Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोमेश्वरवाडी, पाषाण परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात योग्य कारवाई करणेबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन

सोमेश्वरवाडी, पाषाण परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात योग्य कारवाई करणेबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन

पुणे -सोमेश्वरवाडी, पाषाण परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात योग्य कारवाई करणेबाबत माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी पुण्याचे पोलीस आयुक्तांना एक निवेदन दिले आहे.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे , पुणे शहरातील एक शांत, सुसंस्कृत आणि प्रगत भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाषाण – सोमेश्वरवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी युवकांचे नशा करून दहशत निर्माण करण्याचे, गैरवर्तन करण्याचे प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

 

ही स्थिती केवळ समाजाच्या सुरक्षिततेसाठीच नव्हे, तर परिसरातील लहान मुलं, महिलावर्ग व ज्येष्ठ नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी आहे. पाषाणचा इतिहास हा सुसंस्कृत नागरिकत्वाचा आणि शांततेचा आहे. परंतु सद्यस्थितीत या परिसराच्या प्रतिमेला गालबोट लागण्याची शक्यता दिसत आहे.

 

एक लोकप्रतिनिधी, जागरूक व सुजाण नागरिक म्हणून मी याविषयी चिंता व्यक्त करताना, पुढील उपाययोजना करण्याची विनंती करत आहे :

 

– विशेषतः रात्रीच्या वेळेस संवेदनशील ठिकाणी नियमित गस्त व ठिकाणी वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे आहे.

– परिसरातील सार्वजनिक स्थळे, उद्याने, बसथांबे इत्यादी ठिकाणी अधिक CCTV कॅमेरे बसवून CCTV निगराणी अधिक प्रभावी करावी.

– प्रशासनाच्या सहकार्याने पाषाण परिसराला सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिक नागरिक समितीद्वारे अशा दिशाहीन युवकांची ओळख पटवून त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

 

तरी ही बाब तातडीने लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रशासनिक आणि पोलीस यंत्रणा सक्रिय करण्याची विनंती सदर पत्रासह करीत आहे. त्याचबरोबर पाषाणकरांच्या हितासाठी प्रशासनासह आवश्यक ती जबाबदारी पार पाडण्यासाठीही कटीबद्ध राहील, असे यावेळी आवर्जून आश्वस्त करतो.

 

आपली सकारात्मक कृती आणि तत्पर प्रतिसाद अपेक्षित  आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments