🚩
▪️नाशिक दि. ११ मे २०२५ -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचा ‘कार्यकर्ता विकास वर्ग– प्रथम’ (सामान्य) 18 ते 40 वर्ष या वयोगटातील तरुण स्वयंसेवकांचा प्रशिक्षण वर्ग 11 मे पासून सुरू झाला.
▪️येत्या 1 जून पर्यंत चालणाऱ्या या वर्गात महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यातून म्हणजे संघ रचनेतील विदर्भ, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गुजरात आणि सौराष्ट्र अशा सहा प्रांतातील 280 स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत. यात शेतकरी, लघुउद्योजक, डॉक्टर्स, वकिल, व्यापारी, शिक्षक आदिंसह उच्च महविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
▪️नाशिक येथील भोसला सैनिकी विद्यालयाच्या परिसरात या वर्गाचे उद्घाटन रा.स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते भारतमाता पूजनाने झाले. या प्रसंगी वर्गाचे सर्वाधिकारी विष्णु वझे, कार्यवाह जयदीप धर्माधिकारी उपस्थित होते.
चौधरी यांनी संघाच्या शताब्दी वर्षादरम्यान हा वर्ग होत आहे. त्यामुळे आपले कार्य अधिक गतीने पुढे जावे, त्यासाठी येणारे विविध संघटनात्मक व समाजाभिमुख कार्यक्रम हे अधिक उत्साहाने आणि भारतमातेच्या परमवैभवाकडे जाण्यासाठी या प्रशिक्षणात आपण सहभागी व्हावे असे शिक्षार्थींचे भावजागरण केले. ▪️या वर्गात सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी, अ.भा. कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियमित प्रशिक्षणाचा भाग असलेले असे संघ शिक्षा वर्ग मे महिन्यात भारतभर सर्वत्र होत असतात. यात सहभागी होणारे स्वयंसेवक त्यांच्या त्यांच्या गावी संघ काम विस्तारावे म्हणून विविध दायित्व घेऊन कार्य करत असतात.
रा.स्व.संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाचा नाशिक येथे शुभारंभ 🚩
RELATED ARTICLES


