Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमाज कल्याण आयुक्तालयाला भाडेकराराने इमारत देऊ इच्छिणाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन

समाज कल्याण आयुक्तालयाला भाडेकराराने इमारत देऊ इच्छिणाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे, दि. 27: समाज कल्याण आयुक्तालयाकरिता सर्व सुविधायुक्त इमारत भाड्याने घ्यावयाची असून इच्छुक इमारत मालकांनी आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, ३ चर्च रोड, मुख्य पोस्ट कार्यालयाजवळ, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे

इच्छुकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या दरानुसार भाडे अदा करण्यात येणार आहे. पाचशे रुपयाच्या बंधपत्रावर इमारत मालकाने इमारत भाड्याने देण्याबाबतचे संमतीपत्र सादर करावे. यासोबतच इमारतीतील खोल्या, स्वच्छतागृहे, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, वाहन पार्किंग व्यवस्था आदी तपशील सादर करावा. इमारत आरोग्य व सुरक्षिततेच्यादृष्टीने परिपूर्ण असावी. इमारतीचे क्षेत्रफळ साधारपणे २० ते २२ हजार चौरस फूट असावे. सदरची इमारत ही पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असावी, असेही श्री. बकोरिया यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments