Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedएक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज लि.’तर्फे ७०० कोटी रुपयांच्या ‘आयपीओ’साठी ‘सेबी’कडे डीआरएचपी दाखल

एक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज लि.’तर्फे ७०० कोटी रुपयांच्या ‘आयपीओ’साठी ‘सेबी’कडे डीआरएचपी दाखल

एक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज लि. ही शिक्षण आणि मूल्यमापन बाजारपेठेवर केंद्रित असलेली एक जागतिक व्हर्टिकल सॉफ्टवेअर-सेवा (एसएएएस) कंपनी आहे. तिने प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) ७०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी सेबी या भांडवली बाजार नियंत्रक संस्थेकडे ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (डीआरएचपी) दाखल केला आहे.

म्हैसूर येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने दाखल केलेल्या ‘डीआरएचपी’नुसार, प्रस्तावित आयपीओमध्ये २१० कोटी रुपये मूल्याचे नवीन इक्विटी समभाग आणि ४९० कोटी रुपयांच्या समभागांच्या विक्रीचा प्रस्ताव (ओएफएस) यांचा समावेश आहे. प्रमोटर सेलिंग भागधारक पेदंता टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि धनंजय सुधन्वा हे ‘ओएफएस’द्वारे आपले समभाग विक्रीसाठी ठेवणार आहेत.

एक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज ही कंपनी नवीन समभाग विक्रीतून उभ्या राहणाऱ्या निधीचा वापर पुढील हेतूंकरिता करणार आहे : जमीन खरेदी, नवीन इमारतीचे बांधकाम, तसेच म्हैसूर येथील कारखान्यातील वीजप्रणालींमधील सुधारणा हे भांडवली खर्च; सॉफ्टवेअर, आयटी पायाभूत सुविधा सुधारणा (हार्डवेअर आणि संप्रेषण व नेटवर्क सेवा अद्ययावत करणे); तसेच इतर कॉर्पोरेटविषयक गरजा पूर्ण करणे.

एक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज ही कंपनी गेल्या दोन दशकांपासून जगभरातील अनेक कंपन्यांशी दीर्घकालीन करार करून त्यांना तंत्रज्ञान-आधारित शिक्षण आणि मूल्यमापन सेवा पुरवीत आहे. दि. ३१ डिसेंबर २०२४पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ही कंपनी अमेरिका, युनायटेड किंगडम, भारत, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जपान, मलेशिया, सौदी अरेबिया, यूएई आणि कॅनडा अशा १७ देशांतील ७१ ग्राहकांना सेवा पुरवत आहे.

‘एक्सेलसॉफ्ट’ने २०२३-२४ या आर्थिक वर्षात १९८.३ कोटी रुपयांचे कार्यान्वयीन उत्पन्न कमावले असून तिला त्यातून १२.७५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. ‘ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस’मध्ये नमूद केल्यानुसार, ‘एक्सेलसॉफ्ट’ची व्यावसायिक रचना आणि क्षेत्रीय योगदान यांसारखी भारतात इतर कोणतीही सूचीबद्ध कंपनी किंवा स्पर्धक नाही.

जागतिक स्तरावर सॉफ्टवेअर-सेवा बाजार झपाट्याने वाढत आहे आणि व्हर्टिकल सॉफ्टवेअर-सेवा हे क्षेत्र उद्योग-विशिष्ट उपाय पुरवणारे म्हणून उदयास आले आहे. ‘अॅरिझटन’च्या एका अहवालानुसार, व्हर्टिकल सॉफ्टवेअर-सेवा हा उद्योग जनरल सॉफ्टवेअर-सेवा या उद्योगापेक्षा जास्त वेगाने वाढणार आहे आणि सॉफ्टवेअर-सेवा क्षेत्रातील सुमारे ५० टक्के बाजारहिस्सा २०३०पर्यंत व्हर्टिकल सॉफ्टवेअर-सेवा उद्योग काबीज करील, अशी शक्यता आहे.

या इश्यूसाठी आनंद राठी अॅडव्हायजर्स लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई आणि एनएसई येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.डीआरएचपी लिंक: https://www.anandrathiib.com/pdf/documents/Excelsoft%20Technologies%20Limited%20-%20Draft%20Red%20Herring%20Prospectus.pdf

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments