Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedएफवाय-२५’च्या चौथ्या तिमाहीचे एकत्रित आर्थिक निकाल · ...

एफवाय-२५’च्या चौथ्या तिमाहीचे एकत्रित आर्थिक निकाल · ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने ‘एफवाय-२०२५’मध्ये कंपनीच्या इतिहासातील सर्वोच्च बुकिंग, वसुली, ऑपरेटींग रोख प्रवाह, नफा आणि प्रकल्पांची पूर्तता या गोष्टी साधल्या आहेत.

जीपीएल’ची सर्वोत्कृष्ट तिमाही व वार्षिक बुकिंग — आर्थिक वर्ष २०२४-२५च्या चौथ्या तिमाहीमध्ये (क्यू-४ एफवाय-२५) बुकिंगचे मूल्य तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ८७ टक्क्यांनी व मागील वर्षीच्या याच चौथ्या तिमाहीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी वाढून १०,१६३ कोटी रुपयांवर पोहोचले. एकूण ‘एफवाय-२५’मध्ये हे मूल्य मागील वर्षाच्या तुलनेत ३१ टक्के वाढून २९,४४४ कोटी रुपये झाले.

· ‘एफवाय-२५’मध्ये आतापर्यंतचा सर्वोच्च, १,४०० कोटी रुपयांचा वार्षिक निव्वळ नफा कंपनीने कमावला. त्यात वार्षिक ९३ टक्के वाढ झाली आहे.

· इतिहासातील सर्वोच्च तिमाही व वार्षिक वसुली — ‘क्यू-४ एफवाय-२५’मध्ये तिमाहीत १२७ टक्के व वार्षिक ४८ टक्के वसुली वाढली आणि ६,९६१ कोटी रुपये झाली. संपूर्ण ‘एफवाय-२५’मध्ये वसुलीत ४९ टक्के वाढ होऊन ती १७,०४७ कोटी झाली.

· तिमाही व वार्षिक पातळीवर कंपनीने चालू व्यवहारांतील रोख प्रवाह ऐतिहासिक सर्वोच्च स्तरावर मिळवला आहे. ‘एफवाय-२५’मध्ये हा प्रवाह चौथ्या तिमाहीत मागील तिमाहीपेक्षा ५५९ टक्के व मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीपेक्षा ५५ टक्के वाढून ४,०४७ कोटी रुपये झाला. ‘एफवाय-२५’मध्ये तो मागील संपूर्ण वर्षाच्या तुलनेत ७३ टक्के वाढ होऊन ७,४८४ कोटी रुपये झाला.

· ‘एफवाय-२५’मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक प्रकल्प पूर्तता झाली. सुमारे १.८४ कोटी चौरस फूट क्षेत्रफळाचे प्रकल्प ५ शहरांमध्ये पूर्ण झाले. त्यातून वार्षिक ४७ टक्के वाढ नोंदली गेली.

· व्यवसाय विकासासाठी मजबूत वर्ष — एकूण अंदाजे १.९ कोटी चौरस फूट क्षेत्रफळ असलेले १४ नवीन प्रकल्प या वर्षभरात जोडले गेले. त्यांची एकूण संभाव्य बुकिंग किंमत सुमारे २६,४५० कोटी रुपये आहे.

· कंपनीची कामगिरी प्रकल्प सादरीकरणापूर्वीच्या मार्गदर्शनापेक्षा २२ टक्के अधिक चांगली झाली, तसेच, बुकिंग मार्गदर्शनापेक्षा ९ टक्के, वसुली मार्गदर्शनापेक्षा १४ टक्के, प्रकल्प पूर्तता मार्गदर्शनापेक्षा २३ टक्के आणि व्यवसाय विकास मार्गदर्शनापेक्षा ३२ टक्के अधिक चांगली झाली.

मुंबई, २ मे २०२५ : गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) या देशभर कार्यरत आघाडीच्या रिअल इस्टेट विकसक कंपनीने दि. ३१ मार्च २०२५ रोजी समाप्त झालेल्या चौथ्या तिमाहीसह संपूर्ण वित्तीय वर्षाचे आर्थिक निकाल जाहीर केले.

कॉर्पोरेट ठळक बाबी :

आणखी एक विक्रमी वर्ष – वित्तीय वर्ष २०२५ (एफवाय२०२५)

· ‘गोदरेज प्रॉपर्टीज’च्या बुकिंगमध्ये तिमाहीत व वर्षभरात सर्वाधिक चांगली कामगिरी

o आत्तापर्यंत कोणत्याही भारतीय रिअल इस्टेट विकसकाने एका आर्थिक वर्षात मिळवले नसेल, इतके बुकिंग व जागांची विक्री. ‘एफवाय-२५’मध्ये बुकिंगचे मूल्य वार्षिक ३१ टक्क्यांनी वाढून २९,४४४ कोटी झाले. यामध्ये एकूण २५.७३ दशलक्ष (२.५७ कोटी) चौरस फूट क्षेत्रफळाच्या १५,३०२ घरांची विक्री झाली. बुकिंगच्या प्रमाणात २९ टक्के वार्षिक वाढ.

o २०२०च्या आर्थिक वर्षापासून आजवर कोणत्याही रिअल इस्टेट विकसकाने केली नसेल अशी सर्वाधिक एकत्रित बुकिंग मूल्य मिळविण्याची कामगिरी ‘जीपीएल’ने केली आहे. एकूण ८४,७०४ कोटी रुपयांचे बुकिंग मूल्य तिने गाठले असून ‘एफवाय-२३’पासून ६४,२०३ कोटी रुपयांची विक्री केली आहे.

o ‘एफवाय-२५’साठी वार्षिक बुकिंग मार्गदर्शनाच्या १०९ टक्के इतकी कामगिरी ‘जीपीएल’ने साधली आहे.

o गोदरेज प्रॉपर्टीज ही एकमेव आघाडीची रिअल इस्टेट कंपनी आहे, जिने सलग ८ वित्तीय वर्षांमध्ये बुकिंग मूल्यवाढ नोंदवली आहे.

o उद्योगात सर्वाधिक विविध व समतोल विक्री — सर्वात मोठ्या मार्केटमधून फक्त ३६ टक्के बुकिंग, होम मार्केटमधून २७ टक्के बुकिंग आणि सर्वात मोठ्या एकल प्रकल्पातून १३ टक्के बुकिंग.

o ‘एफवाय-२५’मध्ये एनसीआर, एमएमआर आणि बंगळुरू या बाजारांनी अनुक्रमे १०,५२३ कोटी, ८,०३४ कोटी आणि ५,०८९ कोटी रुपयांचे योगदान दिले.

o ‘एफवाय-२५’मध्ये ६ शहरांतील १२ प्रकल्पांनी प्रत्येकी १,००० कोटींपेक्षा अधिक बुकिंग मूल्य गाठले.

o वित्तीय वर्षभरात ७ शहरांमध्ये एकूण ३४ नवीन प्रकल्प व टप्पे सुरू करण्यात आले.

o बुकिंग मूल्य तिमाहीत ८७ टक्के आणि वर्षभरात ७ टक्क्यांनी वाढून १०,१६३ कोटी रुपये झाले. यामध्ये एकूण ७.५२ दशलक्ष (७५.२ लाख) चौरस फूट क्षेत्रफळाच्या ३,७०३ घरांची विक्री झाली. ही ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने गाठलेले आत्तापर्यंतचे सर्वात मोठे तिमाही बुकिंग आहे.

o ही ‘जीपीएल’ची पहिली तिमाही आहे, ज्यात १०,००० कोटींचे बुकिंग मूल्य ओलांडले गेले. सलग सातव्या तिमाहीत ५,००० कोटींच्या पुढील बुकिंग मूल्याची कामगिरी जीपीएलने केली आहे.

§ या तिमाहीतील बुकिंग मूल्यात नव्याने सुरू झालेल्या काही प्रमुख प्रकल्पांमधून मोठी मागणी दिसून आली. यांत गोदरेज रिव्हरीन (नोएडा) – २,२०६ कोटी, गोदरेज अ‍ॅस्ट्रा (गुरुग्राम) – १,३२३ कोटी आणि गोदरेज मॅडिसन अव्हेन्यू (हैदराबादमधील जीपीएलचा पहिला प्रकल्प) – १,०८१ कोटी यांचा समावेश आहे.

o चौथ्या तिमाहीत ५ शहरांमध्ये १२ नवीन प्रकल्प व टप्पे सुरू करण्यात आले.

• इतिहासातील सर्वोच्च तिमाही व वार्षिक वसुली आणि चालू व्यवहारांतील रोख प्रवाह (ओसीएफ) :

o भारतातील इतर कोणत्याही रिअल इस्टेट विकसकाने केली नसेल, अशी सर्वोच्च तिमाही व वार्षिक निवासी घरांची विक्री वसुली ‘जीपीएल’ने केली आहे. ‘एफवाय-२५’च्या चौथ्या तिमाहीत ही वसुली ६,९६१ कोटींवर पोहोचली. त्यांत वार्षिक ४८ टक्के आणि तिमाही १२७ टक्के वाढ झाली. ‘एफवाय-२५’मध्ये एकूण वसुली १७,०४७ कोटी रुपये झाली. त्यात वार्षिक ४९ टक्के वाढ पाहावयास मिळाली.

o ‘जीपीएल’ने ‘एफवाय-२५’मध्ये वसुलीच्या वार्षिक मार्गदर्शनाच्या ११४ टक्के इतकी कामगिरी केली आहे.

o भारतातील इतर कोणत्याही रिअल इस्टेट विकसकाने केली नसेल, अशी सर्वोच्च तिमाही व वार्षिक चालू व्यवरारांतील रोख प्रवाह (ओसीएफ) ‘जीपीएल’ने गाठला आहे. ‘एफवाय-२५च्या’ चौथ्या तिमाहीत ओसीएफ ४,०४७ कोटी गाठला. म्हणजे, तिमाहीत ५५९ टक्के व वार्षिक ५५ टक्के वाढ ‘जीपीएल’ने साध्य केली. ‘एफवाय-२५’मध्ये एकूण ओसीएफ ७,४८४ कोटी इतका होता. त्यात वार्षिक ७३ टक्के वाढ साधली गेली.

व्यवसाय विकासासाठी आणखी एक मजबूत वर्ष :

o ‘एफवाय-२५’मध्ये ‘जीपीएल’ने एकूण अंदाजे १.९ कोटी चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्रफळ असलेले १४ नवीन प्रकल्प उभारले. त्यांची एकूण संभाव्य बुकिंग किंमत सुमारे २६,४५० कोटी रुपये आहे.

o यामध्ये ‘एफवाय-२५’च्या चौथ्या तिमाहीत उभारलेले ३,००० कोटी बुकिंग किमतीचे २ नवीन प्रकल्पही समाविष्ट आहेत.

o ‘जीपीएल’ने ‘एफवाय-२५’मध्ये व्यवसाय विकासाच्या वार्षिक मार्गदर्शनाच्या १३२ टक्के कामगिरी केली आहे.

‘एफवाय-२५’मध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक प्रकल्प पूर्तता :

· ‘एफवाय-२५’मध्ये ‘जीपीएल’ने ५ शहरांमध्ये एकूण १.८४ कोटी चौरस फूट प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांत वार्षिक ४७ टक्के वाढ नोंदवली गेली.

· यामध्ये ‘एफवाय-२५’च्या चौथ्या तिमाहीतील ६.५ दशलक्ष (६५ लाख) चौरस फूट प्रकल्पांचा समावेश आहे. त्यांत वार्षिक ८ टक्के व तिमाही १५० टक्के वाढ झाली.

· ‘एफवाय-२५’साठी प्रकल्प पूर्ततेच्या वार्षिक मार्गदर्शनाच्या १२३ टक्के कामगिरी जीपीएलने साधली आहे.

इतर ठळक बाबी :

· डिसेंबर २०२४मध्ये भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात मोठ्या ‘क्यूआयपी’च्या (क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट) माध्यमातून ‘जीपीएल’ने वाढीच्या भांडवलासाठी ६,००० कोटी रुपये उभारले.

· ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ला ‘एस अॅंड पी ग्लोबल’च्या ‘२०२५ सस्टेनेबिलिटी इयरबुक’मध्ये स्थान देण्यात आले असून, जगभरातील रिअल इस्टेट व्यवस्थापन आणि विकास क्षेत्रातील सर्वोच्च १० टक्के कंपन्यांमध्ये तिचा समावेश झाला आहे. तिला ‘इंडस्ट्री मूव्हर’ म्हणूनही गौरवण्यात आले आहे. जीपीएल सलग दुसऱ्या वर्षी ‘डाऊ जोन्स बेस्ट इन क्लास इंडेक्स’च्या उदयोन्मुख बाजार निर्देशांकात सामील झाली आहे.

· ‘गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड’चे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांना ‘ईवाय उद्योजक पुरस्कार २०२४’ (ऊर्जा, रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर विभागात) बहाल करण्यात आला आहे.

· ‘एफवाय-२५’च्या चौथ्या तिमाहीत ‘जीपीएल’ने एकूण ३२ पुरस्कार प्राप्त केले, तर संपूर्ण ‘एफवाय-२५’मध्ये एकूण ११७ पुरस्कार मिळवले.

· डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या दरम्यान प्रमोटर्सनी खुल्या बाजार व्यवहाराद्वारे सरासरी २,०५० रुपये किंमतीने ५,६३,९४२ शेअर्स खरेदी करून एकूण ११६ कोटींची गुंतवणूक करत जीपीएलमधील आपला हिस्सा वाढवला.

‘एफवाय-२०२५’च्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीवर भाष्य करताना ‘गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड’चे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले, “गोदरेज प्रॉपर्टीजने ‘एफवाय-२०२५’मध्ये बुकिंग, वसुली, चालू व्यवहारांतील रोख प्रवाह, नफा आणि प्रकल्प पूर्तता या सर्वच बाबतीत आत्तापर्यंतची सर्वोच्च विक्रमी कामगिरी केली आहे. व्यवसाय विकासाच्या दृष्टीनेही हे वर्ष अत्यंत मजबूत ठरले आहे. सलग आठव्या वर्षी बुकिंग मूल्यवाढ साधल्यामुळे कंपनीची विविध मोठ्या आर्थिक चक्रांमधूनही टिकून राहण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. गेल्या तीन वर्षांत आमच्या विक्री बुकिंगमध्ये सरासरी ५५ टक्के वार्षिक वाढ झाली. यातून ‘जीपीएल’ने आपल्या व्यवसायाच्या कार्यव्याप्तीला पूर्णपणे नव्याने परिभाषित केले आहे. भारतातील बुकिंग मूल्याच्या आधारे सर्वात मोठी रिअल इस्टेट विकसक कंपनी हा गौरव ‘जीपीएल’ने सलग दुसऱ्या वर्षी मिळवला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतातील निवासी रिअल इस्टेट क्षेत्र मजबूत राहिले आहे आणि आम्हाला वाटते की हे सकारात्मक प्रवाह पुढील काही वर्षेही सुरू राहतील. ‘एफवाय-२५’मध्ये आम्ही २६,४५० कोटी रुपयांच्या संभाव्य बुकिंग मूल्यासह जे नवीन प्रकल्प व्यवसायात आणले आहेत, ते आगामी काळात आमच्या कामगिरीत आणखी चांगली भर घालतील. यासोबतच, डिसेंबर २०२४मध्ये ‘क्यूआयपी’च्या माध्यमातून उभारलेले ६,००० कोटी रुपयांचे इक्विटी भांडवल आणि ‘एफवाय-२५’मध्ये मिळवलेला ७,४८४ कोटींचा विक्रमी चालू व्यवहारांचा रोख प्रवाह आम्हाला भविष्यातील वाढीमध्ये सातत्य राखण्यासाठी मदत करेल. ‘एफवाय-२६’मध्ये आमचा उद्देश ३२,५०० कोटींपेक्षा अधिक निवासी बुकिंग साधण्याचा आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन आकर्षक प्रकल्पांचे सादरीकरण आणि स्थिर विक्री यांचा समावेश असेल. यासोबतच, बांधकामातील प्रगतीमुळे रोख प्रवाहातही झपाट्याने वाढ होईल. आमच्याकडे येऊ घातलेले प्रकल्प, मजबूत आर्थिक स्थिती आणि अनुकूल क्षेत्रीय वातावरण पाहता, ‘एफवाय-२६’मध्येही आम्ही घोडदौड सुरू ठेवू, असा पूर्ण आत्मविश्वास आहे.”

आर्थिक आढावा (एकत्रित स्वरूपात)

‘क्यू-४ एफवाय-२५’च्या कामगिरीचा ‘क्यू-४ एफवाय-२४’शी तुलनात्मक आढावा :

एकूण उत्पन्नात ३६ टक्के वाढ होऊन ते २,६४६ कोटी झाले. ‘क्यू-४ एफवाय-२४’मध्ये ते १,९५२ कोटी रुपये होते.
‘एबिटा’मध्ये २ टक्के घट झाली असून तो ६३४ कोटी झाला. ‘क्यू-४ एफवाय-२४’मध्ये तो ६४९ कोटी रुपये होता.
निव्वळ नफा १९ टक्क्यांनी घटून ३८२ कोटी रुपये झाला. या तुलनेत, ‘क्यू-४ एफवाय-२४’मध्ये तो ४७१ कोटी होता.
प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस) १२.६८ इतके झाले. ‘क्यू-४ एफवाय-२४’मध्ये ते १६.९५ होते.
टीप: ईपीएस वार्षिक गणना नसलेला आहे.
‘एफवाय-२५’च्या संपूर्ण वर्षाच्या कामगिरीचा ‘एफवाय-२४’शी तुलनात्मक आढावा :

एकूण उत्पन्नात ५७ टक्के वाढ होऊन ते ६,८४८ कोटी झाले. ‘एफवाय-२४’मध्ये ते ४,३६२ कोटी रुपये होते.
‘एबिटा’मध्ये ६५ टक्के वाढ होऊन तो १,९७० कोटी रुपये झाला. तुलनेत तो ‘एफवाय-२४’मध्ये १,१९७ कोटी होता.
निव्वळ नफ्यात ९३ टक्के वाढ होऊन तो १,४०० कोटी झाला. ‘एफवाय-२४’मध्ये तो ७२५ कोटी होता.
प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस) ४९.०२ झाले. ‘एफवाय-२४’मध्ये ते २६.०९ इतके होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments