मोटोरोला ने edge 60 FUSION लाँच केला आहे, जो edge 50 fusion पेक्षा खऱ्या अर्थाने एक अपग्रेड ठरतो.
या फोनमध्ये जगातील सर्वात इमर्सिव्ह 1.5K ऑल 4 साइड्स कर्व्हड डिस्प्ले आहे, सोबत जगातील पहिला ट्रू कलर^ Sony-LYTIA 700C कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनमध्ये moto AI च्या सहाय्याने या सेगमेंटमधील सर्वोत्तम एआय अनुभव मिळतो आणि याला अल्टिमेट मिलिटरी ग्रेड टिकाऊपणाचे संरक्षण लाभले आहे.
हे सर्व फक्त ₹20,999* पासून उपलब्ध आहे.
उपलब्धता :
motorola edge 60 FUSION दोन स्टोरेज वेरियंट्समध्ये उपलब्ध होईल – 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज. हा फोन तीन जबरदस्त Pantone™ ने निवडलेल्या रंगांमध्ये उपलब्ध असेल – PANTONE Amazonite, PANTONE Slipstream आणि PANTONE Zephyr. या स्मार्टफोनची विक्री 9 एप्रिल 2025 पासून दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट, Motorola.in आणि रिलायन्स डिजिटलसहित देशभरातील प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होईल.
पुणे,3 एप्रिल 2025 : मोबाइल तंत्रज्ञान आणि नवकल्पनेत जागतिक आघाडीवर असलेला तसेच भारतातील आघाडीचा एआय स्मार्टफोन ब्रँड असलेल्या मोटोरोलाने आज आपल्या नव्या आणि बहुप्रतिक्षित edge 60 सिरीजमधील motorola edge 60 FUSION हा पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे. या नव्या सीरिजमधील प्राथमिक मॉडेल म्हणून हा फोन पूर्वीच्या लोकप्रिय edge 50 fusion च्या जवळपास प्रत्येक बाबतीत खऱ्या अर्थाने अपग्रेड ठरतो. प्रीमियम डिझाइन आणि प्रगत वैशिष्ट्यांचा मिलाफ हव्या असलेल्या ग्राहकांसाठी हा फोन खास डिझाइन करण्यात आला आहे. शक्तिशाली एआय-आधारित अनुभवाच्या सहाय्याने motorola edge 60 FUSION वापरकर्त्या अधिक सुलभ आणि स्मार्ट अनुभव मिळतो. जगातील सर्वात इमर्सिव्ह 1.5K ऑल 4 साइड्स कर्व्हड डिस्प्ले, Pantone मान्यताप्राप्त True Colour* टेक्नोलॉजी, जगातील पहिली आणि सेगमेंटमधील सर्वोत्तम 100% ट्रू कलर Sony LYT 700C कॅमेरा सिस्टीम आणि प्रगत एआय फीचर्ससह शानदार इमेजिंग अनुभव ही या स्मार्टफोनची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. यात moto AI च्या सहाय्याने जनरेटिव्ह एआय, कॅमेरा आणि असिस्ट फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे, जे सेगमेंटमधील सर्वोत्तम एआय अनुभव देतात. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये IP68 आणि IP69 अंडरवॉटर प्रोटेक्शनसह खऱ्या अर्थाने MIL-810H मिलिटरी ग्रेड प्रमाणपत्र प्राप्त संरक्षण आहे. तीन वेगवेगळ्या पॅन्टोनने निवडलेल्या जबरदस्त रंगांमध्ये आणि प्रीमियम व्हेगन लेदर फिनिशसह हा फोन उपलब्ध आहे.
motorola edge 60 FUSION मध्ये मोटोरोलाचा आजवरचा सर्वात शार्प आणि तेजस्वी डिस्प्ले आहे. यामध्ये सेगमेंटमधील सर्वोत्तम 96.3% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आहे. डिस्प्लेच्या कडांना 45 अंश आणि वर-खाली 33 अंश वळण (कर्व्ह) असल्यामुळे हा चारही बाजूंनी खरेच कर्व्ह्ड असलेला, जगातील सर्वात इमर्सिव्ह 1.5K ऑल-कर्व्हड डिस्प्ले ठरतो. यामध्ये Pantone™ मान्यताप्राप्त True Colour* टेक्नोलॉजी आहे. या pOLED डिस्प्लेमुळे स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रत्येक कंटेंटमधील रंगांची खरी क्षमता उलगडते. त्यामुळे वापरकर्त्याला अधिक स्पष्ट, जिवंत आणि सूक्ष्म तपशील असलेला व्हिज्युअल अनुभव मिळतो. 1220p 1.5K Super HD रिझोल्यूशनमुळे स्टँडर्ड Full HD (1080p) डिस्प्लेपेक्षा 13% अधिक रिझोल्यूशन मिळते. motorola edge 60 FUSION चा डिस्प्ले मागील पिढीच्या फोनपेक्षा 2.8 पट अधिक तेजस्वी असून, यामध्ये 4500 nits चा सर्वोच्च ब्राइटनेस आहे, जो या सेगमेंटमधील सर्वाधिक ब्राइटनेस आहे. वापरकर्त्याला HDR10+ असलेल्या pOLED डिस्प्लेमुळे गडद काळ्या रंगांचा इन्फिनिट कॉन्ट्रास्ट आणि अब्जावधी रंगांचा अनुभव घेता येतो. शिवाय, 100% DCI-P3 कलर गॅमटमुळे अधिक चमकदार आणि सिनेमॅटिक दर्जाचे अचूक रंगही पाहता येतात. motorola edge 60 FUSION हा जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये चारही बाजूंनी कर्व्हड डिस्प्ले असून Pantone™ मान्यताप्राप्त रंग आहेत. या डिव्हाइसने Pantone च्या मूल्यांकन आणि श्रेणीकरण निकषांची पूर्तता केली आहे, कारण यामध्ये वास्तवातील पॅन्टोन रंगछटांची पूर्ण रेंज अचूकपणे सादर करण्यात येते. Pantone SkinTone™ मान्यताप्राप्त असल्यामुळे हा डिस्प्ले मानवी त्वचेच्या विविध रंगछटा तंतोतंत दर्शवतो. याचा अल्ट्राफास्ट 120Hz रिफ्रेश रेट अॅप्स स्विच करताना, गेम खेळताना किंवा वेबसाईट स्क्रोल करताना अधिक स्मूथ आणि अखंड अनुभव मिळतो. यामधील 300Hz च्या लो लेटन्सी टच रेटमुळे युजर्सना पारंपरिक डिस्प्लेपेक्षा अधिक प्रतिसादक्षम अनुभव मिळतो. डिस्प्लेमध्ये SGS-प्रमाणित लो ब्लू लाईट एमिशन असलेले आय केअर, जे डोळ्यांचे संरक्षण करते, आणि DC डिमिंग, जे स्क्रीन ब्राइटनेस अॅडजस्ट करून दिसणारे फ्लिकर कमी करते, अशी काही इतरही उपयुक्त वैशिष्ट्ये आहेत. शिवाय, motorola edge 60 FUSION मध्ये सेगमेंटमधील सर्वात मजबूत Corning® Gorilla® Glass 7i आहे, ज्यामुळे दुप्पट अधिक चांगले ड्रॉप आणि स्क्रॅच प्रोटेक्शन मिळते.
==============================


