पुणे, 17 मार्च २०२५: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय)ने आज सुधारित स्टाइलिंगसह अपडेटेड ओबीडी२बी-प्रमाणिात शाइन १०० लाँच केली. नवीन २०२५ होंडा शाइन १०० ची किंमत ६८,७६७ रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही मोटरसायकल आता भारतभरातील एचएमएसआय डिलरशिप्समध्ये उपलब्ध आहे.
अपडेटेड शाइन १०० लाँच करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. त्सुत्सुमू ओटनी म्हणाले, ”आम्हाला भारतातील ग्राहकांसाठी नवीन ओबीडी२बी-प्रमाणित शाइन १०० लाँच करण्याचा आनंद होत आहे. मार्च २०२३ मध्ये लाँच झाल्यापासून शाइन १०० ने एचएमएसआयच्या मोटरसायकल पोर्टफोलिओमधील झपाट्याने विकसित होणारा ब्रँड म्हणून स्वत:चे स्थान स्थापित केले आहे. या एण्ट्री-लेव्हल मोटरसायकलला उच्च दर्जाची विश्वसनीयता, इंधन कार्यक्षमता आणि एकूण मूल्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. नवीन अपडेटसह आम्ही पर्यावरणदृष्ट्या जबाबदार आणि उच्च दर्जाचे गतीशीलता सोल्यूशन्स देण्याप्रती आमची कटिबद्धता कायम ठेवली आहे.”
या घोषणेबाबत मत व्यक्त करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या सेल्स अँड मार्केटिंगचे संचालक श्री. योगेश माथूर म्हणाले, ”शाइन १०० एण्ट्री-लेव्हल मोटरसायकल श्रेणीमध्ये प्रबळ ठरली आहे, जी किफायतशीर दरामध्ये अपवादात्मक दर्जा व आरामदायीपणा देते. या नवीन अपग्रेडसह आम्ही मोटरसायकल अपील अधिक वाढवत आहोत आणि आधुनिक उत्सर्जन नियमांचे पालन होण्याची खात्री घेत आहोत, तसेच या मोटरसायकलची प्रख्यात इंधन कार्यक्षमता व विश्वसनीयता कायम ठेवत आहोत. शाइन १०० ने एण्ट्री-लेव्हल कम्यूटर श्रेणीमध्ये होंडाची उपस्थिती प्रबळ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ‘नये इंडिया की अमेझिंग शाइन’चे हे नवीन व्हर्जन भारतभरातील अधिकाधिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत राहिल.”
नवीन शाइन १००: अपडेटेड डिझाइन आणि इंजिन
नवीन शाइन १०० मध्ये भारतातील लोकप्रिय शाइन १२५ मधून प्रेरित आकर्षक डिझाइन शैली आहे. या मोटरसायकलच्या बॉडी पॅनेल्सवर नवीन ग्राफिक्स व होंडा लोगो आहे. या मोटरसायकलमधील लक्षवेधक फ्रण्ट काऊल, ब्लॅक-आऊट अलॉई व्हील्स, व्यावहारिक अॅल्युमिनिअम ग्रॅबरेल, लांब व आरामदायी सिंगल-पीस सीट आणि स्लीक मफलर मोटरसायकलच्या स्मूद स्टाइलला अनुसरून आहेत, तसेच दैनंदिन प्रवासासाठी सोयीसुविधेमध्ये वाढ करतात.
शाइन १०० पाच डायनॅमिक रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे राइडरच्या विविध पसंतींची पूर्तता होते. हे रंग आहेत ब्लॅकसह रेड, ब्लॅकसह ब्ल्यू, ब्लॅकसह ऑरेंज, ब्लॅकसह ग्रे आणि ब्लॅकसह ग्रीन. वजनाने हलके, पण टिकाऊ डायमंड-टाइप फ्रेमवर निर्माण करण्यात आलेली शाइन १०० उच्च दर्जाच्या राइड आरामदायीपणासाठी डिझाइन करण्यात आली आहे. या मोटरसायकलमध्ये टेलिस्कोपिक फ्रण्ट फोक्स आणि ट्विन रिअर शॉक अॅब्जॉबर्स आहेत, ज्यामधून विविध रस्त्यांवर स्थिरतेची खात्री मिळते.
अधिक सुरक्षिततेसाठी शाइन १०० मध्ये दोन्ही बाजूस ड्रम ब्रेक्ससोबत सीबीएस (कम्बाइन्ड ब्रेकिंग सिस्टम) आहे. या मोटरसायकलमध्ये ९८.९८ सीसी, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड, फ्यूएल-इंजेक्टेड इंजिनची शक्ती आहे, जे आता आधुनिक उत्सर्जन नियमांची पूर्तता करण्यासाठी ओबीडी२बी-प्रमाणित आहे. हे इंजिन ७५०० आरपीएममध्ये ५.४३ केडब्ल्यू शक्ती आणि ५००० आरपीएममध्ये ८.०४ एनएम टॉर्क देते, ज्यामधून उत्साहवर्धक व कार्यक्षम राइडची खात्री मिळते. इंजिनसोबत ४-स्पीड गिअरबॉक्स आहे.
नवीन शाइन १००: किंमत आणि उपलब्धता
नवीन २०२५ होंडा शाइन १०० ची किंमत ६८,७६७ रूपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. ही मोटरसायकल सिंगल व्हेरिएण्टसह पाच रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. शाइन १०० आता भारतभरातील सर्व एचएमएसआय डिलरशिप्समध्ये उपलब्ध आ


