Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedमिलेनियम शाळेमध्ये खासदार प्रकाश जावडेकर यांची भेट

मिलेनियम शाळेमध्ये खासदार प्रकाश जावडेकर यांची भेट

“राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये वय वर्षे तीन ते आठ या वयोगटातील, मुलांच्या शिक्षणावर जास्त भर आहे. कारण याच वयामध्ये बुद्धिमत्तेचा विकास होतो आणि कल्पना शक्तीचा विकास होतो आणि रीत लागते. त्यामुळे कोणतेही पुस्तक व परीक्षा न घेता अनुभवातून आणि खेळातून शिक्षण देण्याची यात कल्पना आहे. ही क्रांतिकारी कल्पना आहे. बालशिक्षणाचा हा नवा अध्याय आहे. विद्यार्थी चांगले नागरिक बनावेत, यासाठीचे अनेक संस्कार याच वयामध्ये होऊ शकतात. त्यामुळे अंगणवाड्या आणि शाळा या जवळजवळ व एकाच आवारात तयार होतील आणि प्रशिक्षित शिक्षक, विद्यार्थ्यांना घडवण्याचं मोलाचं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे” असे उद्गार माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मिलियन शाळेमध्ये झालेल्या शिक्षक संवाद कार्यक्रमामध्ये काढले.

माननीय जावडेकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा मागचा हेतू, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या तरतुदी , तसेच व्यावसायिक व कला क्रीडा क्षेत्रातील विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी पदवी पातळीपर्यंत दिलेले विविध विकल्प याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि पारंपारिक शिक्षणाबरोबरच कौशल्य ही आत्मसात करून जीवन सुकर बनवावे असा मोलाचा सल्ला दिला.

मिलेनियम नॅशनल स्कूल , कर्वेनगर या शाळेमध्ये माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधीतून शाळेच्या संगणक वर्गाला 44 संगणक, 10 इंटरऍक्टिव्ह पॅनल्स आणि 5 लॅपटॉप देण्यात आले होते. माननीय प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज त्याचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे संचालक श्री. फाटक, व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी श्री केदार वाळिंबे, शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका वैद्य, शिक्षक व पालक वर्ग, विद्यार्थी प्रतिनिधी आणि बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेले श्री सुधीर दप्तरदार उपस्थित होते.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेत होणाऱ्या विविध संगणक आधारित उपक्रमांविषयी श्री जावडेकर यांना माहिती दिली. इयत्ता तिसरी पासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाणारे विविध प्रोग्रॅम, त्यात मुलांनी केलेले प्रोजेक्ट, संगणकाच्या मदतीने केलेली न्यूज लेटर्स तसेच सृजनरंग सारखे शालेय अंक, स्नेहसंमेलनामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेले एलईडी डिस्प्ले, विद्यार्थ्यांनी स्वतःचे केलेले पोर्टफोलिओ अशासारख्या उपक्रमाची माहिती उदाहरणांसह दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments