Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाच्या...

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाच्या आयोजनासंदर्भात नियोजन बैठक पार पडली

पिंपरी, दि. १७ मार्च २०२५:-* क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वामध्ये दर्जेदार कार्यक्रम आयोजित करून या महापुरुषांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून जयंती निमित्त आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम आणि उपक्रम समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील, असे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले.

 

 

 

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाच्या आयोजनासंदर्भात महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात नियोजन बैठक पार पडली, त्यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर बोलत होते.

 

 

 

या बैठकीस उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य रामचंद्र माने, माजी सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, माजी कार्यकारी अभियंता शरद जाधव, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, उपअभियंता चंद्रकांत कुंभार तसेच संतोष जोगदंड, देवेंद्र तायडे, भाऊसाहेब अडागळे, निलध्वज माने, अँड.मिलिंद कांबळे, अँड. धम्मराज साळवे, अँड. विद्या शिंदे, बापूसाहेब गायकवाड, प्रकाश बुक्तर, संजय धुतडमल, युवराज दाखले विशाल जाधव, शंकर लोंढे, सुरेश रोकडे, गणेश भोसले, निवृत्ती आरवडे, तुकाराम गायकवाड, कृपादेव वाघमारे, राघु बनसोडे, रोहिणी बनसोडे, स्वप्नील पोटभरे, पुजाराणी पोटभरे, दिपक वारभुवन, प्रमोद क्षिरसागर, नितीन गवळी, ,मयूर गायकवाड,विशाल भालेराव,नाना म्हस्के, संतोष शिंदे, विशाल जाधव, सुरेश रोकडे, गणेश भोसले, नितीन गवळी, भुषण गवळी, राहुल सोनवणे, आनंदा कुदळे, उत्तम कांबळे, लालासाहेब गायकवाड, सुरज गायकवाड, स्वातीताई कदम, विजयकुमार उलपे, दत्ता गुंड, जय भोसले, अरूण मैराळे, हौसराव शिंदे, राम भंडारे, संगीता भंडारे, गोविंद गाडे, स्वप्नील पनवर, अनिरूद्ध सुर्यवंशी, शिलाबाई साबळे, मारूती जकाते, बी. बी. शिंदे, अशोक जावळे, बालाजी बरगाले, गणेश भुजबळ, बुद्धभूषण अहिरे, विनोद चांदमारे, राजेंद्र चव्हाण, सिद्धार्थ ओव्हाळ, प्रमोद शेरे, निलेश तायडे, मुकुंद रणदिवे, भोला इंगळे, राजकुमार सोनवले, दामू चंदनशिवे, प्रशांत मगडे, गुंडूराज कांबळे, विशाल ओव्हाळ, सुनिल गायकवाड, निलेश घाडगे, किशोर रणवीर, राजेंद्र पवार, संजय वाघमारे, सिद्धार्थ बनसोडे, लक्ष्मण माने, बाबुराव खळसोडे, अजय धावारे, धनाजी हरिदास गायकवाड, सुरज अडागळे, अनिल सुर्यवंशी, बी.आर अडागळे, सुनिल भिसे, नितीन घोलप, दशरथ ठाणांबारे, राजेंद्र साळवे, केशवकुमार शिंदे, सिद्धार्थ मोरे, शिवाजी चव्हाण, राणु ढोकळ, महेंद्र सरवदे, प्रमोद गायकवाड, रमेश जाधव, विक्रम खंडागळे आदींसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

 

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ख-या अर्थाने साजरी करण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम राबविण्याकडे महापालिकेचा कल असेल. असे इंदलकर म्हणाले.

 

 

 

पिंपरी येथील पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करावी, पुस्तक संमेलनाचे आयोजन करावे, विचार प्रबोधन पर्वामध्ये दर्जेदार कार्यक्रमांचा समावेश असावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मांडणी करणारे कायदेतज्ञ, अर्थतज्ञ,जलतज्ञ यांच्यासह कार्यक्रम घ्यावेत, कार्यक्रमाची व्यापक प्रसिध्दी करावी, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करावे, सर्व शाळांमध्ये महापुरुषांची जयंती साजरी व्हावी यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, आरोग्य तपासणी तसेच रक्तदान शिबीर आयोजित करावे, कार्यक्रम परिसरात स्वच्छतेविषयी दक्षता घ्यावी, उद्योजकता आणि रोजगार प्रशिक्षण शिबीर घ्यावे, कौशल्य आणि विकासात्मक उपक्रम राबवावे, पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करावी आदी सूचना उपस्थितांनी या बैठकीत मांडल्या. आजच्या बैठकीतील सूचना – कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी वाढवावी, भीमसृष्टीच्या कमानीच्या बाहेरील विद्युत तारांचे जाळे हटविण्यात यावे, यासह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेणेबाबत सूचना प्रपात झाल्या.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments