सुपरफॉर्म केमिस्ट्रीज लिमिटेड, जी पूर्वी युपीएल स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड म्हणून ओळखली जात असे, ही नेक्स्ट जनरेशन स्पेशालिटी रासायनिक कंपनी आहे जी नावीन्यता, शाश्वतता आणि उच्च-कार्यक्षमता उपायांच्या आधारस्तंभांवर उभी राहिली आहे. आता पूर्णपणे स्वतंत्र कंपनी म्हणून कार्यरत असलेली सुपरफॉर्म जगातील काही सर्वात गतिमान आणि वैविध्यपूर्ण क्षेत्रांना सेवा देते, ज्यात शेती, ल्युब्रिकंट (स्नेहक), ज्वालारोधक, खाणकाम, आरोग्यसेवा, खाद्यपदार्थ आणि पेये यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे. सुपरफॉर्म ही यूपीएल लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
रासायनिक उद्योगात भारत एक प्रमुख जागतिक खेळाडू बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. 2040 पर्यंत, भारतीय रासायनिक बाजारपेठ $850-$1,000 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये रसायनशास्त्राशी संबंधित विशेष विभागाचा जागतिक बाजारपेठेत 10–12% वाटा असण्याची शक्यता आहे. देशांतर्गत वापर वाढवून हे परिवर्तन जागतिक पुरवठा साखळीत बदल करण्यासोबतच ग्राहकांची पसंती देखील बदलेल. ज्यामुळे पारंपरिक उत्पादन केंद्रांसोबतच विविधतेला प्रोत्साहन मिळेल. जागतिक रसायनशास्त्र बाजारपेठेतील भारताचा वाटा 2040 पर्यंत तिप्पट होण्याची अपेक्षा आहे, 2027 ते 2040 दरम्यान वार्षिक 7–10% वाढ अपेक्षित आहे.
शक्तिशाली आणि जबाबदार उपायांच्या साहाय्याने या परिवर्तनाला पाठबळ तसेच गती देण्यासाठी सुपरफॉर्म धोरणात्मकदृष्ट्या स्थित आहे. सुपरफॉर्मचे खरे सामर्थ्य तिच्या उत्पादन क्षमतेत आहे. परंतु क्लिष्ट, गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रियांमध्ये काम करण्याची, या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याची तसेच ग्राहक, भागीदार आणि जगावर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अद्भुत प्रभाव पाडण्याची क्षमता त्याला इतरांपासून वेगळे करते.
मजबूत जागतिक सोर्सिंग नेटवर्क आणि उद्योग-अग्रणी ESG कामगिरीच्या पाठबळाच्या जोरावर, सुपरफॉर्मकडे प्रतिक्रिया क्षमतांचा एक विस्तृत पोर्टफोलिओ आहे आणि त्यापैकी बरेच मागणी बर हुकूम तयार केले जाऊ शकतात. ग्रीन केमिस्ट्री आणि शाश्वत उपायांच्या वाढत्या जागतिक मागणीशी कंपनी जुळवून घेत आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिची प्रासंगिकता मजबूत होते.
सीईओ श्री. राज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आणि 3,500 हून अधिक व्यावसायिकांच्या टीमच्या पाठबळाच्या आधारावर अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी सुपरफॉर्म स्केल आणि व्हिजनची सांगड घालते. “तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि नवोपक्रमासाठी आदर्श बनणे” या यूपीएल ग्रुपच्या व्यापक व्हिजनशी हे जोडलेले आहे. ज्यामुळे जागतिक स्पेशॅलिटी केमिस्ट्रीज उद्योगाच्या पुढील अध्यायाला आकार देण्यासाठी सुपरफॉर्म एक महत्त्वाची शक्ती ठरते.
संदर्भ:
1. https://www.mckinsey.com/industries/chemicals/our-insights/india-the-next-chemicals-manufacturing-hub
2. एमओसीपीसी 2021 अहवाल: “केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स स्टॅटिस्टिक्स अॅट अ ग्लान्स”, इन्व्हेस्ट इंडिया, ईआयएल आणि आयओसीएल द्वारे “इंडियन पेट्रोकेमिकल्स सिनारियो 2040”, आयएचएस मार्किट, यूएन कॉमट्रेड, मॅककिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूट, प्रेस सर्च
डिस्क्लेमर : सुपरफॉर्म फॉर्मेटिव्ह ट्रेडमार्क जागतिक स्तरावर आयपी कार्यालयांसमोर नोंदणीसाठी प्रलंबित आहेत.


