा लाभ घेऊ शकतात.

एम्‍बाइब कन्‍टेन्‍ट सर्व २०२४ सॅमसंग टेलिव्हिजन्‍स व स्‍मार्ट मॉनिटर्सवर उपलब्‍ध असेल आणि हळूहळू पूर्वीच्‍या मॉडेल्‍सवर उपलब्‍ध होईल. सॅमसंग टेलिव्हिजन्‍स असलेल्‍या एम्‍बाइबच्‍या विद्यमान सबस्‍क्रायबर्सना, तसेच प्‍लॅटफॉर्म सबस्‍क्राइब करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या सॅमसंग टीव्‍ही युजर्सना विनासायास लॉग इन आणि हा संपन्‍न शैक्षणिक कन्‍टेन्‍ट उपलब्‍ध होईल. या वर्षाच्‍या सुरूवातीला सॅमसंगने २०२३ व २०२४ सॅमसंग टेलिव्हिजन्‍सवरील सॅमसंग एज्‍युकेशन हबसाठी आघाडीचे एड-टेक प्‍लॅटफॉर्म फिजिक्‍सवालासोबत सहयोग केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments