नवी दिल्ली, मार्च ६, २०२५ – नेसप्रेसो या अव्वल दर्जाच्या अग्रणी पोर्शन्ड कॉफी ब्रॅण्डला नवी दिल्लीतील साकेत भागातील सिलेक्ट सिटीवॉक मॉलच्या तळमजल्यावर आपल्या पहिल्या बुटिकच्या भव्य उद्घाटनाची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. २०२४ सालाच्या अखेरीस भारतात प्रवेश केल्यानंतर नेसप्रेसोच्या जागतिक विस्तार योजनेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे.
हे नवीन बुटिक कॉफीप्रेमींना एक गुंगवून टाकणारा अनुभव देऊ करते. उच्च दर्जाच्या कॉफी आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची नेसप्रेसोची प्रतिष्ठित श्रेणी या बुटिकमध्ये बघायला मिळते. ग्राहक येथे कॉफीच्या वैविध्यपूर्ण मिश्रणांचा अनुभव आणि आस्वादही घेऊ शकतात, प्रशिक्षित कॉफी तज्ज्ञांकडून व्यक्तिनुरूप शिफारशी प्राप्त करू शकतात आणि नेसप्रेसोच्या शाश्वततेप्रती बांधिलकीबाबत माहिती घेऊ शकतात.
नेसप्रेसोचे सीईओ फिलिप नावरातिल, म्हणाले: “नेसप्रेसोच्या बुटिकचे दिल्लीत झालेले उद्घाटन म्हणजे भारतात कॉफी संस्कृतीची जोपासना करण्याप्रती आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. मला या महत्त्वपूर्ण टप्प्याचा खूप अभिमान वाटतो. त्यामुळे नेसप्रेसोची अविस्मरणीय चव भारतातील कॉफीप्रेमींपर्यंत पोहोचवण्यात आम्हाला मदत होणार आहे. नेसप्रेसो कॉफीचा प्रत्येक कप हा दर्जाची, कारागिरीची आणि शाश्वततेती कथा सांगतो असे आम्हाला वाटते. या नवीन जागेच्या माध्यमातून आम्ही कॉफीप्रेमींना एका अद्वितीय संवेदनांच्या प्रवासात हरवून जाण्याचे आमंत्रण देत आहोत. येथे ते दुर्मिळ मिश्रणांच्या आणि नवोन्मेष्कारी यंत्रांच्या वैविध्यपूर्ण श्रेणीतून त्यांना हवे ते शोधू शकतील.”
नेस्ले इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन या विस्ताराबद्दल म्हणाले: “भारतातील कॉफी संस्कृती वेगाने उत्क्रांत होत आहे आणि आमचे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले कौशल्य व नेसप्रेसोचा अव्वल व अनन्यसाधारण अनुभव घेऊन येताना आम्हाला आनंद वाटत आहे. भारतात नेसप्रेसो सुरू करण्यामधून आमचा उत्कृष्टतेचा ध्यास आणि भारतीय ग्राहकांना जागतिक दर्जाचा कॉफी अनुभव देण्याप्रती आमची बांधिलकी हे दोन्ही दिसून येते. भारतातील कॉफी संस्कृती सातत्याने विकसित होत असताना कॉफीरसिकांना ब्रॅण्डची लज्जत अनुभवता येईल आणि त्यातील असामान्यत्वाची प्रचिती येईल अशी सौंदर्यपूर्ण जागा सर्वांपुढे आणणे आमच्यासाठीही रोमांचक अनुभव आहे.”
नेसप्रेसो आणि नेस्ले इंडियाला भारतातील आपले अधिकृत वितरण सहयोगी म्हणून ठकराल इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाची घोषणा करताना आनंद होत आहे. या सहयोगींमार्फत नेसप्रेसो कॉफी उत्पादनांची संपूर्ण श्रेणी सर्व माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
नेसप्रेसो २०११ सालापासून भारतातून उच्च दर्जाची ग्रीन कॉफी खरेदी करत आहे आणि आपल्या एएए सस्टेनेबल क्वालिटी प्रोग्राममार्फत देशातील सुमारे २,००० कॉफी उत्पादकांशी थेट जोडलेली आहे. हा उपक्रम कॉफीचा दर्जा, शेताची उत्पादनक्षमता व शाश्वतता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो. यातून कॉफीच्या संपूर्ण मूल्यसाखळीवर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याप्रती नेसप्रेसोची बांधिलकी दिसून येते.
नेसप्रेसोच्या विश्वाला भेट देण्यासाठी व त्याचा वेध घेण्यासाठी कॉफीप्रेमींचे स्वागत आहे. सिलेक्ट सिटीवॉक मॉलमधील नेसप्रेसो बुटिकला भेट देऊन ते अपवादात्मक चवीची सफर सुरू करू शकतात. कॉफीप्रेमी आमच्या ऑनलाइन बुटिकलाही भेट देऊ शकतात: https://www.nespresso.com/in/en/.


