Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorized.......१९ मार्च पासून भारतभर किसान संवाद यात्रा आंदोलन.!*

…….१९ मार्च पासून भारतभर किसान संवाद यात्रा आंदोलन.!*

 

 

*”शेतकऱ्यांनो एखाद्या वेळेस खोटारडे सरकारचा त्याग करा., जुमलेबाज नेत्याचा त्याग करा, भ्रष्टाचारी मंत्र्याचा त्याग करा, परंतु यापुढे शेतकऱ्यांनी तरी कधीही अन्नत्याग करायचा नाही.! अन् जमलेच तर यापुढे सर्व शेतकऱ्यांनी मिळून एकाच वज्रमुठीने, एक जुटीने-सरकारचाच त्याग करू, एकतर शेती पिकवायची नाही किंवा पिकली तर तो शेतमाल किमान दोन-तीन महिने तरी विकायचा नाही, यासाठी आम्ही राष्ट्रीय किसान संवाद यात्रा सुरू करत आहोत आपण जमेल तिथे सहभागी व्हा. पण अता एक वज्रमूट करुयात आणि सरकार मधल्या आमदार खासदार मंत्री आणि कलम कसायांनाच अन्न त्याग करायला भाग पाडू,! विठ्ठल राजे पवार.,,*

 

 

*पुणे दिनांक १८मार्च २०२४.*

*खर आहे आपला देश कृषीप्रधान आहे तोही केवळ गोरगरिबांनी खऱ्या अर्थाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवावर. आज भारतीय शेतकऱ्यांनी आणि शेतकरी कष्टकरी कामगारांनी देशाचा जीडीपी सातत्याने उंचावत ठेवलेला आहे, आणि तू पाडण्याचं काम सरकारने केलं. सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनावर उद्योग व्यवसायावरती हजारो लाख करोड रुपये कमवून त्या शेतकऱ्याला सातत्याने शेतमालाला हमीभाव जाहीर करू नही तो सातत्याने हामी पेक्षा कमी दिला! आणि त्यामुळेच भारतीय शेतकरी हा इंडियातल्या कलम कसायांच्या चुकीच्या निर्णयामुळे देशातील शेतकरी आत्महत्याला १९८६ पासून सुरुवात झाली तो दिवस म्हणजे १९ मार्च १९८६ हा होय. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या गावातील शेतकरी प्रकाश आणि मालती पाटील या कुटुंबियांनी सहकुटुंब १९ मार्च या दिवशी आत्महत्या केली होती. मी शेतकरी कष्टकरी कामगार सामाजिक चळवळीमध्ये गेले ४५ वर्षे सातत्याने काम करत असताना कधीही शेतकरी आत्महत्येचा समर्थन केलं नाही, आणि करणारही नाही, गेल्या अनेक वर्षांमध्ये सातत्याने आंदोलन करत असताना शेतकऱ्यांना एक सल्ला कायम दिलेला आहे “आत्महत्या हा पर्याय नाही,, आम सातत्याने तो थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, करत आहोत, परंतु ते थांबण्याचे नाव घेत नाही, त्याला सर्व प्रकारचे सर्व बाजूने फक्त आणि फक्त सरकार सहकार आणि बँकिंग क्षेत्र जबाबदार आहे. श्रीमंतांनी उद्योजकांनी लाखो कोटींनी कर्जे घ्यायची आणि ते बँका सह बुडवायच्या, आणि त्या बँका आणि सरकारच्या तिजोऱ्या बुडवायचं काम त्यांना सहकार्य करणारे सरकार मधले कलम कसाई होय कलम कसा हीच ते त्यांना मदत करतात आणि सरकार सोबत ते देखील खजिनाल उठतात, सरकार आणि सरकार मधल्या कलम कसे यांचं हे वागणं बरं नाही, ते लोक देशाला एक दिवशी अन्नधान्याच्या संकटांमध्ये आणणार आहेत ही काळ्दया गडावरची पांढरी रेघ आहे. न्यायालयाने राज्य व केंद्र अन्न आयोगाने वारंवार सूचना देऊ नये सरकार आणि कलम कसाई ऐकत नाहीत, ही गंभीर परिस्थिती या सरकारने विसरू नये.*

*सरकारसोबत उद्योजकांनी बँकार लुटायचे आणि बुडवायच्या अन् त्या गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांनी मात्र बँकाही जगवायच्या, सरकारी जगवायचं,! आणि उद्योजक ही जगवायचे.!! हा कोणता न्याय, असो इतके प्रामाणिक कष्ट शेतकरी कष्टकऱ्यांनी करून देखील त्यांनांच जर आत्महत्या करायची वेळ येत असेल तर.? तर या सरकारचे हे वागणं बरं नव्हं.! आणि कायदा आणि घटना पायदळी तुडवणं हेही बरं नाही, १९७९ पासून सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी सातत्याने समजावून त्यामध्ये शेतकऱ्यांचं अर्थकारण सरकारला समजून सांगूनही जर सरकार नीट वागत नसेल तर सरकारलाच यापुढे अन्नत्याग करायची वेळ आणावी लागेल, तसेभाग पाडावे लागेल असं माझं स्पष्ट मत आहे.

सहकार्याने या लढ्यामध्येलढ म्हणून यापुढे भारतातील तमाम शेतकऱ्यांन श्रद्धेय युगपुरुष शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांची शपथ घेऊन सांगतो, ‘शेतकऱ्यांनो यापुढे कोणीही आत्महत्या करायच्या नाही!, कि कोणीही यापुढे अन्न त्यागही करायचं नाही.! माझ्या शेतकरी भावांनो आणि माता-भगिनींनो अन्न आपण पिकवायचं आणि त्यागही आपणच करायचा का.?? आणि कशासाठी त्यावर एकच पर्याय म्हणून तुम्हाला आणि मला यापुढे वज्रमुठ आवळावी लागेल, शेतकऱ्यांसोबत, धोकादाडी आणि खोटारडेपणा करणाऱ्या सरकारांना आपण एकीची वज्रमूठ मुठ एकत्र करून आपली ताकद दाखवावी लागेल, जमलं तर आपण सरकारचाच त्याग करू परंतु , यापुढे आपला परिवार आणि आपण स्वतः आपणच पिकूउन आपनच कशासाठी उपाशी राहू. आता रडत बसायचं नाही तर लढत राहायचं.! *आपण त्याग करायचा आपण इतके वर्ष त्याग करत आलेलो आहे तरी सरकारला सरकारला जाग येत नाही. म्हणून यापुढे तुम्हाला आणि मला ठोसपणाने निर्णय घ्यावा लागेल आज शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ संघटना फेडरेशन ही संपूर्ण भारतभर कार्यरत आहे, आणि भारतीय सरकारची मान्यता असलेली एकमेव फेडरेशन शेतकरी चळवळ देशामध्ये काम करते आहे , नव्हे तर आज आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपण पोहोचलेलो आहोत, आज आपण आपल्या महासंघ फेडरेशनच्या माध्यमातून महा ऍग्रो कंपनीची स्थापना केलेली आहे त्या माध्यमातून आपण जवळपास सव्वाशे ते दीडशे एफ आय जी म्हणजे फार्मर्स ग्रुप कंपन्या तयार केल्यात आपल्याला या ग्रुपच्या आणि महा ऍग्रो चे माध्यमातून आपण जे पिकवलेले आहे, ‘ते, आपण स्वतः विकायचे, म्हणजे यापुढे शेतकऱ्यांना कृषी अर्थकारण पुन्हा समजून सांगत पुन्हा नव्या जोमाने पुन्हा एकदा उत्तम शेती कृषी उद्योगासोबतच व्यापार उद्योग देखील आपल्या शेतकरी भावांना आपण शिकवायचा आणि तो शिकवलाच पाहिजे आणि आपली लूट आपण थांबवली पाहिजे.! यापुढे आपल्या शेतमालाचा भाव आपण ठरवू अशा पद्धतीचं काम ही, ‘शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांचे प्रेरणेने शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ कामगार संघटन फेडरेशनच्या माध्यमातून सुरू आहे, आपण सर्वजण मिळून तुम्हांला आणि मला ‘राष्ट्रीय किसान संवाद यात्रा, या जनशक्ती आहे त्यांनी जन सहभागी होते त्यांनी सहभागी व्हावे ज्यांना मदत करता येते त्यांनी आर्थिक आणि सामाजिक मदत करावी ज्यांना लिहिता येते त्यांनी लिहावे आणि ज्यांना लढता येते त्यांनी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आपापल्या तालुका गाव आणि देशपातळीवरती ‘राष्ट्रीय किसान संवाद यात्रा या आंदोलनानिमित्ताने, एकत्र होऊया आणि आपल्या शेतकऱ्यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्महत्या होऊ द्यायची नाही ही शपथ आज आपण १९ मार्चच्या निमित्ताने घेऊया कोणताही त्याग न करता आपण यापुढे जमलं तर आपल्या वज्रमुठीने आपल्या ताकतीने आपल्या संख्येने आपण सरकारचा त्याग करू आणि आपण आपला हक्क, शेतकरी विरोधी कायदे फेकून देऊ, आणि भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या प्रमाणे आपण तो मागून दिला जात नसेल तर तो आपण हिसकावून घेऊ. ही घटनेने दिलेला अधिकार आहे आणि तो आपण मिळवू आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आम्ही आपल्या संघटनेच्या माध्यमातून सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल मुक्त केले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी संघटनेने उभारलेल्या या लढ्यात आपण तन-मन-धन सहकार्याने या लढ्यामध्ये सहभागी होऊन दुसरी महान कृषी क्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. आणि तमाम शेतकरी भावा-बहिणींनी, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाचे शिल्पकार व्हावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments