Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने रानजाई महोत्सव व भव्य फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन...

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने रानजाई महोत्सव व भव्य फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन..

पिंपरी, दि.६ मार्च २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने ‘रानजाई महोत्सव’ व २८ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धा ’ दिनांक ७ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या महोत्सवामध्ये हिंदी मराठी गीतगायन, नृत्य, पथनाट्य, मॅजिक शो, पपेट शो, आर जे गेम्स तसेच जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून या महोत्सवात शहरवासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

महापौर निवास, सेक्टर नं २७ संत तुकाराम उद्यान शेजारी, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार ७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमास सहकारी आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे. याव्यतिरिक्त खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप,शंकर मांडेकर, आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे यांची सन्माननीय उपस्थिती यावेळी असणार आहे. या मान्यवरांसह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांनी दिली आहे. याशिवाय ९ मार्च रोजी मराठी सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची देखील या कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments