” शिक्षण, कौशल्य विकास, कृषी, उद्योग आणि पायाभूत सुविधा यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
आपल्या राज्याच्या विकासाला चालना देणारा आणि देशात महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे.
या अर्थसंकल्पासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री. अजित दादा पवार यांचे मनापासून अभिनंदन करतो.
सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या आशा आकांक्षांना भरारी देण्यासाठी अर्थसंकल्पात स्वागत करण्याजोग्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा अर्थसंकल्प उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांच्या भविष्याची उज्वल दिशा दाखवतो. कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे त्यामुळे युवकांना योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शिक्षण क्षेत्रात आवश्यक भौतिक सुविधा, ई लर्निंग, पुरेसे मनुष्यबळ आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाणार आहे.
औद्योगिक विकासाच्या बाबतीत, राज्याने थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल स्थान मिळवले आहे. दावोसमध्ये करण्यात आलेले सामंजस्य करार हे याचे प्रमाण आहे. 16 लाख रोजगार निर्मितीच्या अपेक्षेने, राज्याच्या आर्थिक विकासात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
अभिजात मराठी भाषा सन्मान आणि त्या संदर्भातील सप्ताह साजरा करणे हे आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यास मदत करेल आणि वाचन संस्कृती बळकट करेल. अनुवाद अकादमी स्थापन करणेही भाषा संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
एकूणच, हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या जीवनमानाच्या उन्नतीसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. भाजप महायुती सरकारच्या या कार्यकुशलतेमुळे राज्याच्या प्रगतीला नवीन गती मिळेल.”


