Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedएअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य VSM (निवृत्त)यांची छत्रपती संभाजीनगर येथील सर्विसेस...

एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य VSM (निवृत्त)यांची छत्रपती संभाजीनगर येथील सर्विसेस प्रिपेटरी इन्स्टिट्यूटच्या (SPI)- (सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था )नियामक मंडळ सदस्यपदी नियुक्ती.

पुणे-
(प्रतिनिधी)
पुणे येथील एअर व्हाईस मार्शल नितीन शंकर वैद्य VSM (निवृत्त) यांची महाराष्ट्र शासनाने पुढील पाच वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर येथील (services prepatary इन्स्टिट्यूट – SPI) सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थाच्या नियामक मंडळ सदस्य पदी नियुक्ती केली आहे.
एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य (निवृत्त) हे पुणे येथील रहिवासी असून अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या महाराष्ट्र व गोवा राज्याचे उपाध्यक्ष आहेत.अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद ही पंजीकृत व केंद्र सरकार मान्यताप्राप्त पूर्व सैनिकांसाठी, वीर पत्नी,वीर माता यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय स्तरावर भरीव कार्य करणारी लष्कर,नौदल,व वायुदल सेवानिवृत्त सैनिकांची समाजभान जपणारी संस्था आहे.
नितीन वैद्य यांच्या ह्या नियुक्तीबद्दल पूर्व सैनिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments