Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन'चा पुणे, येथील आपत्‍कालीन आरोग्‍यसेवेत हातभार

ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन’चा पुणे, येथील आपत्‍कालीन आरोग्‍यसेवेत हातभार

मावळ तालुक्‍यातील टाकवे व येळसे गावांतील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांना 2 एएलएस रूग्‍णवाहिका डोनेट करण्यात आल्या

· 2 अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट (एएलएस) रुग्णवाहिका गंभीर आजारी किंवा जखमी रुग्णांना वेळेवर आणि प्रगत प्री-हॉस्पिटल उपचार प्रदान करून आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद वाढवतील

· महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या सन्माननीय उपस्थितीत या रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या

पुणे । जून 14, 2025: ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्‍या सीएसआर शाखेद्वारे पुण्‍यातील मावळ तालुक्‍यामधील टाकवे व येळसे गावांतील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांना 2 अॅडव्‍हान्‍स लाइफ सपोर्ट (एएलएस) रूग्णवाहिका दान करण्यात आल्या. एकूण 80 लाख रूपयांची गुंतवणूक असलेल्‍या या उपक्रमामधून महाराष्‍ट्रातील वंचित भागामध्ये आपत्‍कालीन आरोग्‍यसेवेला समर्थन देण्याप्रती, तसेच हॉस्पिटलमध्‍ये नेण्‍यापूर्वी रुग्णाची काळजी घेण्याप्रति एचएमआयएफची कटिबद्धता दिसून येते.

महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, आणि जिल्हा परिषद पुणेचे सीईओ श्री. गजानन पाटील यांच्या सन्माननीय उपस्थितीत या रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी श्री. पुनीत आनंद, एव्हीपी अँड व्हर्टिकल हेड, कॉर्पोरेट अफेयर्स, कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड सोशल, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड आणि श्री. सौरभ शर्मा, डोमेन हेड, सीएसवी, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड यांनी एचएमआयएल’चे प्रतिनिधित्व केले.

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करताना श्री. पुनीत आनंद, एव्हीपी अँड व्हर्टिकल हेड, कॉर्पोरेट अफेयर्स, कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड सोशल, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड म्‍हणाले, “ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनमध्‍ये आम्‍ही सेवा देत असलेल्‍या समुदायांमध्‍ये केंद्रित व शाश्‍वत सेवांच्या माध्‍यमातून अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. सुपूर्द करण्‍यात आलेल्‍या या अॅडव्‍हान्‍स लाइफ सपोर्ट रूग्‍णवाहिका ग्रामीण महाराष्‍ट्रातील आपत्‍कालीन आरोग्‍यसेवा प्रबळ करण्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आमचा प्रमुख आरोग्‍यसेवा उपक्रम ‘स्‍पर्श संजीवनी’ अंतर्गत राबवण्‍यात आलेला हा उपक्रम ग्रामीण व निमशहरी भागांमधील महत्त्वपूर्ण आरोग्‍यसेवा तफावतींना दूर करतो, ज्‍यामधून ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’ हा आमचा जागतिक दृष्टिकोन प्रबळपणे दिसून येतो.”

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत महाराष्‍ट्र राज्याचे माननीय उपमुख्‍यमंत्री श्री. अजित पवार म्‍हणाले, “ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनचे हे मोठे योगदान राज्‍यामध्‍ये आपत्‍कालीन आरोग्‍यसेवेची उपलब्‍धता आणि दर्जा मोठ्या प्रमाणात वाढवेल. या एएलएस रूग्‍णवाहिका वेळेवर व प्रगत पूर्व-हॉस्पिटल केअर देतील, ज्‍यामुळे अनेक व्‍यक्‍तींचे जीवन वाचवता येईल.”

प्रत्‍येक एएलएस रूग्‍णवाहिकेमध्‍ये इलेक्ट्रिक व मॅन्‍युअल सक्‍शन पंप्‍स, ऑक्सिजन सिलिंडर्स, प्रौढ व्‍यक्‍ती व लहान मुलांसाठी बॅग-मास्‍क व्‍हेंटिलेशन डिवाईसेस आणि व्‍हेंटिलेटर्स, इत्यादी. आवश्‍यक व प्रगत वैद्यकीय उपकरणे आहेत. या रूग्‍णवाहिका आघात व गंभीर आजार ते आई आणि बाळांच्या आरोग्‍यसंबंधित समस्‍यांपर्यंत आपत्‍कालीन स्थितींचे निराकरण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत.

हा उपक्रम एचएमआयएफचा प्रमुख आरोग्‍यसेवा उपक्रम ‘स्‍पर्श संजीवनी’चा भाग आहे, ज्‍याचा मनसुबा देशभरातील दुर्गम व वंचित भागांमधील समुदायांना दर्जेदार आरोग्‍यसेवा उपलब्‍ध करून देत भारतातील सार्वजनिक आरोग्‍य सुविधांना प्रबळ करणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments