Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedसेराटेक ग्रुपच्या 'वेस्टविंड्स' निवासी प्रकल्पातील टॉवर सी चे उद्घाटन

सेराटेक ग्रुपच्या ‘वेस्टविंड्स’ निवासी प्रकल्पातील टॉवर सी चे उद्घाटन

 

पुणे,९ सप्टेंबर २०२६ : पुण्यातील आघाडीचे प्रीमियम रिअल इस्टेट डेव्हलपर असलेल्या ‘सेराटेक ग्रुप’ने हिंजवडीतील मान रोडवर असलेल्या ‘सेराटेक वेस्टविंड्स’मध्ये ‘टॉवर सी’च्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. पुण्यातील एका प्रस्थापित आयटी आणि रोजगार क्षेत्रात आपल्या या प्रकल्पांच्या माध्यमातून सेराटेक आपला विस्तार करत आहे. ३ सप्टेंबर २०२६ रोजी या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन यशस्वीरित्या पार पडले; आता बुकिंग अधिकृतपणे सुरू झाले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 

‘टॉवर ए’ आणि ‘बी’ ची संपूर्ण विक्री यशस्वीरित्या झाल्यानंतर हा नवीन टॉवर ‘सी’ विक्रीसाठी सुरू करण्यात आला आहे. लाँचच्या कार्यक्रमादरम्यान २५० हून अधिक चॅनेल पार्टनर्सनी प्रकल्पाला भेट दिली, ज्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील या प्रकल्पाविषयीची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावरून हिंजवडी-मान रोड परिसरातील सु-नियोजित निवासी प्रकल्पांची मागणी कायम असल्याचे दिसून येते.

 

‘सेराटेक वेस्टविंड्स’मध्ये विचारपूर्वक डिझाइन केलेली, हवेशीर २, ३, ३.५ आणि ४.५ बीएचके घरे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये सिप्लेक्स आणि डुप्लेक्स अशा दोन्ही प्रकारच्या पर्यायांचा समावेश आहे. नव्याने सादर करण्यात आलेल्या ‘टॉवर सी’चे नियोजन जागेचा कार्यक्षम वापर, उपयुक्त लेआउट्स, नैसर्गिक हवा-प्रकाश आणि आधुनिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन करण्यात आले आहे.

 

या प्रकल्पाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘झिरो-वेस्टेड-एरिया’ (जागेचा अपव्यय टाळणारे) नियोजन आणि कार्पेट एरियाचा कार्यक्षम वापर; यामुळे रहिवाशांना उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त आणि उपयुक्त वापर करता येतो. आधुनिक कुटुंबांच्या बदलत्या गरजा पूर्ण करतील अशा प्रकारे या घरांची रचना करण्यात आली आहे, ज्यात हवेशीर अंतर्गत भाग आणि विचारपूर्वक नियोजित लिव्हिंग स्पेसचा समावेश आहे.

 

प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले असून, रेरा नियमांनुसार ताबा फेब्रुवारी २०२९ मध्ये मिळणे अपेक्षित आहे. यामुळे घर खरेदीदारांना प्रकल्पाच्या विकासाच्या कालखंडाबाबत स्पष्टता मिळते. मान मेट्रो स्टेशनपासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर आणि हिंजवडीतील मान रोडवर मोक्याच्या ठिकाणी हा प्रकल्प वसलेला आहे. हा प्रकल्प वेगाने विकसित होणाऱ्या रोजगार आणि निवासी परिसंस्थेचा भाग असून, येथून पुण्यातील प्रमुख आयटी आणि कॉर्पोरेट हब्सपर्यंत सहज पोहोचता येते. सुधारित कनेक्टिव्हिटी आणि विस्तारणाऱ्या सामाजिक सुविधांमुळे हिंजवडीचा संपूर्ण परिसर एक महत्त्वाचे तंत्रज्ञान आणि रोजगार केंद्र म्हणून विकसित होत आहे.

 

या शुभारंभावर भाष्य करताना, सेराटेक ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक, आनंद अग्रवाल म्हणाले, “ टॉवर ए आणि बी ला मिळालेल्या यशस्वी प्रतिसादामुळे आजच्या पुण्यातील घरखरेदीदारांच्या अपेक्षा आम्हाला अधिक स्पष्टपणे समजल्या आहेत. जागेचा कार्यक्षम वापर, दर्जेदार बांधकाम, उत्तम संपर्क व्यवस्था आणि दीर्घकाळ आरामदायी जीवनशैलीला पूरक असलेली घरे यांना ग्राहक प्राधान्य देत आहेत. टॉवर ‘सी’ ’च्या माध्यमातून आम्ही विविध पर्याय उपलब्ध करून दिले असून, जागेचा शून्य अपव्यय आणि उपयुक्त रचना यावर आमचा भर कायम आहे. लोकार्पणाला विक्री भागीदारांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नोंदणीला मिळणारा प्रतिसाद हिंजवडीचा महत्त्वाचा निवासी आणि रोजगार केंद्र म्हणून होत असलेल्या विकासावरील आमचा विश्वास अधिक दृढ करतो. ”

 

टॉवर सी च्या शुभारंभासह, सेराटेक ग्रुप अशा निवासी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून पश्चिम पुण्यातील आपले अस्तित्व अधिक मजबूत करत आहे, जे उत्तम स्थान, कार्यक्षम नियोजन, दर्जेदार बांधकाम आणि ग्राहक-केंद्रित डिझाइन यांचा मिलाफ

साधतात.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments