Wednesday, October 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुनित बालन आणि प्रणव बाकरे यांच्या नेतृत्वाखालील नवीन आयएसआरएल फ्रँचायझीला डुकाटीच्या माध्यमातून...

पुनित बालन आणि प्रणव बाकरे यांच्या नेतृत्वाखालील नवीन आयएसआरएल फ्रँचायझीला डुकाटीच्या माध्यमातून नवी ओळख मिळाली

 

ही टीम इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या (आयएसआरएल) सीझन ३ मध्ये पीबीजी डुकाटी लेगसी रेसिंग म्हणून स्पर्धा करेल.

कालिकत येथे झालेल्या सीझन २ च्या फिनालेमध्ये भारतात प्रदर्शित झालेली डुकाटीची डेस्मो४५० एमएक्स आता प्रदर्शनातून थेट प्रत्यक्ष स्टार्ट गेटवर (ट्रॅकवर) उतरेल, तसेच लवकरच लाँच होणारी नवीन डेस्मो२५० एमएक्स देखील सहभागी होईल.

पुनित बालन यांचा विविध खेळांमधील गुंतवणुकीचा दांडगा अनुभव आणि प्रणव बाकरे यांचे डुकाटी व सुपरबाईक-रेसिंगमधील कौशल्य या फ्रँचायझीच्या नेतृत्वामध्ये एकत्र येत आहेत.

पुणे, २८ ऑक्टोबर २०२६: क्रीडा उद्योजक पुनित बालन यांच्या नेतृत्वाखालील नवीन आयएसआरएल टीम पीबीजी रेसिंगने इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या सीझन ३ साठी डुकाटी आणि मोटरस्पोर्ट तज्ज्ञ प्रणव बाकरे यांच्यासोबत सहयोग करून पीबीजी डुकाटी लेगसी रेसिंगची स्थापना केली आहे. प्रणव बाकरे सह-मालक (को-ओनर) म्हणून सामील झाल्यामुळे या नवीन सहयोगामध्ये पीबीजी रेसिंगचा विविध क्रीडा प्रकारांमधील गुंतवणुकीचा दांडगा अनुभव, बाकरे यांचे सुपरबाईक व परफॉर्मन्स मोटरस्पोर्टमधील सखोल कौशल्य आणि डुकाटीचा जागतिक स्तरावर नावाजलेला रेसिंग वारसा एकत्र आला आहे. आयएसआरएलच्या सीझन २ मध्ये कालिकत येथील फिनालेमध्ये अनावरण झालेली डुकाटीची डेस्मो४५० एमएक्स आणि लवकरच लाँच होणारी नवीन डेस्मो२५० एमएक्स सीझन ३ मध्ये स्टार्ट गेटवर इतर विद्यमान टीम्सना तगडे आव्हान देतील. हे पाऊल डुकाटीच्या भारतातील मोटरस्पोर्ट प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे.

या सहयोगाचे आयएसआरएलच्या ग्रिडवर स्पर्धात्मक स्थान निर्माण करणे, मोटरस्पोर्ट्सच्या जुन्या चाहत्यांशी जोडले जाणे आणि नवीन प्रेक्षकांना सुपरक्रॉसची ओळख करून देणे, हे उद्दिष्ट आहे. मोटोजीपी आणि वर्ल्ड सुपरबाईक स्पर्धेतील दशकांचा अनुभव, तसेच स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण डेस्मोड्रोमिक इंजिनिअरिंगमुळे डुकाटीच्या सहभागाने या फ्रँचायझीला वेगळी रेसिंग ओळख प्राप्त झाली आहे. इतर जागतिक दर्जाच्या ऑटोमोटिव्ह ब्रँड्ससोबत डुकाटीचे आगमन आयएसआरएल सीझन ३ चा टेक्निकल आणि स्पर्धात्मक दर्जा उंचावणार आहे, तसेच रायडर्सना जागतिक दर्जाची मशिनरी उपलब्ध करून देणार आहे.

पुनित बालन ग्रुपचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर आणि पीबीजी डुकाटी लेगसी रेसिंग को-ओनर पुनित बालन म्हणाले, “भारतीय रेसिंगमधील उत्साह, कामगिरी आणि क्रीडाभावना प्रतिबिंबित करणारा संघ उभारण्याच्या उद्देशाने आम्ही आयएसआरएलमध्ये सहभागी झालो आहोत. प्रणव बाकरे यांनी सहमालक म्हणून सहभाग घेतल्याने आणि डुकाटीची साथ मिळाल्याने आम्ही ठेवलेल्या उद्दिष्टाला निश्चितच मोठं बळ मिळणार आहे. स्पर्धात्मक संघ उभारणं, तरुण क्रीडापटूंना पाठबळ देणं आणि चाहत्यांना अभिमान वाटेल अशी संघाची ओळख निर्माण करणं, यावर आमचा भर असेल आणि यामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ.”

डुकाटी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर बिपुल चंद्रा म्हणाले, “आम्ही आयएसआरएलच्या सीझन २ च्या कालिकत येथील फिनालेमध्ये डुकाटीचा ऑफ-रोड प्रोग्राम भारतात सादर केला होता आणि त्याला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व राहिला आहे. १०० वा वर्धापनदिन साजरा करत असताना डुकाटीला आपल्या रेसिंग परंपरेचा, तसेच जागतिक बाजारपेठेतील लाखो व्यक्तींपर्यंत पोहोचलेल्या ऑफ-रोड प्रोग्रामचा अभिमान आहे. आता भारतात आम्हाला आमची क्षमता प्रदर्शित करण्यासाठी आणि स्पर्धात्मक ग्रिडवर आमचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. ओईएम म्हणून डुकाटी इंडिया या सहयोगासाठी आणि सीझन ३ मध्ये देशभरातील रायडर्सच्या नवीन पिढीला प्रेरित करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.”

पीबीजी डुकाटी लेगसी रेसिंगचे को-ओनर प्रणव बाकरे म्हणाले, “प्रत्यक्ष रेस सुरू होण्यापूर्वी, म्हणजे पूर्वतयारी, मशिनरी आणि प्रत्येक रायडरच्या पाठीशी उभे असलेले लोक यांच्या माध्यमातून रेसचे निकाल ठरत असतात. हाच विश्वास पीबीजी डुकाटी लेगसी रेसिंगच्या केंद्रस्थानी आहे. पुनित यांच्याकडे टीम उभारण्याचा आणि खेळांना पाठबळ देण्याचा उत्तम अनुभव आहे, तर अगदी पहिल्या फेरीपासून स्पर्धा करण्यासाठी आणि विजय मिळवण्यासाठी सज्ज असलेली टीम तयार करण्याची आम्हा दोघांची समान जिद्द आहे. या सहयोगामध्ये डुकाटीचा विलक्षण जागतिक मोटरस्पोर्ट वारसा आणि उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्य जोडले गेले आहे आणि आयएसआरएलच्या ग्रिडवर या ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे हा आमच्यासाठी सन्मान आहे.”

आयएसआरएलचे को-फाउंडर आणि डायरेक्टर ईशान लोखंडे म्हणाले, “डुकाटीने आमच्या सीझन २ च्या फिनालेमध्ये भारतात आपला ऑफ-रोड प्रोग्राम प्रदर्शित केला होता आणि वर्षभरात कंपनी आपल्या अधिकृत डीलरशिपच्या माध्यमातून आमच्या ग्रिडवरील टीमला पाठबळ देत आहे. आयएसआरएल क्रीडा आणि उद्योग जगताच्या अनोख्या संगमाचे प्रतिनिधित्व करते, जिथे ऑटोमोटिव्ह क्षेत्र थेट टीम आणि स्पर्धांमध्ये गुंतवणूक करत आहे. आधीच दोन प्रमुख उत्पादक कंपन्यांचे पाठबळ असलेल्या टीम्सनंतर आता डुकाटी ग्रिडमध्ये सहभागी होणारा तिसरा प्रमुख ऑटोमोटिव्ह ब्रँड ठरला आहे. ही वाढती कटिबद्धता पाहून मला मनापासून आनंद होत आहे आणि तितकाच आनंद भारतातील तरुण रायडर्सना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धात्मक मशिनरीवर खेळण्याची संधी मिळत असल्याचा आहे. पीबीजी डुकाटी लेगसी रेसिंग ही सीझन ३ मधील मुख्यत्वे भर आहे आणि आम्ही या सहयोगामधून या क्रीडा प्रकाराला कोणते नवीन आयाम मिळतात, हे पाहण्यासाठी उत्सुक आहोत.”

भारत जगातील सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह बाजारपेठ आणि दुचाकींसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परफॉर्मन्स मोटारसायकलींप्रती आवड सातत्याने वाढत आहे, ऑफ-रोड रेसिंगची लोकप्रियताही वाढत आहे. ब्रँड्स आता भारतातील रायडर्ससाठी ऑफ-रोड बाईक्स लाँच करत आहेत आणि अशा स्वरूपाच्या रेस पार्टनरशिप्सवरून दिसून येते की, गुंतवणूकदारही या खेळाकडे लक्ष देत आहेत. आयएसआरएल टीम्स, ब्रँड्स आणि चाहत्यांना या वाढीचा भाग होण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देते.

को-ओनरशिप संरचनेची निश्चिती आणि नवीन ओळखीसह पीबीजी डुकाटी लेगसी रेसिंग आता आयएसआरएल सीझन ३ च्या पूर्वतयारीवर आपले लक्ष केंद्रित करत आहे. ही टीम चाहत्यांशी दृढ नाते निर्माण करण्यासोबत पुणे आणि संपूर्ण देशभरात सुपरक्रॉसच्या वाढीस हातभार लावण्यासाठी प्रयत्न

शील राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments