Wednesday, October 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedजयपूर वॉच कंपनीचे पुण्यातील दुसरे दालन सीझन्स मॉलमध्ये सुरू

जयपूर वॉच कंपनीचे पुण्यातील दुसरे दालन सीझन्स मॉलमध्ये सुरू

 

 

पुणे, २८ ऑक्टोबर २०२६ : प्रसिद्ध घड्याळ निर्माते गौरव मेहता यांनी स्थापन केलेल्या ‘जयपूर वॉच कंपनी’ने पुण्यातील सीझन्स मॉलमध्ये आपले दुसरे दालन सुरू केले आहे. भारतीय वारसा, पारंपरिक कलाकुसर आणि आधुनिक घड्याळ निर्मितीचा अनोखा संगम असलेल्या या ब्रँडच्या वैशिष्ट्यपूर्ण घड्याळांना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. ‘सी.टी.पंडोल अँड सन्स’ यांच्या सहयोगाने हे नवीन दालन सुरू करण्यात आले असून, घड्याळ विक्री क्षेत्रातील ही जयपूर वॉच कंपनीची पहिली व्यावसायिक भागीदारी आहे.

 

गौरव मेहता यांनी स्थापन केलेली जयपूर वॉच कंपनी ही वैशिष्ट्यपूर्ण आणि उच्च दर्जाच्या घड्याळांची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी एक खास ब्रँड म्हणून ओळखली जाते.

 

या नवीन दालनात कला आणि उत्कृष्ट कारागिरी यांचा संगम असलेल्या घड्याळांचे खास संग्रह उपलब्ध आहेत. प्राचीन नाण्यांचा वापर करून तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घड्याळांपासून ते आधुनिक डिझाइनच्या घड्याळांपर्यंत अनेक पर्याय येथे ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत. भेटवस्तू म्हणून देण्यासाठी एखादे खास घड्याळ असो, वैयक्तिक संग्रहात भर घालण्यासाठी एखादे वेगळे घड्याळ असो किंवा दैनंदिन वापरासाठी आकर्षक आणि आलिशान घड्याळ असो, ग्राहकांच्या विविध आवडीनिवडी लक्षात घेऊन या दालनात घड्याळांची निवड करण्यात आली आहे.

 

जयपूर वॉच कंपनीचे संस्थापक आणि डिझायनर गौरव मेहता यांनी नवीन दालनाच्या उद्घाटनानिमित्त सांगितले, “पुण्यातील ग्राहकांना समृद्ध ऐतिहासिक वारसा, कलात्मकता आणि उत्कृष्ट कारागिरी यांची उत्तम जाण आहे. अशा उत्साही आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरात आमचा विस्तार होत असल्याचा विशेष आनंद आहे. पुण्यातील या दुसऱ्या दालनाच्या माध्यमातून केवळ घड्याळांची विक्री करणे हा आमचा उद्देश नाही, तर घड्याळ निर्मितीची कला आणि पारंपरिक कारागिरी यांचा अनोखा अनुभव ग्राहकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सर्वांचा सुंदर संगम ग्राहकांना एकाच ठिकाणी अनुभवता यावा, ही आमची संकल्पना

आहे.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments