Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसहाव्या एशिया इकॉनॉमिक डायलॉग चे 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2025 दरम्यान...

सहाव्या एशिया इकॉनॉमिक डायलॉग चे 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2025 दरम्यान पुण्यात आयोजन

पुणे, फेब्रुवारी 17, 2025 : भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या एशिया इकॉनॉमिक डायलॉग (एईडी) या वार्षिक भू-अर्थशास्त्र परिषदेचे 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2025 दरम्यान पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरूत्थान (इकोनॉमिक रेझिलियन्स ॲन्ड रिसर्जन्स इन ॲन इरा ऑफ फ्रॅगमेंटेशन) या संकल्पनेवर केंद्रित एईडी 2025 मध्ये 9 देशांतील 40 वक्ते तीन दिवसांच्या 12 सत्रांमध्ये सहभागी होतील. यामध्ये ऑस्ट्रेलिया,इजिप्त,इंडोनेशिया,जपान,नेपाळ,नेदरलँडस,सिंगापूर,साऊथ आफ्रिका आणि श्रीलंका या 9 देशांतील धोरणकर्ते,शिक्षणतज्ञ आणि उद्योग तज्ञ सहभागी होतील. विविध मंत्रीस्तरीय सहभागामुळे परिवर्तनकारक कल्पना आणि धोरणांबाबतच्या चर्चा अधिक प्रभावी होऊ शकतील.

गुरूवार,20 फेब्रुवारी रोजी उद्घाटन सत्रात एशिया इकोनॉमिक डायलॉग 2025 चे संयोजक आणि चीन व भूतानमधील भारताचे माजी राजदूत व पाकिस्तानमधील भारताचे माजी उच्चायुक्त ॲम्बेसिडर गौतम बंबावाले हे केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री.पियुष गोयल यांच्याशी संवाद साधतील. त्यानंतर बायोकॉन ग्रुपच्या अध्यक्ष किरण मुजुमदार शॉ यांच्याशी भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेतील प्रतिष्ठित तज्ञ आणि लिलीपुट लँड – हाऊस मॉल इज ड्राइव्हिंग इंडियाज मेगा कन्झम्प्शन स्टोरीच्या लेखिका रमा बिजापूरकर या संवाद साधतील.परिषदेच्या शेवटच्या दिवशी केंद्रिय रेल्वे,माहिती व प्रसारण,इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव हे समारोपीय सत्रात सहभागी होतील.

या तीन दिवसीय परिषदेत आर्थिक विखंडनाच्या गुंतागुंतीच्या काळात लवचिकता आणि पुनरूत्थानासाठी कृतीयोग्य दिशा यावर चर्चासत्र पार पडतील. परिषदेत चर्चा करण्यात येणाऱ्या काही महत्त्वाच्या भू-आर्थिक विषयांमध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता,सायबर सुरक्षा,आफ्रिकेमधील परिवर्तन,ब्ल्यू इकोनॉमी,आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था,सुक्ष्म,लघु,मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि हवामान बदल यांचा समावेश आहे.

या परिषदेत एआय आणि ऑटोमेशनच्या युगात नेतृत्वाची पुनर्कल्पना,आफ्रिकेतील परिवर्तन – मदतीपासून गुंतवणूकीपर्यंत, सर्व्हायवल बिफोर सस्टेनेबिलिटी – ॲन अजेंडा फॉर धिस डेकेड,सायबर विषयांवर सहकार्य – एक आर्थिक आवश्यकता, आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था – आव्हाने आणि सुधारणा, एमएसएमई उद्योगाला सक्षम बनवून सुप्त सामर्थ्य प्रत्यक्षात आणणे आणि ब्ल्यू इकोनॉमी या विषयांवर फायरसाईड चॅटस व सत्रांचा समावेश आहे. ही परिषद फक्त निमंत्रितांसाठी आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: गीता :- 9881098445 /कोईना : 9898012563
ई-मेल : aed@puneinternationalcentre.org

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments