पुणे दि. २८ : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून फेब्रुवारी महिन्यात पक्की अनुज्ञप्ती साठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मध्ये खेड येथे ५ व ६ फेब्रुवारी, मंचर येथे १२ व १३ फेब्रुवारी, जुन्नर येथे २१ व २२ फेब्रुवारी, वडगाव मावळ येथे २६ व २७ फेब्रुवारी तर लोणावळा येथे २८ व २९ फेब्रुवारी या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.


