Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedकसब्यात प्राचीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात श्री महाकाल पूजा* *श्री बहिरोबा...

कसब्यात प्राचीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात श्री महाकाल पूजा* *श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे महाशिवरात्रीनिमित्त आयोजन*

पुणे : कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त श्री महाकाल पूजा करण्यात आली होती. श्री महाकाल मुखवटा आणि फुलांची आकर्षक आरास याने मंदिर सुशोभित करण्यात आले. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे.

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त श्री महाकाल पूजा आणि सजावट करण्यात आली. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. त्यातीलच एक असलेला महाशिवरात्र उत्सव हा अनेक वर्षे साजरा केला जातो.

कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित श्री महाकाल पूजा पाहण्याकरिता भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments