Wednesday, November 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रामीण युवकांच्या उद्योजकतेला नवी दिशा* ‘ *मुख्यमंत्री ग्रामीण...

ग्रामीण युवकांच्या उद्योजकतेला नवी दिशा* ‘ *मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने*’चा  संविधान दिनी भव्य शुभारंभ*

 

• मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार प्रारंभ

 

• सायंकाळी ६.०० वाजेपासून महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) पोर्टलवर प्रत्यक्ष अर्जस्वीकृतीस सुरुवात

 

• संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन; ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर लाभ

——————————————-

*पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे-67* :

राज्यातील ग्रामीण भागातील युवक, युवती आणि शेतकऱ्यांना पशुधनाधारित व्यवसायांच्या माध्यमातून उद्योजक व स्वयंपूर्ण बनविणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’चा शुभारंभ   गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते होणार आहे. या योजनेच्या शुभारंभानंतर गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपासून महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) या पोर्टलवर ऑनलाइन अर्जस्वीकृतीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

 

या योजनेअंतर्गत अर्जदार आपल्या गरजेनुसार गाय आणि म्हैस यांसारख्या मोठ्या दुभत्या पशुधनासह शेळीपालन व कुक्कुटपालन तसेच व्यवसायासाठी आवश्यक असलेले शेड व चारा योजनांचे पर्यायही ऑनलाइन अर्जामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाआयटी व पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयातून ही अत्याधुनिक ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अर्जदाराने निवडलेल्या घटकांनुसार प्रकल्पाचा एकूण खर्च, त्यावर मिळणारे शासकीय अनुदान व लाभार्थ्याने भरावयाची उर्वरित स्वगुंतवणूक याची स्पष्ट माहिती अर्ज भरतानाच प्रणालीवर तत्काळ दिसणार आहे.

 

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी आपला फार्मर आयडी (Farmer ID) आणि महाआयडी (MahaID) तयार करून ठेवावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे. अर्जांची छाननी आणि निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार होणार असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर आपले अर्ज महाडीबीटी २.० पोर्टलवर सादर करावेत. योजनेची सविस्तर माहिती व मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

योजनेबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात, पशुसंवर्धन विभागाच्या तालुका व जिल्हास्तरीय कार्यालयात संपर्क साधावा. याशिवाय, पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९०६३१४२२९९ या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर संपर्क करावा, अशी माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments