भारत, एप्रिल 2025
उत्पादन क्षमतेचा वेग वाढवत आणि सस्टेनेबल वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत, मॅटरने चांगोदर, अहमदाबाद येथे आपल्या पहिल्या वर्ल्ड -क्लास मॅन्युफॅक्चरिंग हबचे उद्घाटन केले. गुजरातचे माननीय मुख्यमंत्री श्री. भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले असून, भारतात इलेक्ट्रिक वाहतुकीच्या नव्या युगाची सुरूवात झाली आहे.
उत्पादनातील उत्कृष्टता, प्रक्रियेतील वेग आणि नावीन्यतेला चालना देण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आलेले हे हब मॅटर एरा — जगातील पहिली मैन्युफैक्चर्ड गिअर्ड इलेक्ट्रिक बाईकसाठी महत्त्वपूर्ण असून, सस्टेनेबल वाहतुकीच्या भविष्यास नवी दिशा देणार आहे.
2.25 लाख चौरस फुट क्षेत्रफळावर पसरलेले हे हब ‘इंडस्ट्री 4.0’ च्या पुढच्या पिढीतील तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. पॉवरपॅक, पॉवरट्रेन आणि व्हेईकल असेंब्ली लाइनसह टॉर्चर टेस्ट ट्रॅकचा समावेश असून, अचूक व सस्टेनेबल उत्पादनक्षमतेचा दर्जा यामुळे निश्चित केला जाईल. वर्टिकल इंटिग्रेशन आणि लीन मॅन्युफॅक्चरिंगच्या तत्त्वांवर आधारित असलेले हे प्लांट उच्च गुणवत्ता आणि कार्यक्षमतेचा आदर्श ठरेल.
सध्या एका शिफ्टमध्ये २५ वाहनांचे उत्पादन सुरू असून, लवकरच हे हब वार्षिक १,२०,००० युनिट्सच्या क्षमतेपर्यंत वाढवले जाणार मॅटर एरा मे महिन्यापासून उपलब्ध होणार आहे.
या हबमुळे मॅटर इलेक्ट्रिक पॉवरट्रेन आणि बॅटरीतील नाविन्यतेला चालना देऊन उत्पादन क्षमतेत वाढ करेल आणि देशाच्या सस्टेनेबल वाहतूक परिवर्तनास बळकटी देईल. मॅटर मॅन्युफॅक्चरिंग हब ‘विकसित भारत’ च्या दृष्टीकोनाशी सुसंगत असून, पुढच्या पिढीच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्सच्या निर्मितीसाठी आधारस्तंभ ठरणार आहे.
मॅटरच्या सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून त्यांनी गिर वन प्राधिकरणाला एरा बाईक भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वनरक्षक प्रदूषणमुक्त, शांत आणि वन्यजीवांच्या हालचालींना अडथळा न आणणारी गस्त घालू शकतील आणि अधिक कार्यक्षमतेने संवर्धन करू शकतील.
मॅटर मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये उपलब्ध सुविधा:
• बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग – इन-हाऊस प्रक्रिया, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेचा उच्च दर्जा
• बॅटरी टेस्टिंग – थर्मल मॅनेजमेंट, कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष वापरावर आधारित चाचण्या
• पॉवरट्रेन मॅन्युफॅक्चरिंग – उच्च-कार्यक्षम इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचे इन-हाऊस उत्पादन
• पॉवरट्रेन टेस्टिंग – कार्यक्षमता, टिकाऊपणा व सुरक्षा यांसाठी मल्टी-लेव्हल चाचण्या
• व्हेईकल असेंब्ली – पूर्णपणे इंटिग्रेटेड असेंब्ली लाईन
• व्हेईकल टेस्टिंग – परफॉर्मन्स, ड्युरॅबिलिटी आणि रिअल-वर्ल्ड टेस्टिंग ट्रॅक
देशभरात इलेक्ट्रिक वाहने स्विकारली जात असताना मॅटरचे हे हब ‘मेक इन इंडिया’ आणि ‘इनोव्हेट इन इंडिया’ उपक्रमांना पाठबळ देत पुढील तीन वर्षांत सुमारे 2,000 रोजगार निर्माण करणार आहे. ही वचनबद्धता ‘व्हायब्रंट गुजरात २०२२’अंतर्गत घेतलेल्या एमओयूचा भाग आहे.
मॅटरचे फाऊंडर आणि ग्रुप सीईओ मोहल लालभाई म्हणाले, “हा क्षण मॅटरसाठी आणि संपूर्ण ईव्ही इकोसिस्टिमसाठी परिवर्तन घडवणारा आहे. आमचे मॅन्युफॅक्चरिंग हब तंत्रज्ञान व नाविन्यतेच्या जोरावर भारताच्या वाहतूक प्रणालीचे रूपांतर करणार आहे. उत्पादन क्षमतेच्या वाढीसोबतच आम्ही शाश्वततेवरही कायम भर देणार आहोत, जे लोक आणि पर्यावरण दोघांवरही सकारात्मक परिणाम घडवतील.”
मॅटरचे फाऊंडर व ग्रुप सीओओ अरुण प्रताप सिंग म्हणाले, “या हबचे उद्घाटन हे आमच्या निर्णायक नवकल्पनांचा आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचा ठोस पुरावा आहे. भारताच्या कनेक्टेड आणि सस्टेनेबल भविष्याच्या दिशेने ही वाटचाल अधिक वेगाने होईल.”
हे मॅटर मॅन्युफॅक्चरिंग हब ‘इनोव्हेट अँड मेक इन इंडिया’ या वचनबद्धतेचे मूर्त रूप असून, भारताच्या कनेक्टेड व इलेक्ट्रिफाइड भविष्याची दिशा मॅटर निश्चित करीत आहे.
मॅटरबद्दल:
मॅटर मोटर वर्क्स ही २०१९ मध्ये अहमदाबाद येथे स्थापन झालेली इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप असून, ‘इनोव्हेट इन इंडिया’ च्या माध्यमातून वाहतूक क्षेत्राचा कायापालट घडविण्याचा उद्देश घेऊन काम करत आहे. स्वतंत्र ईव्ही इकोसिस्टम उभारण्याच्या दृष्टीने मॅटरने इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या सर्व पैलूंवर अभ्यास करून भारताला सस्टेनेबल भविष्याच्या दिशेने नेत आहे.
त्यांचे प्रमुख उत्पादन ‘एरा’ ही जगातील पहिली मैन्युफैक्चर्ड गिअर्ड इलेक्ट्रिक मोटरबाईक असून, तिला ‘टॉप गियर इंडिया’ ने ‘एडिटर्स चॉईस इलेक्ट्रिक मोटरसायकल ऑफ द इयर’ व ‘अँको ड्राइव्ह’ ने ‘ईव्ही बाइक ऑफ द इयर २०२५’ पुरस्कारांनी गौरवले आहे. याशिवाय आउटलुक बिझनेस स्पॉटलाइट पुरस्कारांत ‘इनोव्हेशन स्टार्टअप ऑफ द इयर’ म्हणूनही सन्मानित करण्यात आले आहे.
600 हून अधिक नाविन्यपूर्ण विचारांनी प्रेरित टीमसह मॅटर प्रदूषणमुक्त वाहतुकीचा पुरवठादार म्हणून आघाडीवर असून, त्यांनी 350 हून अधिक पेटंट अर्ज व 68 मंजूर पेटंट्ससह पॉवरट्रेन, लिक्विड कूलिंग, बॅटरी मॅनेजमेंट, गिअरबॉक्स, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑटोमेशन क्षेत्रात नेतृत्व सिद्ध केले आहे. मॅटर भारताच्या ईव्ही परिवर्तनाचा भाग बनत देशाला ऊर्जा स्वावलंबनाकडे नेत आहे.
रिव्होल्यूशनरी मॅटर एरा:
मॅटर एरा ही एक क्रांतिकारक इलेक्ट्रिक टू-व्हीलर असून तिचे फ्युचरिस्टिक डिझाईन आणि प्रगत वैशिष्ट्ये वाहतूक प्रणालीला नवे परिमाण देतात.
मॅटर एराची मुख्य वैशिष्ट्ये:
• जगातील पहिली मॅन्युफॅक्चर्ड गिअर्ड इलेक्ट्रिक बाइक, ४-स्पीड हायपर-शिफ्ट गिअरबॉक्ससह
• लिक्विड-कूल्ड बॅटरी आणि पॉवरट्रेन – थर्मल मॅनेजमेंटसह कार्यक्षमतेत वाढ
• प्रति चार्ज १७० किमीची सर्टिफाइड रेंज
• कोणत्याही स्टँडर्ड प्लगवर चालणारा ५ अँप ऑनबोर्ड चार्जर
• ७-इंच टचस्क्रीन डिस्प्ले – इंटरनेट-सक्षम, नेव्हिगेशन, कॉल व म्युझिक फंक्शनसह
अधिक माहितीसाठी आणि लाँच
अपडेट्ससाठी भेट द्या: matter.in


