Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रेयाचे श्रेय !

श्रेयाचे श्रेय !

 

 

 

पुणे येथील युवा आर्किटेक्ट श्रेया अतुल पोफळे हिला

“वास्तुकला आणि अंतर्गत रचना “: उत्कृष्टतेचा उत्सव ” या राष्ट्रीय स्पर्धेत

“सर्वोत्कृष्ट सर्जनशील आणि उदयोन्मुख अंतर्गत रचना आणि प्रकल्प व्यवस्थापन संस्था २०२५,महाराष्ट्र ” तसेच ” विश्वासार्ह आणि उदयोन्मुख वास्तुविशारद आणि अंतर्गत रचनाकार २०२५, महाराष्ट्र” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित झाली आहे. हा पुरस्कार तिला नुकताच बिगीन अप या संस्थेतर्फे बंगलोर येथील ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य

समारंभात नुकताच प्रदान करण्यात आला. वास्तुकला आणि अंतर्गत रचना क्षेत्रातील उत्कृष्टता, नाविन्य आणि सर्जनशीलतेचा सन्मान करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे.

 

विशेष म्हणजे पुरस्कार कुणाला द्यायचा हे , संस्था स्वतःच ठरवीत नाही.तर या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवर व्यक्ति विविध उल्लेखनीय प्रकल्प आणि व्यक्तींना नामांकित करीत असतात. पुढे पुरस्कार निवड समितीच्या वतीने सर्व नामांकने तपासली जाऊन त्यातून अंतिम निवड करण्यात येते.या निवड समितीत नावाजलेले वास्तुविशारद, अंतर्गत रचनाकार असतात. ते नामांकनातील नाविन्य, शाश्वतता, सौंदर्यशास्त्र आणि कार्यक्षमतेच्या निकषांवर मूल्यांकन करून पुरस्कारासाठी अंतिम निवड करतात.अंतिम निवड केलेल्या स्पर्धकांना आपापले सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले जाते. त्यांनी त्यांचे प्रकल्प सादर करत

असताना त्यांचे दृष्टीकोन,त्या मागील भूमिका निवड समितीच्या सदस्यांना समजावून सांगावी लागते.

 

अशी सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर श्रेया अतुल पोफळे हिच्या “श्रीनिवासम ”

या प्रकल्पाला हा पुरस्कार मिळाला आहे. या प्रकल्पात कमीतकमी साहित्याचा वापर, शाश्वतता, उबदार, रंगसंगती, कार्यक्षम आणि आकर्षक फर्निचर, साधेपणा आणि आधुनिकता यांचे उत्तम मिश्रण आहे.

 

हा पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना श्रेया म्हणाली,

“हा पुरस्कार मिळणे ही आमच्या टीमसाठी अभिमानाची बाब आहे . वास्तुकला व अंतर्गत रचना क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे. पुरस्कार देणाऱ्या बिगीन अप या संस्थेचे आणि निवड समितीच्या मान्यवर सदस्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच आमच्या संपूर्ण टीम, ग्राहक आणि सहकाऱ्यांचेही विशेष आभार कारण त्यांच्यामुळे हे शक्य झाले.”

 

पुरस्कार प्रदान कार्यक्रमात

वास्तुशास्त्र उद्योगातील प्रमुख तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. विविध चर्चासत्रे, प्रमुख भाषणे आणि एकमेकांशी संवाद साधण्याची संधी सर्वांना उपलब्ध झाली .

यावेळी श्रेया ने तिच्या प्रेरणा, रचना,तत्त्वज्ञान आणि भविष्यातील योजनांविषयी माहिती दिली.या कार्यक्रमास प्रसिद्ध वास्तुविशारद, रचनाकार , प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती.यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

 

श्रेया च्या या यशाचे विशेष कौतुक यासाठी वाटते की,तिचे सहावी पर्यंतचे शिक्षण येवला येथीलच स्वामी मुक्तानंद विद्यालयात मराठी माध्यमातून झाले. तर सातवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण त्याच शाळेत सेमी इंग्लिश माध्यमातून तर बारावी पर्यंत चे शिक्षण इंग्लिश माध्यमातून झाले.पुढे आपली आवड ओळखून तिने वास्तुशास्त्र ही शाखा निवडली. रीतसर प्रवेश परीक्षा देऊन तिने पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या

वास्तुशास्त्र महाविद्यालयात प्रवेश मिळविला. पाच वर्षांचा

हा अभ्यासक्रम करून नोकरीच्या मागे न लागता,एकीकडे तिने एम आय टी संस्थेत वास्तुशास्त्रातील मास्टर्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तर सहा महिन्यांच्या इंटर्नशिप च्या अनुभवाच्या आधारावर थेट स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस दाखविले आणि एलेगंझा स्टुडिओ ही स्वतःची फर्म सुरू केली.ही फर्म वाणिज्य आणि निवासी स्वरुपाचे प्रकल्प हाती घेत असते.या फर्म ने आता पर्यंत पुणे,सातारा,नाशिक,येवला,

नांदेड येथील प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.या बरोबरच फर्म मॉड्युलर किचन, कस्टम मेड सोफा अशी उत्पादने बनविण्यात सक्रिय आहे. आज श्रेया कडे २ पूर्ण वेळ आर्किटेक्ट, ५ इंटर्न्स तर कारखान्यात जवळपास ५० कामगार काम करीत आहेत.

त्यामुळे एलीगंजा स्टुडिओ हा श्रेया च्या व्यावसायिक प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. श्रेयाचे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!

लेखन:देवेंद्र भुजबळ

९८६९४८४८००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments