गुरूग्राम, भारत, एप्रिल ३०, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या सॅमसंग ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ उपक्रमाच्या चौथ्या एडिशनचे अनावरण केले. ही देशव्यापी स्पर्धा विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा फायदा घेत समाजातील सर्वात प्रचलित आव्हानांचे निराकरण करण्यासाठी नाविन्यपूर्ण सोल्यूशन निर्माण करण्यास प्रेरित करण्याकरिता डिझाइन करण्यात आली आहे.
सॅमसंग ‘सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५’ चार विजेल्या टीम्सना १ कोटी रूपये अनुदान देईल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रकल्पांच्या इन्क्यूबेशनसाठी मदत होईल, तसेच प्रत्यक्ष प्रोटोटाइप्रिंग, गुंतवणूकदार कनेक्ट्स आणि सॅमसंग लीडर्स व आयआयटी दिल्ली फॅकल्टीकडून तज्ञ मार्गदर्शन मिळेल.
या सन्मानामधून स्पर्धेमध्ये निपुण होण्यासोबत त्यापलीकडे जाणारे सोल्यूशन्स अधिक उत्तम करण्याचे महत्त्व दिसून येते, ज्यामुळे ते स्केलेबल व शाश्वत उद्यमांमध्ये विकसित होतील, जे भारतभरातील समुदायांना आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.
सहा महिने राबवण्यात येणारा हा उपक्रम १४ ते २२ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना वैयक्तिक किंवा ग्रुप म्हणून त्यांच्या टेक संकल्पनांना सबमिट करण्याचे आवाहन करतो. या वर्षी सहभागींना चार प्रमुख थीम्समध्ये सोल्यूशन्स डिझाइन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे: सुरक्षित, स्मार्टर व सर्वसमावेशक भारतासाठी एआय, भारतातील आरोग्य, स्वच्छता व स्वास्थ्याचे भविष्य, शिक्षणासाठी क्रीडा व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक बदल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य व पर्यावरणीय स्थिरता.
“सॉल्व्ह फॉर टूमारोसह आम्ही भारताच्या कानाकोपऱ्यामधील तरूण इनोव्हेटर्सना मोठे स्वप्न पाहण्यास, वास्तविक विश्वातील आव्हानांचे निराकरण करण्यास आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्मार्टर, अधिक सर्वसमावेशक भविष्य घडवण्यास प्रेरित करत आहोत. यंदा, सॉल्व्ह फॉर टूमारो अधिक मोठे आणि अधिक सर्वसमावेशक असणार आहे. आम्ही अधिकाधिक शहरांपर्यंत पोहोचत आहोत, अधिकाधिक शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संलग्न होत आहोत आणि त्यांच्यासाठी इनोव्हेट करण्याकरिता मार्ग निर्माण करत आहोत, तसेच डिझाइन थिंकिंगच्या तत्त्वांचा अवलंब करत आहोत. सॉल्व्ह फॉर टूमारोमधून भारत सरकारच्या अग्रगण्य #DigitalIndia उपक्रमाप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते, जो तरूणांना भावी आर्किटेक्ट्स बनण्यास सक्षम करतो,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क म्हणाले.
“आयआयटी दिल्लीला तरूणांमध्ये नाविन्यता, उद्योजकता आणि वास्तविक विश्वातील समस्या निवारण क्षमतेला चालना देण्याचा आनंद होत आहे. सॉल्व्ह फॉर टूमारोसोबतचा आमचा सहयोग मार्गदर्शन, संशोधन पायाभूत सुविधा व टेक्निकल मार्गदर्शन देतो, ज्यामुळे तरूणांना त्यांच्या संकल्पनांना उत्पादनांमध्ये रूपांतरित करण्यास मदत होते, ज्यांचा समाजावर मोठा प्रभाव पडतो. आम्हाला या उपक्रमाचा भाग असण्याचा आनंद होत आहे, जो सामाजिकदृष्ट्या जागरूक इनोव्हेशनला सक्षम करतो आणि ‘विकसित भारता’प्रती योगदान देतो,” असे आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो. रंगन बॅनर्जी म्हणाले.
“भारतातील तरूण इनोव्हेटर्स २०३० पर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स साध्य करण्यासाठी आणि २०४७ पर्यंत विकसित भारत हा दृष्टिकोन पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशामधील अधिक तरूण विचारवंत सोल्यूशन्स सादर करत असताना भारत संकल्पनांमध्ये अग्रस्थानी असण्यास अद्वितीयरित्या स्थित आहे, जे स्थानिक आव्हानांचे निराकरण करतात आणि जागतिक परिवर्तनाला प्रेरित करतात. सॅमसंगच्या सॉल्व्ह फॉर टूमारो सारखे उपक्रम तरूणांसाठी त्यांच्या संकल्पनांना जागतिक भल्याकरिता सोल्यूशन्समध्ये बदलण्यासाठी, तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक व शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म आहे. भारतातील यूएनला अशा सहयोगांना विशेषत: खाजगी क्षेत्राला पाठिंबा देण्याचा अभिमान वाटतो, जे तरूण नेतृत्व, इनोव्हेशन व कृतीला चालना देते, ज्यामधून कोणीही मागे न राहण्याची खात्री मिळते,” असे भारतातील युनायटेड नेशन्स रेसिडण्ट कोऑर्डिनेटर शॉम्बी शार्प म्हणाले.
“तरूण व्यक्ती आजच्या नितांत जागतिक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५ सारखे उपक्रम त्यांना त्यांच्या संकल्पनांना तंत्रज्ञानाचा वापर करत प्रत्यक्षात आणण्यास सक्षम करतात. आम्हाला आनंद होत की, हे सोल्यूशन्स समुदायांमध्ये वास्तविक परिवर्तनाला चालना देण्यासाठी तरूण-केंद्रित संकल्पनांना वाढवण्यास मदत करत आहेत,” असे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (एमईआयटीवाय) अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग म्हणाले.
सॅमसंग इंडियाच्या फ्लॅगशिप कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमाच्या चौथ्या एडिशनचा हजारो सहभागींना सामावून घेण्याचा, तसेच डिझाइन थिंकिंग, प्रत्यक्ष प्रोटोटाइपिंग, गो-टू-मार्केट स्ट्रॅटेजीज व बिझनेस प्लॅनिंगमध्ये ८२,००० हून अधिक तासांचे व्यापक प्रशिक्षण देण्याचा मनसुबा आहे. अंतिम टप्प्यामध्ये फायनालिस्ट्स म्हणून निवडण्यात येणाऱ्या टीम्सना सॅमसंग, आयआयटी दिल्ली आणि उद्योग व्यावसायिकांकडून देण्यात येणाऱ्या विशेषीकृत प्रशिक्षण व मार्गदर्शनामधून फायदा होईल.
मंगळवारी सर्व भागीदारांच्या उपस्थितीत आयआयटी दिल्ली येथे ‘सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५’चे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या वरिष्ठ संचालक डॉ.सपना पोती, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सायण्टिस्ट सी शार्दुल राव आणि एमईआयटीवाय स्टार्टअप हबचे सीईओ पी. एस. मदनगोपाळ उपस्थित होते.
संकल्पनांपासून प्रभावापर्यंत: प्रोग्रामचे टप्पे
या उपक्रमासाठी अर्ज प्रक्रिया २९ जून ते ३० जून २०२५ पर्यंत सुरू राहिल. या कालावधीदरम्यान सॅमसंग देशभरातील शाळा व कॉलेजमध्ये सर्वोत्तम डिझाइन-थिंकिंग वर्कशॉप्सचे आयोजन करेल, ज्यामुळे सहभागी आवश्यक समस्या निवारण व संकल्पना कौशल्यांसह सक्षम होतील.
सुरूवातीच्या अर्ज टप्प्यानंतर टॉप १०० टीम्सना निवडण्यात येईल, जेथे प्रत्येक थीम्समधून २५ टीम्सना निवडण्यात येईल. या टप्प्यामध्ये सहभागी थीमॅटिक तज्ञांच्या नेतृत्वांतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण घेतील, ज्यानंतर व्हिडिओ पिच राऊंडचे आयोजन करण्यात येईल, जेथे प्रत्येक थीममधून १० टीम्स अशा ४० टीम्सना शॉर्टलिस्ट करण्यात येईल.
प्रत्येक टीममधील टॉप १० सेमी-फायनालिस्ट टीम्स सॅमसंगचे उद्योग दिग्गज व विषयांमधील तज्ञांद्वारे मार्गदश्रन केलेल्या व्यापक मेन्टोरशीप प्रोग्रामकडे वाटचाल करतील. या टीम्स सॅमसंगच्या अत्याधुनिक केंद्रांना क्यूरेटेड लर्निंग भेटींमध्ये देखील सहभाग घेतील, जसे बेंगळुरू, नोएडा व दिल्लीमधील सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट इंडिया, तसेच सॅमसंग डिझाइन दिल्ली, ज्यामुळे त्यांना जागतिक दर्जाच्या इनोव्हेशन इकोसिस्टम्सचे प्रत्यक्ष एक्स्पोजर मिळेल.
‘सॉल्व्ह फॉर टूमारो’च्या माजी विद्यार्थ्यांसोबत सहयोगाने दिल्लीच्या अत्याधुनिक लॅब्समध्ये प्रायोगिक, प्रत्यक्ष प्रोटोटाइपिंग प्रोग्राममध्ये या टप्प्याची सांगता होईल. रेसिडेन्शियल बूटकॅम्प देखील असेल, जेथे संकल्पनांना निपुण करण्यावर आणि फायनल पिचसाठी तयारी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. या टप्प्यानंतर टॉप २० टीम्सची निवड करण्यात येईल, प्रत्येक टीममधील पाच टीम्स ग्रँड फिनालेकडे वाटचाल करतील. प्रत्येक थीममधील या टॉप पाच टीम्सना सॅमसंग तज्ञांकडून विशेष वन-ऑन-वन मेन्टोरिंग सत्रांमध्ये मार्गदर्शन मिळेल. ते प्रोटोटाइप्रिंग डे, पिच प्रेझेन्टेशन, इन्व्हेस्टर मीट आणि अवॉर्ड्स सेरेमनीमध्ये सहभाग घेतील, जे सर्व स्पर्धेच्या शेवटच्या तीन दिवशी आयोजित करण्यात येईल.
सहभागींसाठी या स्पर्धेमध्ये काय आहे
टॉप १०० टीम्सना उपलब्धी प्रमाणपत्र देण्यात येतील. टॉप ४० टीम्सना ८ लाख रूपये व प्रत्येक सदस्याला नवीन सॅमसंग लॅपटॉप मिळेल. टॉप २० टीम्सना २० लाख रूपये व प्रत्येक सदस्याला नवीन सॅमसंग झेड फ्लिप स्मार्टफोन मिळेल.
याव्यतिरिक्त, विशेष पुरस्कार देखील आहेत, जसे गुडविल अवॉर्ड, यंग इनोव्हेटर अवॉर्ड आणि सोशल मीडिया चॅम्पियन यांसह एकूण बक्षीसाची रक्कम ४.५ लाख रूपये आहे.
चार विजेत्या टीम्सना आयआयटी दिल्ली येथे इन्क्यूबेशनसाठी एकत्रित १ कोटी रूपयांचे अनुदान मिळेल, जेथे त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी शाश्वत संसाधने देण्यात येतील. या फंडिंगचा त्यांच्या संकल्पनांना प्रत्यक्षात आणण्याचा मनसुबा आहे.
२०१० मध्ये प्रथम यूएसमध्ये लाँच करण्यात आलेला उपक्रम सॉल्व्ह फॉर टूमारो सध्या जगभरातील ६८ देशांमध्ये कार्यरत आहे आणि जगभरातील ३ दशलक्षहून अधिक तरूणांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा जागतिक सीएसआर दृष्टिकोन ‘टूगेदर फॉर टूमारो! अनेबलिंग पीपल’ जगभरातील तरूणांना शिक्षण प्रदान करण्यासोबत भावी लीडर्स बनण्यास सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या सीएसआर प्रयत्नांबाबतच्या अधिक गाथा आमचे सीएसआर पेज https://csr.samsung.com/en-in/localMain.do यावर वाचा.
सॅमसंग न्यूजरूम इंडिया लिंक: Igniting Gen Z Innovation: Samsung India Launches ‘Solve for Tomorrow 2025’ Competition with Over INR 1 Crore In Grants – Samsung Newsroom India


