अजॅक्स इंजिनिअरिंग लिमिटेड (“कंपनी”) च्या प्रत्येकी 1 रुपये (“इक्विटी शेअर्स”) दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 599 रुपये ते 629 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
· प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख शुक्रवार 07 फेब्रुवारी 2025 असेल
· बोली/ऑफर सोमवार 10 फेब्रुवारी 2025 रोजी खुली होईल आणि बुधवार 12 फेब्रुवारी 2025 रोजी बंद होईल.
· बोली किमान 23 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 23 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
· 04 फेब्रुवारी 2025 (“RHP”) रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसची लिंक: https://www.ajax-engg.com/investor-relations
राष्ट्रीय, 05 फेब्रुवारी 2025: अजॅक्स इंजिनिअरिंग लिमिटेड (“कंपनी”) ने प्रत्येकी 1 रुपये (“इक्विटी शेअर्स”) दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअरसाठी सोमवार 10 फेब्रुवारी 2025 रोजी इक्विटी शेअरची प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर’”)करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजेच शुक्रवार 07 फेब्रुवारी 2025 असेल. बुधवार 12 फेब्रुवारी 2025 रोजी बोली/ऑफर बंद होणार आहे.
प्रति इक्विटी शेअरसाठी (“प्राईस बॅन्ड”) 599 रुपये ते 629 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 23 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 23 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“बिड लॉट”).
प्राथमिक समभाग विक्री मध्ये 20,180,446 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची (“Offered Shares”) ऑफर फॉर सेल समाविष्ट असून त्यामध्ये कृष्णस्वामी विजय यांच्याकडून 1,716,102 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, कल्याणी विजय यांच्याकडून 1,716,102 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, जॅकोब जितेन जॉन यांच्याकडून 2,288,136 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, जॅकोब हंसेन फॅमिली ट्रस्ट यांच्याकडून 5,593,221 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, सुसी जॉन यांच्याकडून 1,430,085 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि केदारा कॅपिटल फंड II LLP यांच्याकडून 7,436,800 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत.
ही ऑफर SCRR च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियम 32(1) नुसार, ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील.
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी (अ) एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब्) दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 35 % पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.
प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. येथून पुढे, पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची वैध बोली ऑफर किंमती एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास इक्विटी शेअर्सचे प्रमाणात वाटप केले जाईल.
या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजेस BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर (“NSE”) (the “Stock Exchanges”) सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. (The “BRLMs”).
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ 4 फेब्रुवारी 2025 रोजीच्या आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.


