पुणे, ३ एप्रिल २०२५ -सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी रिटेल स्कूल, एमबीए मार्केटिंग सेमिस्टर – II च्या विद्यार्थ्यांनी नुकतीच इंदोर सहकारी दूध संघ मर्यादित सांची (SANCHI) येथे एक शैक्षणिक औद्योगिक भेट दिली. मध्य प्रदेश राज्य सहकारी दूध महासंघाशी संलग्न असलेल (SANCHI) सांची हे ९ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे, तसेच ४ मिनी डेअरी प्लांट्स आणि ११ मिल्क चिलिंग सेंटर मध्ये पसरलेला आहे.
या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना (SANCHI) सांचीच्या अत्याधुनिक प्रोसेसिंग प्लांटस पाहायला मिळाले. ४ लाख लिटर दूध दररोज प्रक्रिया करण्याच्या क्षमतेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या भेटीने विद्यार्थ्यांना दुग्ध उद्योगाच्या विविध प्रक्रियांबद्दल महत्त्वपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यास मदत मिळाली.
विद्यार्थ्यांनी पाश्चरायझेशन, कूलिंग आणि इव्हापोरेशन या जटिल प्रक्रिया पहिल्या आणि त्या सर्व प्रक्रियांमध्ये उच्च स्तराच्या स्वच्छतेच्या आणि गुणवत्तेच्या मानकांचे पालन कसे केले जाते हे समजून घेतले. (SANCHI) सांचीच्या उत्पादनांमध्ये एफडीए , एजीएमआरके , आयएसओ , बीआयएस आणि एफएसएसएआय प्रमाणपत्रांसारख्या विविध प्रमाणनांचे पालन करून गुणवत्तेची पातळी राखली जाते. विद्यार्थ्यांनी दूध, तूप, बटर, क्रीम पावडर, आईसक्रीम, बेकरी आयटम आणि पारंपारिक भारतीय मिठाईसारख्या उत्पादनांचे निरीक्षण केले. तसेच, (SANCHI) सांचीच्या पॅकेजिंग आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रणालीसंबंधीचे ज्ञानही विद्यार्थ्यांना मिळाले.


