पुणे –
(क्रीडा प्रतिनिधी)
एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दरवर्षी *जी पी सहस्रबुद्धे चषक* एकेरी कॅरम स्पर्धा घेण्यात येतात.
या वर्षीच्या हा कॅरम स्पर्धा २० मार्च ते २३ मार्च २५ ह्या कालावधीमध्ये एरंडवणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामध्ये घेण्यात येणार आहेत.
स्पर्धेमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ६० वर्षांवरील सर्व स्त्री पुरुष ज्येष्ठ नागरिक भाग घेऊ शकतील.
प्रथम क्रमांक विजेत्यास रुपये तीन हजार व जी पी सहस्रबुद्धे चषक,द्वितीय क्रमांक विजेत्यास रुपये दोन हजार,तृतीय व चतुर्थ क्रमांक विजेत्यास रुपये एक हजार रुपये आणि क्रमांक पाच ते आठ खेळाडूंना रुपये पाचशे प्रत्येकी अशी पारितोषिके देण्यात येतील.
अधिक माहिती व स्पर्धेत नाव नोंदणीसाठी शिरीष जोशी कॅरम स्पर्धा प्रमुख (9822843106),पंकज कुलकर्णी(9011072950),सतीश सहस्रबुद्धे (9028332736)यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अजित गोखले यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी *जी पी सहस्रबुद्धे चषक कॅरम एकेरी* स्पर्धा २० मार्च पासून
RELATED ARTICLES


