मागील आठ वर्षांतला मॅग्नमचा पहिला नवीन फ्लेवर आणि नवीन जाहिरात भारतातील प्रीमियम आइस्क्रीम प्रेमींसाठी मेजवानी आणणार
टीव्हीसीची लिंक: https://youtu.be/jn3RXpwgqT8?si=d7aktsQwL8GUxIpi
राष्ट्रीय, ९ एप्रिल २०२५: लक्झरी आणि सर्वोत्तम बेल्जियन चॉकलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या ख्यातनाम आइस्क्रीम ब्रँड मॅग्नमने आठ वर्षांनंतर मॅग्नम पिस्ताचिओ हे नवीन आइस्क्रीम आणले आहे. ते चाहत्यांना नवीन चवीचा आनंद देईल. या उत्कृष्ट नवीन ऑफरमध्ये मॅग्नमचा कुरकुरीतपणा आणि पिस्त्याची अद्वितीय चव एकत्र आले आहेत. त्यामुळे तो आनंद शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम मेजवानी ठरला आहे. एवढेच नाही कप! इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या दुबई चॉकलेट ट्रेंडच्या प्रेमींसाठी ते क्रीम आणि दाणेदारपणाचे उत्तम संतुलन साधते.
या अद्भुत चवीचा आनंद प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मॅग्नमने बॉलीवूडची एक ख्यातनाम स्टायलिश अभिनेत्री करीना कपूर खानला सोबत घेतले आहे. त्यातून हा अनुभव फक्त चवीपुरताच मर्यादित नसून अत्यंत शुद्ध स्वरूपात आनंदाचा उत्सव असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही नवीन जाहिरात लक्झरी, फॅशन आणि चव या सर्व गोष्टी एकत्र आणते. त्यात करीना कपूर मॅग्नमच्या अद्वितीय आनंदाची अनुभूती घेताना दिसेल. बेल्जियम चॉकलेटच्या पहिल्या तुकड्यापासून ते पिस्त्याच्या वेल्वेटसारख्या समृद्धपणापर्यंत हा समन्वय समृद्धता दर्शवतो. त्यामुळे आनंदाचा शोध घेणाऱ्यांना प्रत्येक चव अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचा अनुभव मिळेल.
उत्साहात भर घालताना मॅग्नमच्या ब्रँड अॅम्बेसेडर करीना कपूर खान म्हणाल्या की, “या वर्षी माझ्या आवडत्या मॅग्नम आईस्क्रीमच्या चवीला १० वर्षे पूर्ण झाली आहेत, दर वेळी एक अद्वितीय चव! माझा या ब्रँडशी खूप चांगला संबंध आहे आणि मॅग्नममध्ये मला आवडणारी प्रत्येक गोष्ट आहे. मला या आइस्क्रीमचा नेहमीच मोह पडतो. मॅग्नमचे नवीन उत्पादन – पूर्णपणे नवीन मॅग्नम पिस्ता बाजारात आणताना मला खूप आनंद होत आहे! मोठा बेल्जियन चॉकलेटचा थर आणि भाजलेल्या पिस्त्यांनी तयार झालेले समृद्ध पिस्ता आईस्क्रीम – हे शुद्ध आनंदाचेच एक रूप आहे! तर माझ्या #PleasureStudio मध्ये या आणि चव घ्या. मला आशा आहे की तुम्हाला ते माझ्याइतकेच आवडेल.”
एचयूएलच्या आईस्क्रीम व्यवसायाचे प्रमुख टोलॉय तानरीदागली म्हणाले, “मॅग्नम पिस्तासोबत आम्ही भारतीय ग्राहकांसाठी लक्झरीची नव्याने व्याख्या करणारा आणि जागतिक स्तरावरील सर्वात ट्रेंडिंग फ्लेवर्सपैकी एक आणत आहोत. चॉकलेट क्राफ्टिंग आणि अत्याधुनिक आईस्क्रीम चवींमधील कौशल्यासाठी मॅग्नमचे नेहमीच कौतुक केले गेले आहे आणि आम्ही हे भारतात आणण्यासाठी वचनबद्ध आहोत. भारतातील प्रीमियम आईस्क्रीम बाजारपेठ सातत्याने वाढत आहे. ग्राहकांना आनंददायी आणि अनोखे अनुभव हवे आहेत. २०२५ मध्ये सर्वात मोठ्या असलेल्या – मॅग्नम पिस्तापासून सुरुवात करून या बाजारपेठेत एक रोमांचक श्रेणी आणण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्या उत्पादन श्रेणीच्या विस्तारासह आम्ही शुद्ध आनंदाचे क्षण देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
लोव लिंटासचे कार्यकारी कलात्मक संचालक विशाल बागडे पुढे म्हणाले, “मॅग्नम पिस्ताची जाहिरात तयार करणे ही एक मोठी जबाबदारी होती. ती आम्हाला लोव लिंटासमध्ये पूर्ण करताना खूप आनंद झाला. आमचे उद्दिष्ट गोष्टीद्वारे आलीशानता दाखवणे आणि आनंद निर्माण करणे हे होते. ते करीना कपूर खान आणि बॉब (शशांक चतुर्वेदी) सारखे उद्योगातील दिग्गज सहभागी असल्याने आनंददायी प्रवास ठरले. आम्ही ‘प्लेझर स्टुडिओ’ तयार केला. तो केवळ एक जाहिरात नाही तर आनंदासाठी एक उपदेश आहे.”
अप्रतिम चव आणि रेशमासारख्या क्रिमी चवीमुळे मॅग्नम पिस्ता यंदाचा सर्वात जास्त मागणी असलेला आइस्क्रीमचा आनंद देण्यास सज्ज आहे. प्रत्येक बाइटसोबत लक्झरीचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज व्हा, कारण मॅग्नम म्हणतो त्याप्रमाणे आनंद नसेल तर त्या दिवसाला अर्थ नाही!
मॅग्नमबाबत
मॅग्नम हे एक अद्वितीय आईस्क्रीम असून आनंदी अनुभवांसाठी प्रसिद्ध आहे. कान्समधील आकर्षक आफ्टर-पार्टीजमध्ये सेलिब्रिटींना आकर्षित करणारे कार्यक्रम असोत किंवा जगभरातील प्रतिष्ठितांची भागीदारी असो, मॅग्नम प्रत्येक क्षणाचा आनंद द्विगुणित करण्याचे काम करते. मॅग्नमची प्रत्येक भेट ही एक उत्कृष्ट कलाकृती आहे, कारागिरी आणि सुसंस्कृतपणाचे आकर्षक प्रदर्शन आहे. ते प्रत्येक क्षणाला आनंद आणि स्टाइलच्या अविस्मरणीय उत्सवात रूपांतरित करते. अंतिम आनंदाचे प्रतीक म्हणून मॅग्नम फॅशन आणि लक्झरीच्या जाणकारांसाठी एक आनंददायी अनुभवांचा पाया तयार करते. त्यांना अतुलनीय आनंदाची अनुभूती देते. मॅग्नम आइस्क्रीमचा पहिला बाइट असो किंवा रेंगाळणारी चव असो. हे आइस्क्रीम आनंदाचा शोध घेणाऱ्यांना त्या क्षणाच्या निखळ आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करते.
इन्स्टाग्राम हँडल: @magnum.india


